National Sports Day. राष्ट्रीय क्रीडा दिवस. मेजर ध्यानचंद जन्मदिन


 ⚽🏑 29 ऑगस्ट : राष्ट्रीय क्रीडा दिन 🏏🏀

National Sports Day 

हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती

💢 राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने विशेष प्रश्नमंजुषा चाचणी सोडविण्यासठी 👈 येथे क्लिक करा.

व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी खेळाला अनन्य साधारण महत्त्व आहे. खेळाडू जीवनभर आरोग्यदायी राहतात. भारतामध्ये विविध क्रीडा प्रकार प्रसिद्ध आहेत. अनेक खेळाडू जागतिक स्तरावर चमकलेले आहेत. पी. टी. उषा यांना उडनपरी या नावाने संबोधले जाते तर सचिन तेंडुलकरला 'मास्टर ब्लास्टर' म्हटले जाते. मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादुगर असे म्हटले जाते. 

भारतीय हॉकीचे जादूगार खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या २९ ऑगस्ट या जयंती दिनानिमित्त संपूर्ण भारतात राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा केला जातो. ध्यानचंद यांचा जन्मदिन राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे. भारताची क्रीडा संस्कृती वाढावी, प्रोत्साहन मिळावे तसेच देशाच्या कानाकोपऱ्यात खेळाची जागरुकता निर्माण व्हावी यासाठी राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करण्यात येतो.

.. मेजर ध्यानचंद यांचा जन्म 29 ऑगस्ट 1905 रोजी अलाहाबादला झाला . तरुण वयातच ते लष्करात दाखल झाले . विद्यार्थी दशेत त्यांना हॉकीची आवड मुळीच नव्हती. सैन्यात गेल्यावर मात्र त्यांना या खेळाची आवड निर्माण झाली . त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना प्रोत्साहन दिले . सैन्याच्या हॉकी संघातून खेळणारे ध्यानचंद भारताच्या संघाकडून खेळायला लागले . 1926 मधल्या न्यूझीलंडच्या पहिल्याच दौऱ्यात त्यांच्या हॉकी स्टीकची , खेळाची आणि एकाग्रतेची , सहज चेंडू वळवायच्या जादूगिरीचा चमत्कार लाखो प्रेक्षकांनी पाहिला आणि ते अक्षरश . वेडे झाले . न्यूझीलंडमध्ये झालेल्या 21 पैकी 18 सामने भारतीय संघाने जिंकले होते . 2 सामने अनिर्णित ठरले होते . या दौऱ्यात ध्यानचंद यांनी नोंदवलेल्या गोलची संख्या 192 होती. कठोर परिश्रम , जिद्द आणि निर्धाराच्या बळावर त्यांनी हॉकीच्या खेळात नैपुण्य तर मिळवलेच, पण हॉकीचा जादूगार असा जागतिक लौकिकही मिळवला . फुटबॉलमध्ये " पेले ' आणि क्रिकेटमध्ये " ड्रॅडमन यांच्या बरोबरीने त्यांचे नाव जागतिक क्रीडा क्षेत्रात चिरंतन झाले आहे . 1928 मध्ये ऍमस्टरडम आणि 1932 मधल्या लॉस एंजल्स शहरात झालेल्या ऑलिंपिक सामन्यात लाखो प्रेक्षकांनी ध्यानचंद यांच्या हॉकी स्टीकची जादूगिरी पाहिली आणि प्रेक्षक अक्षरश : वेडे झाले . लॉस एंजल्सच्या सामन्यात ते सेंटर फॉरवर्डवर खेळले . त्यांच्या हॉकी स्टीकला चुंबक असावा , डिंक लावलेला असावा , अशा संशयाने ऍमस्टरडमच्या ऑलिंपिकमध्ये त्यांच्या हॉकी स्टीकची अनेकदा तपासणीही झालेली होती . 1936 मधल्या जर्मनीची राजधानी बर्लिन शहरात झालेल्या ऑलिंपिक सामन्यात भारतीय हॉकी संघाचे ते कर्णधार होते . आपल्याला कथी कर्णधारपद मिळेल , असे स्वप्नातही आपण पाहिले नव्हते , असे मेजर ध्यानचंद यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहून ठेवले आहे . त्या संधीचे त्यांनी अक्षरश: सोने केले आणि बलाढ्य जर्मनीच्या हॉकी संघाचा आठ विरुद्ध एक अशा गोल्सनी दणदणीत पराभव केला . जर्मनीचा हुकूमशहा हिटलरच्या उपस्थितीतच जर्मन संघाचा पराभव झाला , पण हिटलर मात्र ध्यानचंद यांच्या खेळावर बेहद्द खूश झाला होता . ऑलिंपिक हॉकी सामन्यापूर्वी जर्मनीशी झालेल्या अभ्यासाच्या सामन्यात , जर्मनीच्या संघाने भारताचा चार विरुद्ध एक असा पराभव केला होता . या पराभवाने हादरलेल्या ध्यानचंद यांना अनेक दिवस झोपही लागली नाही . काही झाले , तरी या ऑलिंपिकमध्ये सुवर्ण पदक जिंकायचेच अशा जिद्दीनेच ते आणि त्यांचा संघ मैदानावर उतरला आणि ऑलिंपिकच्या सामन्यातही ध्यानचंद यांनी नवा इतिहास घडवला . पहिल्या हाफ टाइममध्ये भारताची जर्मनीवर एक गोलने आघाडी होती . पुन्हा सामना सुरू झाला तेव्हा खवळलेल्या संतापलेल्या जर्मनीच्या खेळाडूंनी अत्यंत आक्रमक खेळ केला . जर्मन गोल किपरच्या हॉकी स्टीकने ध्यानचंद यांचा दात पडला . उपचारानंतर ते पुन्हा मैदानात उतरले आणि त्यांनी शेवटपर्यंत जर्मनीला एकही गोल नोंदवू दिला नाही . शेवटच्या क्षणापर्यंत चेंड जर्मनीच्या बाजूलाच ठेवण्यात त्यांनी यश मिळवले . ध्यानचंद यांच्या जवळ गेलेला चेंड़ गोलमध्येच पहायचा , असे प्रेक्षक सांगत असत . आंतरराष्ट्रीय सामन्यात चारशेच्यावर गोल्स नोंदवणाऱ्या मेजर ध्यानचंद यांनी 1949 मध्ये आंतरराष्ट्रीय खेळातून निवृत्ती घेतली . 1956 मध्ये पद्मविभूषण किताबाने केंद्र सरकारने त्यांना गौरवले . भारतीय हॉकी संघाची जगातल्या भल्या भल्या राष्ट्रांच्या हॉकी संघांना धडकी भरत होती , ती मेजर ध्यानचंद आणि त्यांच्या सहकारी खेळाडूंच्या आक्रमक खेळाने ! अशा या महाना खेळाडूचा 1979 मध्ये मृत्यू झाला .

राष्ट्रीय क्रीडा दिनी व्यक्तीच्या जीवनात खेळांच्या महत्त्वाबाबत जनजागृती केली जाते. तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी सर्वांनी खेळ खेळले पाहिजेत, असा संदेश दिला जातो. या दिवशी राष्ट्रपती देशातील क्रीडा क्षेत्रात चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना खेलरत्न, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार देऊन गौरव करतात.

🙏 राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!!  हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !!!


🙏🌹💐🌺💐🙏

Post a Comment

0 Comments