भाषा , गणित व इंग्रजी साहित्य संच व पेटी वापर मार्गदर्शिका
Language, Mathematics and English Literature Set and Box
भाषा व गणित अध्ययन समृद्धी कार्यक्रमांतर्गत इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतचे वर्ग असणाऱ्या शाळांना दोन्ही विषयांचे अध्ययन साहित्य संच व पुस्तिका पुरविण्यात आल्या आहेत. वाचन - लेखन , संख्याज्ञान - संख्यावरील क्रिया यातील मूलभूत क्षमतांमध्ये मागे असणाऱ्या इयत्ता १ ली ते ५ वी मधील वेगवेगळ्या अध्ययन स्तरातील विदयार्थ्यांसाठी हा संच उपयुक्त आहे . त्याच बरोबर मूलभूत क्षमता प्राप्त झालेल्या विदयार्थ्यांना सराव व दृढीकरणासाठी यातील काही साहित्य उपयुक्त आहे . या साहित्य संचांत मराठीची २१०५ कार्डस् व गणिताचे ६५६ कार्डस् व विविध प्रकारच्या ७०५ वस्तू आहेत . ही कार्डस् कोणती आहेत , कशासाठी आहेत , यांच्या साह्याने वर्गात कोणत्या कृती घेता येतील , कशा घेता येतील , त्यातून मुलांचे शिकणे कसे होईल यांची माहिती शिक्षकांना होण्यासाठी खाली दिलेल्या पुस्तिका उपयुक्त आहेत. या पेटीतील साहित्य यापूर्वी शाळांना उपलब्ध करून दिलेल्या पेटीतील साहित्याला पूरक आहे. या पुस्तिकेतील क्रमबध्द कृतींच्या आधारे विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर निश्चित करून त्यांना पुढे नेता येणार आहे.
📲 भाषा ( मराठी ) व गणित पेटी वापर मार्गदर्शिका वाचण्यासाठी व डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. 👈
📲 इंग्रजी पेटी वापर मार्गदर्शिका वाचण्यासाठी व डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. 👈
0 Comments