Lokmany Tilak. लोकमान्य टिळक माहिती.

 

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक 

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच !

 जन्म: २३ जुलै १८५६

रत्‍नागिरी(टिळक आळी), रत्‍नागिरी जिल्हा

मृत्यू: १ ऑगस्ट १९२०

पुणे, महाराष्ट्र, 

चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा

संघटना: अखिल भारतीय काँग्रेस

पत्रकारिता/ लेखन: केसरी, मराठा

प्रमुख स्मारके: मुंबई  दिल्ली, पुणे

प्रभावित:महात्मा गांधी, चाफेकर बंधू, स्वातंत्र्यवीर सावरकर

वडील: गंगाधर रामचंद्र टिळक

आई: पार्वतीबाई टिळक

पत्नी: सत्यभामाबाई

♦️ लोकमान्य टिळक जयंती निमित्त विशेष प्रश्नमंजुषा चाचणी सोडविण्यासाठी 👈 येथे क्लिक करा.

 लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त विशेष प्रश्नमंजुषा चाचणी सोडविण्यासाठी 👈 येथे क्लिक करा.

टिळकांचा जन्म २३ जुलै, इ.स. १८५६ मध्ये रत्‍नागिरीमधील मधल्या आळीत, एका मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील चिखलगाव हे त्यांचे मूळ गाव होय.

टिळकांचे वडिल एका शाळेत शिक्षक म्हणुन कार्यरत होते व संस्कृताचे चांगले ज्ञानी होते. टिळक अवघे 16 वर्षांचे असतांना त्यांच्या वडिलांचे निधन झाले.

1877 साली पुण्यातील डेक्कन महाविद्यालयातुन त्यांनी पदवी मिळवली. फार नगण्य लोक त्या काळी महाविद्यालयीन शिक्षण घेउ शकत होते, लोकमान्य टिळक त्यातुन एक होते ज्यांनी महाविद्यालयीन पदवी प्राप्त केली.

1871 साली त्यांचा विवाह तापीबाईंसोबत (सत्यभामाबाई) झाला. विवाह झाला त्यावेळी टिळक अवघे 16 वर्षांचे होते आणि तापीबाई त्याहुनही पुष्कळ लहान.

1877 साली टिळकांनी डेक्कन महाविद्यालयातुन पदवी प्राप्त केली व 1879 साली गवर्मेंट लाॅ काॅलेज मधुन वकिलीची पदवी मिळवीली.

निबंधमालाकार विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी सरकारी नोकरी सोडून शाळा काढण्याचे ठरविले होते तेव्हा टिळक व आगरकर दोघेही त्यांना भेटले. १ जानेवारी १८८० रोजी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना झाली. टिळकांनी विनावेतन शिक्षकी पेशा पत्करला.

टिळक फक्त चांगले संपादकच नव्हते तर संस्कृत, गणित, खगोलशास्त्र यांच्यामधील मान्यताप्राप्त अभ्यासकपण होते. त्यांची दोन पुस्तके ’ओरायन’(Orion) आणि ’आर्क्टिक होम ऑफ वेदाज’ (Arctic home of vedas) ही त्यांच्या अत्यंत क्लिष्ट विषय अभिनव व नावीन्यपूर्ण प्रकारे हाताळण्याच्या क्षमतेची उत्तम उदाहरणे आहेत. आर्क्टिक हे आर्यांचे मूळ वसतीस्थान आहे असा निष्कर्ष यामध्ये त्यांनी मांडला आहे. त्यांचे तिसरे पुस्तक ’गीतारहस्य’ यात त्यांनी भगवद्‌गीतेतील कर्मयोगाची समीक्षा मांडली आहे. त्यांचे इतर लिखाण :-

आर्क्टिक होम ऑफ वेदाज

ओरायन

गीतारहस्य

राजकीय जनजागृतीसाठी इ.स. १८९३ साली टिळकांनी गणेशोत्सव सुरु केला आणि महात्मा फुलेंनी सुरु केलेल्या शिवाजी जयंतीला व्यापक स्वरुपात साजरी केले. शिवजयंती आणि गणेशोत्सव या सार्वजनिक सणांद्वारे ब्रिटिशांविरुद्ध लोकांना उभे राहण्यासाठी जागृत करणे हे टिळकांचे उद्दिष्ट होते.

८ जून १९१४ या दिवशी मंडालेच्या कारागृहातून टिळक सुटले आणि त्यांनी पूर्ववत आपले काम चालू केले. काँग्रेसमध्ये दुफळी माजून गंभीर मतभेद निर्माण झाले होते. त्यांना एकसंघ करण्यासाठी टिळकांनी फार प्रयत्‍न केले; परंतु त्यांना यश आले नाही. शेवटी त्यांनीच एक स्वतंत्र शक्तिमान संघटना निर्माण करण्याचे ठरवले. यालाच ‘होमरूल लीग’ असे म्हणतात. ‘स्वराज्यप्राप्ती’ हेच या लीगचे ध्येय होते. मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला.

लोकमान्य टिळकांचे महत्वपुर्ण कार्य – Lokmanya Tilak Work

1880 साली पुण्यात न्यु इंग्लिश हायस्कुल ची स्थापना

1881 साली जनजागृतीकरता ’केसरी’ व ’मराठा’ अशी वृत्तपत्र सुरू केली. आगरकर केसरीचे तर टिळक मराठा चे संपादक झालेत

1884 साली पुण्यात डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली

1885 साली पुणे येथेच फग्र्युसन काॅलेज सुरू केले

लोकांमध्ये एकतेची भावना निर्माण व्हावी या हेतुने ’सार्वजनिक गणेशोत्सव’ आणि ’शिव जयंती’ उत्सवाला सुरूवात केली

1895 ला टिळकांची मुंबई प्रांत विनियमन बोर्ड चे सभासद म्हणुन निवड झाली

1897 राजद्रोहाचा आरोप लावुन टिळकांना दिड वर्षांची कैद झाली त्यावेळेस टिळकांनी आपल्या बचावात जे भाषण दिले ते तब्बल 4 दिवस आणि 21 तास चालले.

1903 मधे ’दि आर्क्टिक होम इन द वेदाज’ या पुस्तकाचे प्रकाशन

1907 साली भारतीय राष्ट्रीय काॅंग्रेस चे सुरत येथे अधिवेशन झाले त्यात जहाल आणि मवाळ या दोन समुहांचा संघर्ष फार वाढला. परिणामी मवाळ समुहाने जहाल समुहाला काॅंग्रेस संघटनेमधुन काढुन टाकले. जहाल समुहाचे नेर्तृत्व लोकमान्य टिळकांकडे होते

1908 मध्ये टिळकांवर राजद्रोहाचा खटला चालला त्यात त्यांना सहा वर्षांची शिक्षा झाली टिळकांना ब्रम्हदेशात मंडालेच्या कारागृहात पाठविले तेथे टिळकांनी ’गितारहस्य’ नावाचा अतुलनीय असा ग्रंथ लिहीला

1916 साली त्यांनी डाॅ. अॅनी बेझंट यांच्या सहकार्याने ’होमरूल लीग’ संघटनेची स्थापना केली. होमरूल म्हणजे आपल्या राज्याचे प्रशासन आपण करावयाचे यालाच ’स्वशासन’ देखील म्हणतात.

हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा मिळायला हवा याकरीता सर्वात आधी पुढाकार टिळकांनीच घेतला होता.

टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक म्हंटले गेले आहे.

🔻 लोकमान्य टिळक यांना  विनम्र अभिवादन !!! 🙏💐



Post a Comment

0 Comments