National Doctors Day. राष्ट्रीय डॉक्टर दिवस

 

राष्ट्रीय डॉक्टर दिवस

1 जुलै  

राष्ट्रीय डॉक्टर दिन (National Doctors Day  हा दिवस भारतात दरवर्षी 1 जुलै रोजी साजरा केला जातो. डॉक्टर वर्गाच्या समाजातील अतुल्य योगदानाबद्दल आणि त्यांना मानवंदना देण्यासाठी हा दिवस संपूर्ण देशात मोठ्या उत्साहाने पाळला जातो. कोरोना व्हायरसमुळे आलेल्या महामारीत सर्व डॉक्टर फ्रण्ट लाईन योद्धा म्हणून लढत आहेत. रुग्णसेवेप्रती समर्पित असलेल्या डॉक्टरांच्या सन्मानार्थ दरवर्षी 1 जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर दिवस साजरा केला जातो.

       भारताचे महान डॉक्टर आणि पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री डॉ. बिधानचंद्र रॉय यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय डॉक्टर दिवस देशभरात साजरा होतो. 1 जुलै रोजी डॉ. बिधानचंद्र रॉय यांचा जन्मदिवस आणि स्मृतीदिन असतो. त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात महत्त्वाचं योगदान दिलं आहे. त्यांच्या दूरदृष्टी नेतृत्त्वामुळे त्यांना बंगालचे शिल्पकारही म्हटलं जातं. 1961 मध्ये त्यांना देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने अर्थात भारतरत्नने गौरवण्यात आलं. त्यांच्या सन्मानार्थ तत्कालीन केंद्र सरकारने 1991 मध्ये राष्ट्रीय डॉक्टर दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून दरवर्षी 1 जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर दिवस साजरा केला जातो.

        डॉ. विधान चंद्र रॉय यांचा जन्म 1 जुलै 1882 साली बिहारमधील पटना येथे झाला. फिजिशियन डॉ विधानचंद्र रॉय हे पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री होते. त्यांच्या दूरदर्शी नेतृत्त्वामुळे रॉय यांना पश्चिम बंगालचे आर्किटेक्ट असेही म्हणतात. रॉय यांचे शिक्षण कलकत्त्यामध्ये झाले. एमआरसीपी आणि एफआरसीएसची डिग्री लंडनमधून घेतली आहे. 1911 पासून त्यांनी भारतामध्ये वैद्यकीय सेवा देण्यास सुरूवात केली.

        भारताच्या  पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा बहुमान डॉ. आनंदीबाई जोशी यांना प्राप्त झाला आहे. 

        प्रत्येक परिस्थितीत आपलं कर्तव्य निभावत रुग्णांना चांगले उपचार कसे मिळतील यासाठी डॉक्टर प्रयत्नशील असतात. अशा सर्व डॉक्टरांना राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा व मानाचा मुजरा. 🙏🙏💐💐

राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या निमित्ताने विशेष प्रश्नमंजुषा चाचणी सोडविण्यासाठी 👈 येथे क्लिक करा.

Post a Comment

0 Comments