Children's Day 14 November
बालदिवस 14 नोव्हेंबर
सर्वांत पहिला बालदिन ऑक्टोबर १९५३ मध्ये जगभर साजरा करण्यात आला. ह्यासाठी जिनीव्हाच्या आंतरराष्ट्रीय बालकल्याण संघटनेचा पुरस्कार लाभला होता. त्यानंतर कै. श्री. व्ही के कृष्णमेनन ह्यांनीही आंतरराष्ट्रीय बालदिनाची संकल्पना उचलून धरली व १९५४ मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आमसभेने ती स्वीकारली.
१९५४ मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आमसभेने ठरवल्यानुसार २० नोव्हेंबर हा जागतिक बालदिन मानला जातो. सर्व देशांनी लहान मुलामुलींमध्ये सांप्रदायिक आदान-प्रदान व विविध संप्रदाय वा धर्मांबाबतचे सामंजस्य वाढवावे तसेच जगभरातल्या मुलामुलींचे आयुष्य अधिक चांगले बनवण्याची संकल्पना मान्य करून त्यादृष्टीने काम करावे असा हेतू ह्यामागे होता.
संयुक्त राष्ट्र संघाने २० नोव्हेंबर १९५४ ला बाल दिन साजरा करण्याची घोषणा केली होती. आजही विविध देशांमध्ये 'बाल दिन'च्या तारखांबाबत भिन्नता आढळते. भारतात मात्र १९६४ नंतर १४ नोव्हेंबरला 'बाल दिन' साजरा केला जाऊ लागला.
दर वर्षी १४ नोव्हेंबर हा बालदिन म्हणून साजरा केला जातो. ... दर वर्षी १४ नोव्हेंबर हा बालदिन म्हणून साजरा केला जातो. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 'बाल दिन' म्हणून भारतात साजरा केला जातो.
👉 पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विषयी अधिक माहिती साठी येथे क्लिक करा. 👈
भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू लहान मुलांमध्ये रमायचे आणि त्यांच्या लाघवी स्वभावामुळे मुलांनाही ते आपलेसे वाटायचे. २७ मे १९६४ ला पंडितजींचे निधन झाले. चिमुरड्यांच्या लाडक्या 'चाचा' नेहरूंना आदरांजली म्हणून त्यांच्या जन्मदिनी अर्थात १४ नोव्हेंबरला भारतात 'बाल दिन' साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
लहान वयात मुलांना योग्य मार्गदर्शन मिळालं तरच ते भविष्यात आदर्श नागरिक होऊ शकतील या विचाराने पंडित नेहरूंनी मुलांसाठी अनेक योजना आखल्या. त्यामुळे 'बाल दिन'च्या निमित्ताने त्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जावं असं ठरविण्यात आलं. आजही देशभरातील अनेक शाळांमध्ये या दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे, स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.
बालदिन साजरा करताना आपण अर्थातच चाचा नेहरूंचे त्यामागील विचार समजून घ्यायला हवेत. मुलामुलींना सुरक्षित आणि प्रेमाच्या वातावरणात वाढवले गेले पाहिजे तसेच त्यांना आपले आयुष्य फुलवण्याच्या आणि पर्यायाने देशाच्या विकासात भर घालण्याच्या समान संधीही मोठ्या प्रमाणात मिळाल्या पाहिजेत. बालदिनाच्या निमित्ताने आपणांपैकी प्रत्येकाला मुलांच्या कल्याणासाठी काहीतरी करण्याबाबतच्या आपल्या वचनबद्धतेची आठवण राहते.
💢 बाल दिन साजरा करा विविध पुस्तके वाचून ....
विद्यार्थ्यांसाठी बाल दिनाच्या निमित्ताने विविध वाचनीय पुस्तके .... मनोरंजक अवांतर पुस्तके वाचा व ज्ञान वाढवा. 📚
📱 *विद्यार्थ्यांसाठी वाचनीय गोष्टींची पुस्तके.* 👇🏻
https://moykhede.blogspot.com/p/vacha.html?m=1
📱 *विज्ञान विषयक पुस्तके* 👇🏻
https://moykhede.blogspot.com/p/blog-page_10.html?m=1
📱 *किशोर मासिक* 👇🏻
https://moykhede.blogspot.com/p/blog-page_6.html?m=1
📱 *चांदोबा मासिक* 👇🏻
https://moykhede.blogspot.com/p/blog-page_91.html?m=1
📱 *गणित विषयाची मनोरंजक व परिपूर्ण माहिती असलेली पुस्तके*👇🏻
https://moykhede.blogspot.com/p/blog-page_58.html?m=1

0 Comments