ब्लॉग निर्मिती

1) ब्लॉग कसा बनवावा.  

How To Create New Blog...  

          blog हे वेबलॉग या शब्‍दाचे लघुरुपांतर आहे. हा संकेतस्‍थळाचाच म्‍हणजे वेबसाईटचाच प्रकार आहे. ब्‍लॉग हे एक व्‍यक्‍ती किंवा व्‍यक्तिंचा समूह ब्‍लॉग निर्माण करतो. ब्‍लॉगमध्‍ये मजकूर, व्हिडीओज, ऑडिओज, चित्रे आणि वेबलिंक्‍स (सांधे) दिलेले असतात. नविन मजकूर ब्‍लॉगवर लिहिणे किंवा प्रकाशित करणे याला 'ब्‍लॉगिंग' असे म्‍हणतात. ब्‍लॉगवरील लेखांना 'ब्‍लॉगपोस्‍ट' 'एन्ट्रिज' म्‍हणतात. ब्‍लॉग लिहीणा-या लेखकांना ब्‍लॉगर म्‍हणून संबोधले जाते. आज ब्‍लॉगवर कोट्यावधी लेख नविन ब्‍लॉग वेबवर झळकत आहेत. चला तर मग आपणही नविन ब्‍लॉग तयार करुया.....


नविन ब्‍लॉग तयार करण्‍यासाठी आवश्‍यक घटक.....

१. स्‍वत: चा Gmail ID
2. नेट कनेक्‍शन      
वरील दोन्‍ही गोष्‍टी उपलब्‍ध असतील तर ब्‍लॉग तयार करण्‍यासाठी काही अडचण येणार नाही फक्‍त ५ मिनीटात तुमचा ब्‍लॉग तयार होईल. सर्वप्रथम www.blogger.com या साईटवर तुमच्‍या gmail Id व्‍दारे Log  in  करा.
Log in केल्‍यानंतर Bogger Dashboard open होईल जसे...
  blogger dashboard वर  New blog असे चौकट किंवा बटन दिसेल त्‍यावर क्लिक करा लगेच दुसरा विंडो उघडेल.
जसे.....
  वरील विंडोजमध्‍ये तुम्‍हाला ब्‍लॉग टाईटल (Title) द्यावे लागेल उदा. Address मध्‍ये तुमच्‍या ब्‍लॉगला तुम्‍ही काय अड्रेस देणार आहात हे ठरवावे लागेल. तुमच्‍या नावाने अड्रेस तयार करता येईल.  किंवा blog address टाईप केल्‍यानंतर उपलब्‍ध आहे किंवा नाही तपासून पाहिले जाईल उपलब्‍ध नसेल तर sorry this blog address is not available म्‍हणून त्‍याखाली मेसेज दिसेल दुस-या नावाने प्रयत्‍न करा उपलब्‍ध असेल तर blog address is available असा मेसेज येईल available असेल.


@ ब्लॉग वेबसाइट कशी बनवायची ?


1)  ब्लॉग तयार करण्यास स्वताःचा Gmail id व Password असणे आवश्यक आहे.
2)  प्रथमतः www.blogger.com वर जा.
3)  तेथे Gmail चा login id / username व password टाकून login / signin करा.
4)  यानंतर New Blog ला click करा.
5)  पुढे Blog चे (Tital )शिर्षक व तुम्हाला ठेवायचा Blog address टाका.
जसे e.g  sandipsonar.blogspot.com]
6)  त्याखालील हवे ते Template निवडा .
7)  create blog ला click करा .
8) निवडलेल्या Template  वर Blog ची रचना अवलंबून असते .
9)  आता new post वर click करा .
10)  MSWord प्रमाणे Page open होईल .
11)  तेथे आपली post तयार करा .
12) नंतर publish करा .
13)  समोरील view blog करून आपली blog website पहा .
14)  नंतर layout वर जा तेथे header मधे blog मुखपृष्ठासाठी Photo add करा .
15)त्याखालील gadget वर क्लिक करा .
16)  त्यात आगोदर तयार केलेली pages select करून save करा .
17)  हे पेजेस तुम्हाला blog च्या मुखपृष्ठावर आडवी दिसतील .
18)  Pages tab टाकण्यास - new page click करा व त्याचे Title टाकून तयार करा .
19)  माहिती तयार असल्यास भरा फोटो टाका .
20)  नंतर खालील add gadget वर क्लिक करा व हवी ती gadget add करा.
21)  आता layout page च्या डाव्या बाजूला Template designer वर क्लिक करून ब्लॉग design करता येते .
22) layout वर sidebar कसे हवे ते select करा व apply to blog करा .
23) शेवट advanced menu वर क्लिक करून रंगसंगती  ठरवा .
24)खाली तुम्हाला live blog दिसेल .
25)  सर्व रचना झाली की apply to blog करायला विसरू नका .
26)  आपल्या इतर फाईल Google drive , Dropbox वर Save करून तेथील link copy  करून ब्लॉग वर हवी तेथे pest करू शकता.
 ---------------------------------------------------------------------------------

