पांडुरंग सदाशिव साने ( साने गुरुजी ) जयंती
Sane Guruji Jayanti
24 डिसेंबर 2021
🙏 परमपूज्य साने गुरुजी यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !!! 💐🙏
मराठी लेखक , स्वातंत्र्यसैनिक व समाजसुधारक पांडुरंग सदाशिव साने ( डिसेंबर २४ , इ.स. १८ ९९ जून १ ९ , इ.स. १ ९ ५० ) साने गुरुजी नावाने प्रसिद्ध , हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक , समाजवादी विचारवंत , सामाजिक कार्यकर्ते , मराठी साहित्यिक होते . साधी , सरळ , ओघवती भाषा , भावपूर्ण संस्कारक्षम निवेदनशैली हे त्यांच्या लेखनाचे विशेष गुण होते .
'श्यामची आई ' , ' नवा प्रयोग ' , ' सुंदर पत्रे ' , ' हिमालयाची शिखरे ' , ' क्रांती ' , ' समाजधर्म , ' आपण सारे भाऊ इत्यादी त्यांचे विपुल साहित्य प्रसिद्ध आहे .
🔻 टोपणनाव : साने गुरुजी
🔻 जन्म : डिसेंबर २४ , इ.स. १८ ९९ पालगड , रत्नागिरी जिल्हा , महाराष्ट्र भारत
🔻मृत्यू : जून १ ९ , इ.स. १ ९ ५० के . ई . एम . रुग्णालय मुंबई
🔻 वडील - सदाशिव
🔻 आई - यशोदाबाई
🔻 पूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने
💢 साने गुरुजींचा जन्म कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला . त्या ठिकाणी खोताचे काम ते करीत असत . खोताचे घराणे साधारणतः वैभवसंपन्न व श्रीमंत समजले जाते व त्यांच्या आजोबांच्या वेळची परिस्थिती तशी होती ही . पण सदाशिवरावांच्या वेळेपासून मात्र घराण्याची आर्थिक स्थिती घ गेली . ती इतकी की , सदाशिवरावांचे घरदारही जप्तीत नाहीसे झाले . अशा रितीने बड़े घर पण पोकळ वासा झालेल्या या घराण्यात २४ डिसेंबर , इ.स. १८ ९९ रोजी सदाशिवांचा जन्म झाला . त्यांच्यावर त्यांच्या आईच्या शिकवणुकीचा फार मो प्रभाव पडला होता . त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार त्यातूनच गुरुजींचा जीवनविकास झाला . त्यानी इंग्रजी साहित्यामध्ये एम . ए . पदवी मिळवली होती .
चळवळ : भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना : राष्ट्र सेवा दल
पत्रकारिता / लेखन - छात्रालय दैनिक , साधना , साप्ताहिक
प्रमुख स्मारके : वाडघर - गोरेगाव , माणगाव तालुका रायगड , महाराष्ट्र
🔻शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी अंमळनेर येथील प्रताप हायस्कूल येथे शिक्षक म्हणून सहा वर्षे ( १ ९ २४ ते १ ९ ३० ) नोकरी केली . प्रताप हायस्कूलच्या वसतीगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील शिक्षकाला अधिक वाव मिळाला.
🔻इ.स. १ ९ २८ साली त्यांनी ' विद्यार्थी ' हे मासिक सुरू केले . त्यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा फार मोठा प्रभाव होता . ते स्वतः खादीचाच वापर करत असत . ० इ.स. १ ९ ३० साली त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या ३० चळवळीत भाग घेतला . त्यांनी काँग्रेस ' नावाचे साप्ताहिक काढणे , दुष्काळात ३० शेतकऱ्यांची करमाफी व्हावी म्हणून प्रयत्न करणे , जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील काँग्रेस अधिवेशन ( १ ९ ३६ ) यशस्वी होण्यासाठी कार्य करणे , इ.स. १ ९ ४२ च्या चळवळीत भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचार या माध्यमांतून त्यांनी राजकीय कार्य केले . फैजपूर येथील अधिवेशनात महात्मा गांधींच्या विचरसरणीस अनुसरून त्यांनी मैला वाहणे व ग्राम स्वच्छतेची इतर कामे केली . त्यानी राष्ट्र सेवा दलाची स्थापना केली . ' पत्री ' या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहातून त्यांनी देशभक्तिपर कविता प्रसिद्ध झाल्या आहेत . त्यातील बलसागर भारत होवो सारख्या कवितांचा नागरिकांवरील वाढता प्रभाव लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने त्या काव्यसंग्रहाच्या प्रती जप्त केल्या.
🔻 समाजातील जातिभेद , अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट रूढी व परंपरांना साने गुरुजींनी नेहमी विरोध केला . पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी १ ९ ४६ च्या दरम्यान महाराष्ट्राचा दौरा केला , या भूमिकेला पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला . अखेर त्यांनी या मुद्यावर उपोषणाचा मार्ग अवलंबला व त्यांना यश मिळाले . ' एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला खऱ्या अर्थाने मुक्त केले , ' असे त्या वेळी म्हटले गेले .
