शिक्षणदीप ई मासिक फेब्रुवारी 2025 च्या अंकासाठी साहित्य पाठविणे बाबत आवाहन करण्यात येत आहे.
#Educational Digital E Masik
#Shikshandeep E Masik
शिक्षकमंच जळगाव संचलित शिक्षणदीप हे डिजिटल ई मासिक सप्टेंबर 2024 या महिन्यापासून दरमहा 5 तारखेला प्रसिद्ध केले जात आहे.
सदर ई मासिक जळगाव जिल्ह्यातील शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी एक हक्काचे व्यासपीठ असणार आहे. या डिजिटल मासिकाच्या फेब्रुवारी 2025 च्या (6 व्या) अंकासाठी आपणास साहित्य पाठवण्याचे आवाहन करीत आहोत.
मासिकासाठी खालील साहित्य पाठवू शकता. कथा, लेख, कविता, चित्रकाव्य, प्रवास वर्णन, पुस्तक परिचय, मुलाखत, शब्द कोडी, हास्यचित्रे, व्यंगचित्रे इ.
• सदर मासिकासाठी खालील विषयांवर साहित्य मागविले जात आहे. सदर मासिकासाठी आपण आपले स्वतःचे तसेच विद्यार्थ्यांचे साहित्य खालील व्हाट्सअप नंबर वर पाठवू शकता.
WhatsApp no. 📱
8806506804
किंवा
9923875125
* विषय -
1) शिक्षकांनी शाळेत राबविलेला नवोपक्रम
2) शिक्षकांची/ विद्यार्थ्यांची स्व लिखित कविता
3) विद्यार्थ्यांनी काढलेली, रंगविलेली चित्रे
4) माझी शाळा माझा उपक्रम
5) शिक्षक / विद्यार्थी गौरव, पुरस्कार प्राप्त बाबत
6) स्व लिखित लेख - खालील विषयांवर
A) मराठी भाषा दिवस
B) भविष्यवेधी शिक्षण
C) विज्ञान व तंत्रज्ञान
D) NEP 2020
E) योग शिक्षण व मूल्यशिक्षण
F) इतर कोणतेही शैक्षणिक, सामाजिक विषय
मासिकासाठी साहित्य/लेख/बातमी / कविता पाठविताना खालील बाबी लक्षात घ्याव्यात.
१) मजकूर डॉक्युमेंट फाईल किंवा मोबाइल वर टाईप करून पाठवावे. Whats App वर साहित्य पाठवू शकतात.
२) साहित्यात योग्य ठिकाणी विरामचिन्हांचा वापर केलेला असावा. शुद्धलेखनाचे नियम पाळावे.
३) साहित्य पाठवतांना त्यात कोणत्याही इमोजी, अथवा स्टार्सचा वापर करु नये.
४) आक्षेपार्ह, राजकीय, जातिभेद तेढ निर्माण करणारे साहित्य नसावे. साहित्य नकारात्मक नसावे.
५) सोबत आपला एक फोटो व अल्प परिचय
६) लेख शब्द मर्यादा ३०० पर्यंत. सोबत लेखासंबंधी एक/दोन फोटो देता येईल.
७) साहित्य स्वतःचे असावे. तसेच साहित्य पूर्वी कुठेही प्रकाशित झालेले नसावे.
८) विद्यार्थ्यांचे साहित्य पाठविताना (चित्र, काव्य) सोबत त्यांची माहिती व फोटो पाठवावा.
* टिप - आपले साहित्य, माहिती, लेख, कविता इ. 5 फेब्रुवारी 2025 पूर्वी पाठवावे.
🙏कोअर टीम / संपादक मंडळ 🙏
शिक्षकमंच जळगाव
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
*शिक्षकमंच जळगाव संचलित*
▪️ *शिक्षणदीप या डिजिटल ई मासिकाचे दर महिन्याचे अंक आता वाचा व डाऊनलोड करा ते ही निःशुल्क ....*
👉 *शिक्षणदीप या डिजिटल ई मासिकाचे मागील सर्व अंक वाचण्यासाठी व डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.*👇
https://moykhede.blogspot.com/p/blog-page_326.html?m=1
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
0 Comments