Dekho Apana Desh Webinar ( Part 4) देखो अपना देश ! वेबिनार

 

◆ देखो अपना देश DEKHO APANA DESH  WEBINAR ◆

 वेबिनार मालिका  ( भाग 4 )

8 ऑगस्ट 2021

       राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र , पुणे यांच्या तर्फे दि. १८ जुलै २०२१ पासून प्रत्येक रविवारी आम्हीं घेऊन येत आहोत  “देखो अपना देश” ही वेबिनार शृंखला.

पर्यटन मंत्रालय भारत सरकार द्वारा लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांचे  अध्ययन सतत सुरू राहण्याच्या उद्देशाने “देखो अपना देश” या वेबिनार मालिकेचे प्रसारण झालेले आहे. सदर मालिका ही इंग्रजी व हिंदी अशा दोन्ही भाषेत प्रसारित झाली असून त्यात 89 वेबिनार्सचा समावेश आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अप्रत्यक्ष प्रवास घडवून पर्यटनाचा आनंद व माहिती यांचा खजिना आपल्यापर्यंत पोहचविण्यात आलेला आहे.

या मालिकेअंतर्गत आपल्या देशातील विविध ऐतिहासिक, भौगोलिक, धार्मिक स्थळे/शहरे व तेथील लोकसंस्कृतीची माहिती रंजक स्वरूपात देण्यात आलेली आहे.

या माहितीचा उपयोग विद्यार्थी ज्ञानात वाढ होण्यास उपयुक्त ठरणार आहे. 

तसेच शिक्षकांचे  अध्यापन समृद्ध होण्यास मदत  होणार आहे.

यातील आजच्या चौथ्या वेबिनार मध्ये ( दिनांक 8 ऑगस्ट 2021 ) “World Heritage and Sustainable Tourism at Humayun’s Tomb”  या अंतर्गत भारतातील मुघल साम्राज्याचे पहिले शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिल्ली या शहरातील जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेल्या हुमायून मकबरा विषयीचा इतिहास, रचना, स्थापत्य व इतर वैशिष्ट्यांविषयी सविस्तर चर्चा केलेली आहे. 

तसेच चार बाग गार्डन व इतर पर्यटन स्थळे यांची माहिती आकर्षक व तत्कालीन चित्रांच्या माध्यमातून देण्यात  आलेली आहे.

काल्पनिक प्रवासाच्या माध्यमातून पर्शियन व भारतीय शैलीने बनविलेले Humayun’s Tomb पुढील लिंक  द्वारे आपणास पाहण्यास उपलब्ध करून देण्यात येत आहे. 

 Webinar on Humayun’s Tomb - “World Heritage and Sustainable Tourism at Humayun’s Tomb” 

🔻 Webinar पाहण्यासाठी   YouTube    Link 👇

 https://youtu.be/-ODVmSCi-ug

      

सदर वेबिनार लिंक सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षक यांना उपलब्ध करून देण्यात यावी.

                                                                                                     एम. डी.  सिंह ( भा.प्र.से. )

        संचालक,

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे

                                                                                                                  

            

Post a Comment

0 Comments