Lokshahir Aannabhau Sathe. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे.

 

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे  

Lokshahir Aannabhau Sathe 

जन्म नाव - तुकाराम भाऊराव साठे

टोपणनाव - आण्णाभाऊ साठे

जन्म - १ ऑगस्ट  १९२०

वाटेगाव, तालुका वाळवा, सांगली जिल्हा

मृत्यू - १८ जुलै  १९६९

कार्यक्षेत्र - लेखक, साहित्यिक

साहित्य प्रकार - शाहिर, कथा, कादंबरीकार

वडील - भाऊराव साठे

आई - वालबाई साठे

पत्नी - कोंडाबाई साठे, जयवंता साठे

आण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण ठरलेला आहे. अजरामर अशा या साहित्याने उपेक्षितांच्या अंतरंगाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. उपजत बुद्धिवादी म्हणून त्यांच्या साहित्याचा धांडोळा घेता येतो. आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी व अभ्यासक त्यांच्या या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ लोकमानसात रुजविण्याचे महत्त्वपूर्ण काम शाहीर अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि शाहीर द.न. गव्हाणकर यांनी केले. मुंबई, मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र यांच्यासह सीमा प्रदेशातील विविध भागांतील हजारो ठिकाणी शाहिरांनी आपल्या लालबावटा कलापथकाचे कार्यक्रम सादर केले. त्याच्यामुळे लोक प्रेरित झाले.

.

📲 अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती विशेष प्रश्नमंजुषा चाचणी सोडविण्यासाठी येथे क्लिक करा

📲 अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने विशेष प्रश्नमंजुषा चाचणी सोडविण्यासाठी येथे क्लिक करा.

आण्णाभाऊ साठेंचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला. त्यांच्या वडीलांचे नाव भाऊराव साठे व आईचे नाव वालुबाई साठे होते. साठे हे शाळेत शिकलेले नाही, केवळ दीड दिवस ते शाळेत गेले नंतर तेथील सवर्णांद्वारे होणाऱ्या भेदभावामुळे त्यांनी शाळा सोडून दिली.

१९४४ मध्ये दत्ता गवाणकर आणि अमर शेख या शाहिरांच्या सोबत त्यांनी लालबावटा कला पथक स्थापन केले. याद्वारे त्यांनी अनेक सरकारी निर्णयांना आव्हान दिले होते.

भारतीय स्वातंत्र्य्यानंतर उच्चवर्णीयांचे भारतावरील शासन त्यांना मान्य नव्हते म्हणून त्यांनी १६ ऑगस्ट १९४७ रोजी मुंबई येथे वीस हजार लोकांचा मोर्चा काढला आणि त्या मोर्च्यातील घोषणा होती, "ये आझादी झूठी है, देश कि जनता भूखी है!"

इ.स. १९५८ मध्ये, बॉम्बेमध्ये स्थापन केलेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनात आपल्या उद्घाटन भाषणात त्यांनी म्हटले की, "पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित व कामगार लोकांच्या तळहातावर तरलेली आहे"[७] यातून त्यांनी जागतिक संरचनांमध्ये दलित आणि कामगार वर्गांचे महत्त्व स्पष्ट केले. 

आण्णाभाऊ साठे हे दलित समाजाचे विशेषत: मांग जातीचे प्रतीक बनले आहेत.

१ ऑगस्ट २००१ रोजी भारतीय पोस्टाने ४ ₹ च्या खास टपाल तिकिटावर आण्णाभाऊ साठेंचे चित्र ठेवले होते. साठेंच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने १ ऑगस्ट २०१९ रोजी हे टपाल तिकीट वितरित करण्यात आले.

पुण्यातील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक आणि कुर्ला मधील एक उड्डाणपूल यासह अनेक इमारतींना त्यांचे नाव देण्यात आले आहे.

आण्णाभाऊ साठेंनी लिहिलेली पुस्तके

अकलेची गोष्ट (लोकनाट्य, १९४५)

अण्णा भाऊ साठे : प्रातिनिधिक कथा (संपादक - डाॅ. एस.एम. भोसले)

अमृत

आघात

आबी (कथासंग्रह)

आवडी (कादंबरी)

इनामदार (नाटक, १९५८)

कापऱ्या चोर (लोकनाट्य)

कृष्णाकाठच्या कथा (कथासंग्रह)

खुळंवाडा (कथासंग्रह)

गजाआड (कथासंग्रह)

गुऱ्हाळ

गुलाम (कादंबरी)

चंदन (कादंबरी)

चिखलातील कमळ (कादंबरी)

चित्रा (कादंबरी, १९४५)

चिरानगरची भुतं (कथासंग्रह), १९७८)

नवती (कथासंग्रह)

निखारा (कथासंग्रह)

जिवंत काडतूस (कथासंग्रह)

तारा

देशभक्त घोटाळे (लोकनाट्य, १९४६)

पाझर (कादंबरी)

पिसाळलेला माणूस (कथासंग्रह)

पुढारी मिळाला (लोकनाट्य, १९५२)

पेंग्याचं लगीन (नाटक)

फकिरा (कादंबरी, १९५९)

फरारी (कथासंग्रह)

मथुरा (कादंबरी)

माकडीचा माळ (कादंबरी, १९६३)

रत्ना (कादंबरी)

रानगंगा (कादंबरी)

रूपा (कादंबरी)

बरबाद्या कंजारी (कथासंग्रह, १९६०)

बेकायदेशीर (लोकनाट्य, १९४७)

माझी मुंबई (लोकनाट्य)

मूक मिरवणूक(लोकनाट्य)

रानबोका

लोकमंत्र्यांचा दौरा (लोकनाट्य, १९५२)

वारणेचा वाघ (कादंबरी, १९६८)

वैजयंता (कादंबरी)

वैर (कादंबरी)

शेटजींचे इलेक्शन (लोकनाट्य, १९४६)

🔻 साहित्यिक , लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना  विनम्र अभिवादन !!! 🙏💐

Post a Comment

1 Comments