International Yoga Day. जागतिक योग दिवस

 

International Yoga Day.

जागतिक योग दिवस

21 जून 2021.

     संयुक्त राष्ट्र महासभेच्या सप्टेंबर 2014 रोजी झालेल्या महासभेत 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात यावा असा प्रस्ताव भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडला होता.संयुक्त राष्ट्राच्या 193 पैकी 175 देशांच्या प्रतिनिधींनी या प्रस्तावास मान्यता दिली होती.यावर विस्तृत चर्चा होऊन 21 जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.

       दरवर्षी येणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनामुळे.दरवर्षी 21 जून रोजी साजऱ्या होणाऱ्या या दिनाचे सर्व मानवजातीच्या आयुष्यात खूप महत्व आहे.रोज जरी काही योगासने केली तरी कित्येक व्याधींना आपण कायमचे दूर ठेवू शकतो.

       आज या बदलत्या जीवशैलीत योगाचे खूप महत्व आहे.योगामुळे आज संपूर्ण जगात सर्व व्याधी,आजार यांना दूर करण्याची क्षमता आहे.रोजचे जरी 10 ते 20 मिनिट योगासाठी दिल्यास माणसाच्या जीवनात खूप चांगला बदल घडून येईल.माणसाचे आयुष्य वाढेल.त्याची जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलता येईल.हे केवळ आणि केवळ योगामुळे घडून येईल. पहाटेच्या शांत वेळी प्राणायाम आणि योगासने केल्यामुळे मन शांत राहून शरीरही तंदुरुस्त राहते, त्यामुळे योगासने हे एक शरीर आणि मन तंदुरुस्त ठेवण्यासाठी प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे वर्षभर विविध ठिकाणी प्राणायाम आणि योगाचे वर्ग घेतले जातात.

        जगात बऱ्याच देशांत 21 जून हा सर्वात मोठा दिवस असतो.त्यामुळे या दिवसाला एक वेगळे महत्व आहे.म्हणूनच हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

योगासनांचे फायदे

1. योगासने केल्याने शरीर सदृढ राहते.रोग दूर पळतात.

2.शारीरिक, मानसिक,बौद्धिक विकास उत्तम होतो.

3.शरीर,मन,आत्मा यांना जोडणारी क्रिया म्हणजे योग आहे.

4.योगासने केल्याने मन प्रसन्न रहाते.

5.योगासने हा प्रकार बिनखर्चिक आहे.

6.योगासने केल्याने आरोग्य उत्तम राहते.

7.योगाला प्राचीन भारतीय परंपरा आहे.

8.योग केल्यामुळे आपली संस्कृतीचे रक्षण होईल.

9.योग केल्याने माणसाच्या शारीरिक मानसिक बौद्धिक गोष्टींचा विकास होतो.

10.मन व आत्मा यांचे मिलन योगाद्वारे होते.

योग करण्यासाठी काय तयारी करावी?

1.आपण कोणत्याही जागी योग करू शकतो.शक्यतो शांततेची जागा निवडावी.

2.बसण्यासाठी एक छोटी चटई असावी.

3.लवचिक हालचाल होण्यासाठी सैल कपडे घालावे.

शाळांमध्ये योग दिवस साजरा केला जातो.

    या वर्षी कोरोना आजाराच्या संसर्गामुळे शाळा प्रत्यक्ष बंद आहेत. त्यामुळे शाळांमध्ये ऑनलाईन माध्यमातून ( झूम मीटिंग, गूगल मीट इ. ) विद्यार्थ्यांसोबत योग दिवस साजरा केला जाणार आहे. याबाबतचे शासनाने परिपत्रक देखील काढले आहे.

परिपत्रक पाहण्यासाठी येथे 👈 क्लिक करा.

♦️ आपण योग दिवस कार्यक्रम खालील क्रमाने घेऊ शकतो.

🧘‍♀️ २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन🧘‍♂️

🗓️  दि.२१ जून २०२१, सोमवार

⏰ वेळ- सकाळी 7:30 वा. ऑनलाइन गुगलमीट/झूम मीट  द्वारे

     योग साधना कार्यक्रम- 45 मिनिटे*🧎‍♂️

🧘‍♂️ 1] प्रार्थना-  5 मिनिट 🧘‍♀️

●गुरु मंत्र,  

●गायत्री मंत्र, 

●त्रिवार 🕉️ कार

🧘‍♀️ 2] पूरक हालचाली -5 मिनिट

★मानेच्या हालचाली

★ खांद्याच्या हालचाल 

★कमरेच्या हालचाली 

★ पायाच्या हालचाली

3] योगासने- 20 मिनिट

🧘‍♀️ अ) दंड स्थितीतील आसन

◆ताडासन - २ आवर्तन

◆वृक्षासन -२ आवर्तन

🧘‍♂️ ब) बैठक स्थितीतील आसन

■वज्रासन 

■पद्मासन-

■शशांकासन- 

🧘‍♀️ क) पोटावरची आसने

◆मकरासन 

🧘‍♂️ ड) पाठीवरील झोपण्याची आसने 

■उत्तानपादासन

■शवासन

🧘‍♀️ 4] कपालभाती (दीर्घ श्वसन क्रिया) -  5. मिनिट

🧘‍♂️ 5] प्राणायाम - 5.मिनिट

 ◆ अनुलोम-विलोम

 ◆ शीतली प्राणायाम 

 ◆ भ्रामरी प्राणायाम

🧘‍♀️ 6]  योगदिन चर्चा आणि हास्य योग - 5.मिनिट

🧘‍♂️ 7]शांती पाठ, संकल्प - 

🧘‍♀️ करो योग, रहो निरोग 🧘‍♂️ 

      ♦️ विविध योगासनांची चित्ररूप माहिती खालील pdf file मध्ये दिलेली आहे.

सर्वांना जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

@ जागतिक योग दिवस मार्गदर्शिका - 

 


Post a Comment

0 Comments