@ ब्लॉग डिझाईन - HTML इफेक्टसह

                 
   HTML  चा वापर करून  टेक्स्ट  इफेक्ट देणे  - हलणारी अक्षरे
          फक्त  खालील  सुचनेनुसार प्रोसेस  करा-
 ■ सुचना -
                    खाली अक्षरांना  हलणारे  इफेक्ट  कसे द्यायचे  याबाबत  सोपे व जास्तीत जास्त  वापर  होणारे चार इफेक्ट  दिलेले आहेत.  हे इफेक्ट  ब्लॉग वर  अॅड केल्यावर  आकर्षक  ब्लाॅगरचना दिसते.
         खाली प्रत्येक  इफेक्ट  व त्याचा कोड दिलेला आहे.  आपण  हा इफेक्ट  आपल्या  ब्लॉगवर  Page  किंवा  Post  मध्ये  अॅड  करु  शकतो.
          सर्वप्रथम  जो इफेक्ट  द्यायचा आहे , त्याचा कोड copy करा. तो तुमच्या  colour  note किंवा  कोणत्याही  ठिकाणी  paste  करून  त्याठिकाणी Edit  करा.
            edit  करताना 'तंत्रस्नेही शिक्षक ' या शब्दाच्या  ठिकाणी  फक्त तुमचा मेसेज  जो असेल तो टाईप  करा.  तुम्ही  जो मेसेज  टाईप  केला आहे,  त्या मेसेजलाच  running  effect  दिसुन  येतो.
             तयार  केलेला मेसेज  copy  करा. ज्या page  ला  अथवा  post ला  इफेक्ट  द्यायचा आहे , ते पेज ओपन करा. त्यामध्ये  compose  च्या  बाजुला HTML ला क्लिक करा.  त्यामध्ये  तुम्ही  बनवलेला मेसेज  paste  करा. वरील  Publish बटणवर क्लिक करा.  इफेक्ट  तयार  होईल.

1. हलणारी अक्षरे(running text ) : डावीकडून उजवीकडे
● इफेक्ट  पहा-
● कोड ( code ) -
<marquee behavior="scroll" direction="right "> तंत्रस्नेही  शिक्षक  </marquee>

2. हलणारी अक्षरे ( running text ) : उजवीकडून डावीकडे
● इफेक्ट (effect) -
●कोड(code )
 -<marquee behavior="scroll" direction="left">  तंत्रस्नेही शिक्षक </marquee>

3. हलणारी अक्षरे(running text ) : खालुन वर
● इफेक्ट ( effect ) -
● कोड ( code ) -
 <marquee behavior="scroll" direction="up">  तंत्रस्नेही शिक्षक </marquee>

4. हलणारी अक्षरे ( running text ) : वरुन  खाली
● इफेक्ट ( effect ) -
● कोड ( code ) -
<marquee behavior="scroll" direction="down"> तंत्रस्नेही शिक्षक  </marquee>
---------------------------------------------------------------------------------
                 

   ■ HTML ने इमेज  (image ) ला इफेक्ट  देणे  ■


   ■ सुचना -
                       post किंवा  page  मधील इमेज  ला हलणारे  इफेक्ट  देणे  सोपे  आहे. . पुढील  प्रोसेस  करा....
                           सर्वप्रथम  compose  मध्ये  असताना  image  च्या  आयकॉन  वर क्लिक करून  इमेज  घ्या. इमेज  लोड झाल्यावर  त्या इमेजला आपल्याला  इफेक्ट  द्यायचा आहे.
                              खाली  कोड दिलेले आहेत. . त्यातील  कोडचा पहिला  भाग म्हणजे  (इमेज च्या वरील)   हा  html ला क्लिक केल्यावर  त्याच्यात जो कोड तयार  आहे त्याच्या  सुरवातीला  पेस्ट  करा... त्यानंतर कोडचा दुसरा

खाली  कोड दिलेले आहेत. . त्यातील  कोडचा पहिला  भाग म्हणजे  (इमेज च्या वरील)   हा  html ला क्लिक केल्यावर  त्याच्यात जो कोड तयार  आहे त्याच्या  सुरवातीला  पेस्ट  करा... त्यानंतर कोडचा दुसरा भाग (इमेज च्या  खालील )  सर्व कोड च्या  शेवटी  पेस्ट  करा  व सेव्ह करा. .... इफेक्ट तयार होईल. .



 1.इमेज - डावीकडून उजवीकडे  हलणारी ~

   ● कोड ( code ) -
 <marquee behavior="scroll" direction="right">
इमेज
</marquee>
  2 . इमेज - उजवीकडून डावीकडे  हलणारी ~

● कोड ( code ) -
<marquee behavior="scroll" direction="left">
 इमेज
 </marquee>
  3. इमेज - खालुन वर हलणारी ~

● कोड ( code ) -
<marquee behavior="scroll" direction="up">
 इमेज
 </marquee>
  4. इमेज - वरुन खाली हलणारी ~

● कोड ( code ) -
<marquee behavior="scroll" direction="down">
इमेज
 </marquee>
5. इमेज- डाव्या व उजव्या बाजूला  सरकणारी(alternate ) ~

● कोड ( code ) -
<marquee behavior="alternate">
इमेज
</marquee>

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

 ब्लॉग निर्मिती संदर्भातील पीडीएफ फाईल भाग 1 ते 8 खाली उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇



1) BLOG निर्मिती भाग 1  👉 Download

2) BLOG निर्मिती भाग 2  👉 Download

3) BLOG निर्मिती भाग 3  👉 Download

4) BLOG निर्मिती भाग 4  👉 Download

5) BLOG निर्मिती भाग 5  👉 Download

6) BLOG निर्मिती भाग 6  👉 Download

7) BLOG निर्मिती भाग 7  👉 Download

8) BLOG निर्मिती भाग 8  
👉 Download

9) BLOG निर्मिती भाग 9 👉 Download

10) BLOG निर्मिती भाग 10 👉 Download

Post a Comment

4 Comments

  1. Superb guidance sirji. I got what I was wandering for.Thanks from the bottom of my heart.
    Thank you.and thanks to TEAM DIECPD JALGAON for giving me chance the golden opportunity to participate in TECH-SAVVY TEACHER TRAINING.

    ReplyDelete