E Mail अकाउंट तयार करणे

नविन ईमेल खाते कसे उघडावे?

 
आपल्याला जर आपला नविन ई-मेल चालू करायचा असेल तर जी-मेल, हॉटमेल, याहू, रिडीफ या वेबसाइटवर नविन ई-मेल सुरु करण्यासाठी त्यांच्या वेबसाइटच्या पानावर तसे बटण आपल्याला पहायला मिळेल. जसे जी-मेलच्या वेबसाइटवर Create an account, हॉटमेलच्या वेबसाइटवर Sign up, याहूच्या वेबसाइटवर देखिल Sign up आणि रिडीफच्या वेबसाइटवर Create a Rediffmail account असे दिलेले आहे.
नविन ई-मेल बनविण्याच्या बटणावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक फॉर्म उघडेल. यामध्ये आपल्याला सुरुवातीला आपल्याला ज्यानावाने ई-मेल हवा असेल ते नाव द्यावे लागत. इथे आपण दिलेले नाव जर अधीच कुणी घेतलेले असेल तर ते नाव आपल्यालाच नाही तर जगभरामध्ये कुणालाच मिळत नाही. ई-मेल हा जगभर पसलेला असल्याने जगभरामध्ये एक ई-मेलचा पत्ता हा एकालाच दिलेला असतो. आपल्याला हवे असलेले उपलब्ध नाव निवडल्यानंतर त्याला उघडण्यासाठी पासवर्ड (सांकेतिक अक्षरे, उदा. कुणाचेही नाव) द्यावे तसेच त्याखाली आपली इतर माहिती भरुन दिल्या नंतर आपले ई-मेल खाते लगेचच चालू होते व आपण लगेचच इतरांना ई-मेल पाठवू शकता तसेच ई-मेल पाहू शकता.
आपण जर आपला ई-मेल बनविलेला असेल तर आपल्याला ई-मेल पाहण्यासाठी तसेच ई-मेल पाठविण्यासाठी प्रथम आपल्या ई-मेल खात्यामध्ये प्रवेश करावा लागेल, ज्याला साईन इन (Sign In) करणे असे म्हटले जाते. आपण ज्या वेबसाइटवरुन ई-मेल बनविला असेल त्याच वेबसाइटवर आपण आपला ई-मेल पाहू शकतो. जसे जर आपल्या ई-मेलच्या पूढे  @gmail.com असे असेल तर याचा अर्थ आपला ई-मेल जीमेल या वेबसाइटवर बनविला आहे व www.gmail.com वेबसाइटवरच आपण आपले ई-मेल पाहू शकता. त्याच प्रमाणे जर आपल्या ई-मेलच्या पूढे  @hotmail.com असे असेल तर याचा अर्थ आपला ई-मेल हॉटमेल या वेबसाइटवर बनविला आहे व www.hotmail.com वेबसाइटवरच आपण आपले ई-मेल पाहू शकता.
आपला ई-मेल असलेल्या वेबसाइटवर आपल्या ई-मेल तसेच ई-मेल बनविताना दिलेला पासवर्ड देऊन प्रवेश करु शकतो. योग्य प्रकारे चुक न करता आपला पूर्ण ई-मेल पत्ता आणि पासवर्ड दिल्यानंतरच साईन इन या बटणावर क्लिक केल्यानंतर आपण आपल्या ई-मेल खात्यामध्ये प्रवेश करु शकतो.

Post a Comment

0 Comments