ओळख मराठी साहित्यिकांची
साहित्यिक - आचार्य प्र. के. अत्रे
Pra. Ke. Atre
🔻जन्म नाव - प्रल्हाद केशव अत्रे
🔻टोपणनाव - केशवकुमार
🔻जन्म - १३ ऑगस्ट १८९८
कोडीत खुर्द, महाराष्ट्र, भारत
🔻मृत्यू - १३ जून १९६९
वरळी ,(मुंबई),महाराष्ट्र, भारत
🔻कार्यक्षेत्र - साहित्य, पत्रकारिता, राजकारण, चित्रपट, शिक्षण
🔻साहित्य प्रकार - कथा, कादंबरी, नाटक, कविता, चरित्र लेखन,वृत्तपत्र
🔻प्रसिद्ध साहित्यकृती - डॉ. लागू, झेंडूची फुले, कर्हेचे पाणी (आत्मचरित्र)
🔻वडील - केशव विनायक अत्रे
🔻आई - अन्नपूर्णाबाई केशव अत्रे
✴️प्रल्हाद केशव अत्रे ऊर्फ आचार्य अत्रे हे मराठीतील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, संपादक, चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी व वक्ते होते. ते महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील प्रमुख नेते होते.
✴️आचार्य अत्रे यांचा जन्म 13 ऑगस्ट 1898 रोजी पुणे जिल्ह्यातील सासवड जवळील कोडित खुर्द या गावी देशस्थ ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील लिपिक होते आणि काही काळासाठी सासवड नगरपालिकेचे सचिव होते आणि त्यांचे काका एमईएस वाघिरे हायस्कूल सासवड येथे शिक्षक होते. सासवडच्या एमईएस वाघिरे हायस्कूलमधून त्यांनी प्राथमिक व उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. 1919 मध्ये फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी मॅट्रिक पूर्ण केले. पुणे विद्यापीठातून त्यांनी कला शाखेची पदवी पूर्ण केली. पदवीनंतर अत्रे यांनी शाळेत शिक्षक म्हणून काम केले. अत्रे यांनी १९२८ मध्ये लंडन विद्यापीठातून टी.डी. (शिक्षक पदविका) केले. भारतात परत येण्यापूर्वी त्यांनी सिरिल बर्ट यांच्या हाताखाली प्रायोगिक मानसशास्त्राचा अभ्यास केला आणि हॅरो येथे अध्यापन केले.
✴️इ.स. १९२३ साली अत्र्यांनी 'अध्यापन' मासिक सुरू केले. इ.स. १९२६ मध्ये 'रत्नाकर' व इ.स. १९२९ साली 'मनोरमा', आणि पुढे इ.स. १९३५ साली 'नवे अध्यापन' व इ.स. १९३९ साली 'इलाखा शिक्षक' ही मासिके काढली. जानेवारी १९, इ.स. १९४० साली त्यांनी नवयुग साप्ताहिक सुरू केले. जुलै ८, इ.स. १९६२ पर्यंत ते चालू होते. जून २, इ.स. १९४७ रोजी अत्र्यांनी जयहिंद हे सांजदैनिक सुरू केले; परंतु ते वर्षभरच चालले. नोव्हेंबर १५, इ.स. १९५६ रोजी त्यांनी मराठा हे दैनिक सुरू केले. ते त्यांच्या हयातीनंतरही काही काळ प्रकाशित होत होते. २१ जानेवारी १९४० ला अत्रे यांनी नवयुग हे वृत्तपत्र सुरू केले.
✴️इ.स. १९३४ साली सरस्वती सिनेटोनच्या दादा तोरण्यांच्या आग्रहाखातर नारद-नारदी चित्रपटाची कथा व संवाद अत्र्यांनी लिहून दिले. 'हंस पिक्स्चर्स'साठी इ.स. १९३७ साली त्यांनी इब्सेनच्या 'पिलर ऑफ द सोसायटी' या कथेवरून धर्मवीर, स्वतःच्याच कथांवरून प्रेमवीर ह्या मराठी व 'बेगुनाह' ह्या हिंदी चित्रपटांच्या पटकथा लिहून दिल्या. इ.स. १९३८ साली 'हंस' साठीच 'ब्रह्मचारी' चित्रपटाची कथा त्यांनी लिहून दिली. त्यांनी लिहिलेला 'ब्रॅंडीची बाटली' हा चित्रपटही लोकप्रिय ठरला.
✴️अत्र्यांनी राजगुरू व अभ्यंकर या इतर दोन भागीदारांसोबत एआरए या नावाने 'नवयुग चित्रपट कंपनी' काढली. पुढे 'हंस पिक्चर्स' मधले मास्टर विनायक, पांडुरंग नाईक, बाबूराव पेंढारकर हेदेखील भागीदार झाल्यावर या कंपनीने ’नवयुग पिक्चर्स’ असे नाव बदलून घेतले. इ.स. १९४० साली नवयुग पिक्चर्सतर्फे 'लपंडाव' चित्रपटाची कथा अत्र्यांनी लिहिली. 'लपंडाव' चित्रपटानंतर त्यांनी 'संत सखू' या चित्रपटाचे संवाद लिहिले. परंतु 'प्रभात'ने ही हाच विषय घेतला आहे या कारणाने मास्टर विनायकांनी त्याला विरोध केला. नवयुग पिक्चर्सने मग वि.स. खांडेकरांची 'अमृत' ही कथा घेऊन चित्रपट काढावयाचे ठरवले. या वादामुळे अत्र्यांनी नवयुग पिक्चर्स सोडले.
✴️अत्र्यांनी दिग्दर्शित केलेल्या "श्यामची आई" चित्रपटाला १९५४ साली सुरू झालेल्या "राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार" सोहोळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पहिले "सुवर्ण कमळ" मिळाले होते.
✴️आचार्य अत्र्यांनी मराठी भाषेत विपुल लेखन केले असून त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. त्यांनी आणि शंकर केशव कानेटकर (कवी गिरीश) यांनी संपादित केलेली अरुण वाचनमाला नावाची मराठीची क्रमिक पुस्तके शाळेच्या इंग्रजी पहिली ते इंग्रजी पाचवी (हल्लीची पाचवी ते नववी) च्या अभ्यासक्रमांत होती, सन १९३४ साली निघालेल्या या क्रमिक पुस्तकांसारखी सुरेख पुस्तके त्यापूर्वी आणि त्यानंतर कधीही निघाली नाहीत, असे शिक्षकांचे आणि पालकांचे मत आहे. ही पुस्तके पहायला मिळणेही अशक्यप्राय झाल्याने, डिंपल प्रकाशनाने या पुस्तकांची नवीन पुनर्मुद्रित आवृत्ती आचार्य अत्रे यांच्या ११९ व्या जयंतीनिमित्त १३ ऑगस्ट २०१७ रोजी बाजारात आणली आहे. आचार्य अत्रे यांचे नवयुग मराठा साप्ताहिकाचा पहिला अंक २१ जानेवारी १८४० रोजी प्रकाशित झाला.
🙏 स्रोत - विकिपीडिया
0 Comments