Dekho Apana Desh Webinar Series. देखो अपना देश वेबीनार शृंखला

 


देखो अपना देश ◆

 वेबिनार मालिका 

       राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र , पुणे यांच्या तर्फे दि. १८ जुलै २०२१ पासून प्रत्येक रविवारी आम्हीं घेऊन येत आहोत  “देखो अपना देश” ही वेबिनार शृंखला.

पर्यटन मंत्रालय भारत सरकार द्वारा लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांचे  अध्ययन सतत सुरू राहण्याच्या उद्देशाने “देखो अपना देश” या वेबिनार मालिकेचे प्रसारण झालेले आहे. सदर मालिका ही इंग्रजी व हिंदी अशा दोन्ही भाषेत प्रसारित झाली असून त्यात 89 वेबिनार्सचा समावेश आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अप्रत्यक्ष प्रवास घडवून पर्यटनाचा आनंद व माहिती यांचा खजिना आपल्यापर्यंत पोहचविण्यात आलेला आहे.

या मालिकेअंतर्गत आपल्या देशातील विविध ऐतिहासिक, भौगोलिक, धार्मिक स्थळे/शहरे व तेथील लोकसंस्कृतीची माहिती रंजक स्वरूपात देण्यात आलेली आहे.

या माहितीचा उपयोग विद्यार्थी ज्ञानात वाढ होण्यास उपयुक्त ठरणार आहे. 

तसेच शिक्षकांचे  अध्यापन समृद्ध होण्यास मदत  होणार आहे. 


यातील पहिल्या  वेबिनार मध्ये " City of Cities-Delhi's personal Diary" या अंतर्गत दिल्ली शहराचा वास्तव इतिहास  मांडलेला आहे. 


दिल्ली शहर त्याचे स्थान, निर्मिती तसेच शहराच्या सामाजिक, सांस्कृतिक विकासात अनेक सुलतान व बादशहांचे योगदान नेमके काय आहे या बाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. 


तसेच दिल्ली शहराचा इतिहास तेथील  पर्यटन स्थळे व वैशिष्ठ्ये यांची माहिती आकर्षक व तत्कालीन चित्रांच्या माध्यामातून मांडण्यात आलेली आहे. 


या माहितीच्या माध्यमातून विद्यार्थ्याना अप्रत्यक्ष पणे सदर ठिकाणे पाहण्याचा आनंद घेता येणार आहे. तसेच पुढील काळात विदयार्थी जेव्हा संबंधित ठिकाणाला भेट देतील तेव्हा या माहितीच्या आधारे ते स्वतः अधिक माहिती जाणून घेऊ शकतील.  वरील महत्व  लक्षात घेता सदर मालिकेतील पहिला भाग दिल्ली शहर “आज और कल  के साथ” पुढील लिंक  द्वारे आपणास पाहण्यास उपलब्ध करून देण्यात येत आहे. 


You tube link- 

 Delhi-" City of Cities-Delhi's personal Diary"  

 https://youtu.be/LWlBc8F_Us4


तरी सदर वेबिनार लिंक सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षक यांना उपलब्ध करून देण्यात यावी.                                                                                                  


      दिनकर टेमकर                      

                 संचालक                                                  

        राज्य शैक्षणिक संशोधन  व                                                                                          प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र,पुणे.                               

        

Post a Comment

0 Comments