Top 3 E Learning Government websites & Apps

📲 *DIKSHA APP*

♦ *दीक्षा ॲप हे केंद्र शासन व  महाराष्ट्र शासन यांच्या संयोगातून निर्माण झालेले एक शैक्षणिक अधिकृत ॲप आहे.*
 🔹 *शिक्षक पालक व विद्यार्थी यांच्यासाठी पाठ्यपुस्तकातील घटकांवर संकल्प निहाय ई साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी दीक्षा ऍप चा वापर होत आहे.*
🔹 *दीक्षा ॲप मध्ये इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या सर्व इयत्तांच्या व सर्व विषयांच्या तसेच सर्व माध्यमांच्या पाठ्यपुस्तकांमध्ये छापण्यात आलेल्या QR कोड च्या माध्यमातून ई साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.*
🔹 *दीक्षा ॲप मध्ये संकल्पनांवर आधारित व शिक्षक निर्मित ई साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.*
🔹 *महाराष्ट्रातील मुलांच्या व शिक्षकांच्या जीवनाशी मिळतेजुळते ई साहित्य येथे उपलब्ध आहे.*
DIKSHA ची Website वापरण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा:
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

                   https://diksha.gov.in/exploreDIKSHA app डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा:
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.diksha.appDiksha App विषयी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा . 👈👈2) E  PATHASHALA -

ई-पाठशालामध्ये शिक्षक, विद्यार्थी, पालक, संशोधक आणि एज्युकेटर यासाठी सर्व प्रकारचे शैक्षणिक साहित्य ऑनलॉइन उपलब्ध करुन दिले आहे.

ई-पाठशालाची वेबसाइट आहे. इ-पाठशाला  हे पोर्टल भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालय

आणि नॅशनल काऊन्सिल   ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग यांनी २०१५ साली सुरु केलं आहे.

ई-पाठशालामध्ये शिक्षक, विद्यार्थी, पालक, संशोधक आणि एज्युकेटर यासाठी सर्व  प्रकारचे शैक्षणिक साहित्य ऑनलॉइन उपलब्ध करुन दिले आहे.

ई-पाठशालाची वेबसाइट आहे,     तसंच मोबाइल वा टॅबलेटसाठी अॅप देखील उपलब्ध आहेत.

अँड्राइड मोबाइल फोनसाठी गुगल प्ले स्टोअर, अॅपल मोबाइल फोनसाठी अॅपल स्टोअर आणि

विंडोजसाठी मायक्रोसॉफ्ट स्टोअर इत्यादींवर ई-पाठशाला अॅप उपलब्ध आहे.

ई-पाठशालावरील साहित्य हिंदी, इंग्रजी आणि उर्दू भाषेत उपलब्ध आहे.

 ई-पाठशालामध्ये विद्यार्थ्यांसाठी खालील गोष्टी उपलब्ध आहेत.


- पहिली ते बारावीची सर्व पाठ्यपुस्तकं (सीबीएससी बोर्डासाठीची पुस्तकं) इंग्रजी, हिंदी आणि उर्दू भाषांमधून उपलब्ध आहेत. विद्यार्थी ही पुस्तकं कम्प्युटर, टॅबलेट, लॅपटॉप वा मोबाइलवर मोफत डाऊनलोड करुन वाचू शकतात.

- विद्यार्थ्यांच्या अवांतर वाचनासाठी पूरक साहित्य उपलब्ध आहे.

- विद्यार्थ्यांसाठीच्या कार्यक्रम आणि उपक्रमांची माहिती देखील दिली जाते.

- विविध विषयांवरील माहितीसाठी आणि अभ्यासाच्या संकल्पना स्पष्ट करण्यासाठी काही ऑडिओ-व्हिडीओ संसाधनं उपलब्ध आहेत.

ई-पाठशालामध्ये शिक्षकांसाठी खालील गोष्टी उपलब्ध आहेत.

- पहिली ते बारावीची पाठ्यपुस्तकं.

- शालेय शिक्षणातील प्रत्येक टप्प्यावर विद्यार्थ्यांना कसं शिकवावं यासंबंधीच्या अध्ययन सूचना पुस्तिका उपलब्ध आहेत.

- विद्यार्थ्यांकडून अपेक्षित असलेली लर्निंग आऊटकम मिळवण्यासाठी करावयाच्या गोष्टी

- ऑडिओ-व्हिडीओ संसाधन

- शिक्षणासंबंधी उपयुक्त नियतकालिके आणि जर्नल्स

- शिक्षणविषयक विविध अहवाल, समित्यांचे रिपोर्टस, नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्कसंबंधीचे साहित्य इत्यादी देखील उपलब्ध आहे.

- ई-पाठशालामध्ये पालकांसाठी आणि शिक्षणतज्ज्ञांसाठीदेखील निवडक मॉड्यूल्स उपलब्ध आहेत.



3) Swayam -  

स्वयं पोर्टल हे भारत सरकारने सुरु केलेले एक ऑनलाईन लर्निंग पोर्टल आहे.

स्वयं पोर्टल बद्दल काही खास गोष्टी -

१. स्वयं एक ऑनलाइन शिक्षण पोर्टल आहे. जे विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य आहे.

·         त्यामुळे पोर्टलवरच उपलब्ध कोर्सही विनामूल्य आहे.

२. इयत्ता नववी ते पदव्युत्तर पदवी यावर अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

३. ज्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र घ्यायचे आहे. यशस्वीरित्या काही शुल्कासह अभ्यासक्रम उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र दिले जाते.

४. स्वयं पोर्टलवर अभ्यासक्रमाचे ४ भाग उपलब्ध आहेत - व्हिडीओ लेक्चर्स, विशेषत: तयार केलेली अभ्यास सामग्री जी डाऊनलोड व प्रिंट करता येते, परीक्षा व प्रश्नावलीद्वारे आत्म-आकलन. परीक्षा व अंतिम शंका सोडविण्यासाठी ऑनलाईन चर्चा.

५. स्वयं पोर्टलवर अभियांत्रिकी, विज्ञान, मानवता, भाषा, वाणिज्य, व्यवस्थापन, ग्रंथालय, शिक्षण इत्यादी विषयांचे अभ्यासक्रम पोर्टलवरच उपलब्ध आहेत.






Post a Comment

6 Comments