Fit India movement Registration For Schools.

 
Fit India movement अंतर्गत Fit India च्या पोर्टलवर 3 स्टार व 5 स्टार साठी शाळांची नोंदणी करणे बाबत...

 उपरोक्त विषयानुसार, Fit India movement  अंतर्गत Fit india च्या पोर्टलवर राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळांनी नोंदणी करणेबाबत सूचित करण्यात आले आहे. Fit India movement अंतर्गत *खेलो* *इंडिया* या उपक्रमासाठी राज्यातील 86 हजार शाळांची नोंदणी पूर्ण झालेली आहे. Fit India अंतर्गत शाळांची 3 स्टार व 5  स्टार अशी वर्गवारी करण्यासाठी Fit India च्या पोर्टलवर शाळा नोंदणी करणे आवश्यक आहे. ही शाळा नोंदणी केल्यानंतर शाळांना प्रमाणपत्र प्राप्त होते. आजपर्यंत राज्यातील केवळ 8800 शाळांनी 3 स्टार व 5 स्टार साठी आपली नोंदणी करून प्रमाणपत्र प्राप्त केलेले आहे. Fit India  3 स्टार व 5 स्टार यासाठी शाळा नोंदणी (Registration) करण्यासाठी खालील लिंकचा वापर करता येईल.शाळा नोंदणी (Registration) करण्यासाठी वापरलेला  मेल आयडी व पासवर्ड जतन करून ठेवावा.

🔻शाळा नोंदणी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 👇

https://fitindia.gov.in/register


 यापूर्वी शाळेची नोंदणी केली असेल,परंतु प्रमाणपत्र मिळाले नसेल तर प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी पुढील लिंकचा  उपयोग करता येईल.शाळा नोंदणी करताना वापरलेला मेल/ युजर नेम व पासवर्ड चा वापर करून login करावे.

🔻यापूर्वी शाळा नोंदणी केली असल्यास प्रमाणपत्र मिळविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 👇 

https://fitindia.gov.in/fit-india-school-certification

 शाळा नोंदणी बाबतची माहिती आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळा व मुख्याध्यापकांपर्यंत पोहचवून आपल्या कार्यक्षेत्रातील 100% शाळांची  3 स्टार व  5 स्टार साठी नोंदणी करून घेणेसाठी आपल्या स्तरावरून योग्य कार्यवाही करावी.

शाळा नोंदणी बाबतचा Demo व्हिडीओ  👇


-

 दिनकर टेमकर

 संचालक 

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे

Post a Comment

0 Comments