Get PVC Aadhar Card. आता PVC आधार कार्ड मागवा, घरबसल्या , तेही फक्त 50 रूपयात

 

Get PVC Aadhar card in Just 50 Rs.

आता घरी बसल्या PVC आधार कार्ड मागवा ते ही फक्त 50 रुपयात ...

आधार कार्ड हे आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचे असे Document आहे. अनेक सरकारी कामांसाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी, शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी, प्रवेश घेण्यासाठी Identity म्हणून आपले आधार कार्ड हे एक महत्त्वाचे Document मानले जाते. त्यामुळे आपण सर्वांनीच आधार कार्ड काढलेले असेल.

आपण आपल्याला मिळालेल्या आधार कार्डचा वापर करताना काही वेळा ते फाटते किंवा त्याला घड्या पडतात व ते खराब होते. आणि मग आपल्याला पुन्हा नवीन आधार कार्ड मागवावे लागते. 

परंतु आता शासनाने आपल्यासाठी नवीन PVC Aadhar Card उपलब्ध करून दिले आहे. हे आधार कार्ड आपण सहज पॉकेट मध्ये ठरू शकतो. तसेच ते खूप टिकाऊ देखील आहे. त्यामुळे ते खराब होणार नाही.

हे PVC Aadhar card आपण घरी बसून आपल्या मोबाईल वरून मागवू शकतो. ते ही फक्त 50 रुपयात.

🔻 आपण मागणी केल्यानंतर काही दिवसातच हे PVC आधार कार्ड आपल्याला पोस्टाने घर पोच मिळते.

♦️ आता हे PVC आधार कार्ड कसे मागवायचे ते आपण पाहू या.

🔻सर्वप्रथम आधार च्या खालील अधिकृत वेबसाईट वर जा. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 👇

https://uidai.gov.in

🔻 वेबसाईट वर तुम्हाला विविध सेवांचे पर्याय दिसतील त्यापैकी Order Aadhar PVC Card या पर्यायावर क्लिक करा.

🔻 त्यानंतर पुढील पेजवर तुमचा 12 अंकी Aadhar Number लिहा.

🔻 त्याखाली तिथे दिलेला Security Code टाका.

🔻त्यानंतर खालील Send OTP या टॅब वर क्लिक करा.

🔻जर तुमचा मोबाईल आधार सोबत Registered नसेल तर  

My Mobile number is not registered

या पर्याया समोरील box मध्ये ☑️ करा.

त्यानंतर खाली तुमचा मोबाईल नंबर टाका. व Send OTP वर क्लिक करा.

🔻त्यानंतर तुमच्या Registered mobile number वर एक OTP येईल तो  टाका.

🔻त्यानंतर Terms and Conditions

या समोरील box मध्ये ☑️ करा. व खालील Submit या टॅब वर क्लिक करा.

🔻 पुढील पेजवर तुमची आधार कार्ड माहिती व preview दिसेल. ते चेक करा व खालील Make Payment या पर्यायावर क्लिक करा. 

🔻त्यानंतर 50 रुपयांचे Payment करण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध होतील.

PAYMENT OPTIONS

  • Cards (Credit/Debit)
  • Net Banking
  • UPI
🔻 या पैकी कोणताही पर्याय वापरून तुम्ही payment करू शकतात.
UPI - यामध्ये GOOGLE PAY, PHONE PAY, PAYTM असे पर्याय निवडता येतील.
🔻Payment केल्यानंतर तुम्हाला Payment Successful चा message दिसेल. आणि त्याखाली Payment Reciept download करण्याचा पर्याय देखील दिसेल. तेथून तुम्ही Reciept download करू शकतात.
🔻आता तुमची सर्व process पूर्ण झालेली आहे. काही दिवसात तुम्हाला पोस्टाने तुमचे PVC आधार कार्ड घर पोच मिळेल. 🙏

Post a Comment

0 Comments