🔻 शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी अंमळनेर येथील प्रताप हायस्कूल येथे शिक्षक म्हणून सहा वर्षे ( १ ९ २४ ते १ ९ ३० ) नोकरी केली . प्रताप हायस्कूलच्या वसतीगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील शिक्षकाला अधिक वाव मिळाला . त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या उदाहरणातून स्वावलंबनाचे धडे दिले , सेवावृत्ती शिकवली . अंमळनेर येथील प्रताप तत्त्वज्ञान केंद्र येथे त्यांनी तत्त्वज्ञानाचा अभ्यासही केला . स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते समाजवादी पक्षात सामील झाले . स्वातंत्र्यानंतर आंतरभारती चळवळीच्या मार्गाने त्यांनी भारत जोडण्याचा प्रयत्न केला . विविध राज्यांतील लोकांनी एकमेकांची संस्कृती समजून घ्यावी , अनेक भाषा समजून घ्याव्यात असे या चळवळीत अभिप्रेत होते . ते स्वतः तमिळ , बंगाली आदी भाषा शिकले होते . १ ९ ४८ मध्ये त्यांनी ' साधना ' साप्ताहिक सुरू केले . त्यांच्या कथा , कादंबऱ्या , लेख , निबंध , चरित्रे , कविता यांमधून त्यांच्यातील संवेदनशील साहित्यिकही आपल्याला दिसतो . मानवतावाद , सामाजिक सुधारणा व देशभक्ती ही मूल्ये त्यांच्या साहित्यात ठायी ठायी दिसतात . त्यांनी एकूण ७३ पुस्तके लिहिली . त्यांनी त्यांचे बहुतांश लेखन हे तुरुंगात असतानाच केले . श्यामची आई ही सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी नाशिकमधील तुरुंगात असतानाच लिहिली . आचार्य विनोबा भावे रचित गीता प्रवचनेसुद्धा विनोबा भावे यांनी धुळे येथील तुरुंगात ( १ ९ ३२ ) सांगितली व साने गुरुजींनी लिहिली . याच धुळ्यातील तुरुंगात त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल सुमारे १५ महिन्यांचा तुरुंगवास भोगला . तसेच पुढे बंगलोर येथील तुरुंगात असताना त्यांनी तिरुवल्लिवर नावाच्या कवीच्या कुरल ' नावाच्या तमिळ महाकाव्याचे मराठीत भाषांतर केले . नंतर फ्रेंच भाषेतील Les Misérables या कादंबरीचे दुःखी ' या नावाने मराठीत अनुवादन केले . डॉ . हेन् री थॉमस या जगप्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञाच्या The story of human race या पुस्तकाचे मराठीत मानवजातीचा इतिहास असे भाषांतर केले . ' करील मनोरंजन जो मुलांचे , जडेल नाते प्रभुशी तयाचे हे गुरुजींच्या जीवनाचे सार होते .
🔻साने गुरुजींच्या स्मरणार्थ सानेगुरुजी राष्ट्रीय स्मारक या नावाची संस्था महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातल्या माणगाव नजीकच्या वडघर या निसर्गरम्य गावात आहे.
साहित्य : गुरुजींनी विपुल साहित्य लिहिले .कादंबऱ्या , लेख , निबंध , काव्य , चरित्रे , नाट्यसंवाद इत्यादी साहित्यांच्या विविध क्षेत्रात त्यांची लेखणी अविरत चालली .त्यांची एकूण ७३ पुस्तके आहेत .वरदा प्रकाशनाने ती ३६ खंडांत पुनःप्रकाशित केली आहेत .त्यांच्या साहित्यातून कळकळ , स्नेह , प्रेम गोष्टींवर भर आढळतो .त्यांची साधीसुधी भाषा लोकांना आवडली .
🔻साने गुरुजींवर अनेक लेखकांनी लिहिले आहे .त्यांतल्या काही पुस्तकांची आणि लेखकांची नावे ....
आपले साने गुरुजी- लेखक डॉ .विश्वास पाटील
जीवनयोगी साने गुरुजी - लेखक डॉ .रामचंद्र देखणे
निवडक साने गुरुजी - लेखक रा.ग.जाधव
महाराष्ट्राची आई साने गुरुजी - लेखक वि .दा .पिंपळे
साने गुरुजी जीवन परिचय - लेखक यदुनाथ थत्ते
साने गुरुजी पुनर्मूल्यांकन - लेखक भालचंद्र नेमाडे
साने गुरुजी यांची सुविचार संपदा - लेखक वि.गो.दुर्गे
साने गुरुजी साहित्य संकलन - लेखक प्रेम सिंह
स्रोत : विकिपीडिया
0 Comments