Maharashtra State Board SSC Exam Result. दहावी परीक्षेच्या निकालाचे निकष जाहीर. 11 वी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश परीक्षा

 

Maharashtra State Board SSC Exam Result. 

दहावी परीक्षेच्या निकालाचे निकष जाहीर. 11 वी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश परीक्षा 

शालेय शिक्षण मंत्री आ. वर्षा गायकवाड यांनी दहावीचा निकाल कसा लावणार याविषयी निकष जाहीर केले आहेत. दहावीच्या निकालाचे निकष जाहीर करताना आ. वर्षा गायकवाड यांनी दहावीचा निकाल जूनअखेर लावू असे म्हटले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागानं दहावी परीक्षेसदंर्भात शासन निर्णय काढला आहे. दहावीच्या परीक्षांचा निकाल लावण्यासाठी निकष आज जाहीर करण्यात आले आहेत. यंदाच्या  दहावीच्या मूल्यमापन संदर्भात हा शासन निर्णय काढण्यात आला आहे.

♦️दहावी परीक्षेच्या निकालाचे निकष -

वर्षातील लेखी मूल्यमापन – 30 गुण

दहावीचे गृहपाठ, तोंडी किंवा प्रात्यक्षिक अंतर्गत – 20 गुण

नववीचा विषयानिहाय गुण – 50 गुण

विद्यार्थ्यांचा निकाल हा 100 गुणांचा असेल.  शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी इ.10 वी परीक्षेचा अंतिम निकाल खालील निकषांचया आधारे जाहीर करण्यात येणार आहे.

1) विद्यार्थ्यांचे इ 10वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन 30 गुण देण्यात येतील.

2) विद्यार्थ्यांचे इ 10 वीचे गृहपाठ/ तोंडी परीक्षा / प्रात्याक्षिक परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन 20 गुण देण्यात येतील.

3) विद्यार्थ्यांच्या इ. 9 वी चा अंतिम निकालातील विषयनिहाय मिळालेल्या गुणांपैकी 50 गुण याप्रमाणं विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

♦️ दहावीच्या परीक्षेच्या मूल्यमापन / निकालाचे निकष या संदर्भातील शासन निर्णय पाहण्यासाठी खाली क्लिक करा. 👇

CLICK HERE 👈

📚  अकरावीच्या प्रवेशासाठी  ऑनलाईन सीईटी परीक्षा 📲

अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन सीईटी परीक्षा घेण्यात येणार असल्याचं देखील शिक्षणमंत्री आ. वर्षा गायकवाड यांनी यावेळी सांगितले. सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी वैकल्पिक सीईटी परीक्षा घेण्यात येईल. ही परीक्षा राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर अवलंबून असतील. अकरावी प्रवेश प्रक्रिया राबवताना सामाईक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल.

♦️ अकरावी प्रवेश परीक्षा संदर्भातील शासन निर्णय पाहण्यासाठी खाली क्लिक करा. 👇

CLICK HERE 👈

Post a Comment

0 Comments