राम गणेश गडकरी - मराठी साहित्यिक

ओळख मराठी साहित्यिकांची 

साहित्यिक - राम गणेश गडकरी 

Ram Ganesh Gadakari  

📲 राम गणेश गडकरी यांच्या जीवन कार्यावर आधारित ऑनलाईन प्रश्नमंजुषा चाचणी सोडविण्यासाठी येथे क्लिक करा. 👈

🔻जन्म नाव - राम गणेश गडकरी

🔻टोपणनाव - गोविंदाग्रज , बाळकराम, सवाई नाटकी

🔻जन्म - २६ मे १८८५, गणदेवी, जि. नवसारी , गुजरात

🔻मृत्यू - २३ जानेवारी १९१९, सावनेर ,जि. नागपूर

🔻कार्यक्षेत्र - नाटककार, कवी, लेखक

🔻साहित्य प्रकार - कविता, नाटके, विनोदी कथा

🔻प्रसिद्ध साहित्यकृती - नाटके:' एकच प्याला, प्रेमसंन्यास, पुण्यप्रभाव, भावबंधन

🔻वडील - गणेश वासुदेव गडकरी

🔻आई - सरस्वतीबाई गणेश गडकरी 

✴️ राम गणेश गडकरी (टोपणनावे: गोविंदाग्रज, बाळकराम) हे मराठी कवी, नाटककार, आणि विनोदी लेखक होते. गोविंदाग्रज ह्या टोपणनावाने त्यांनी सुमारे १५० कविता लिहिल्या, आणि बाळकराम ह्या टोपणनावाने काही विनोदी लेख लिहिले. ह्या साहित्याच्या जोडीला 'एकच प्याला', 'प्रेमसंन्यास', 'पुण्यप्रभाव', आणि 'भावबंधन' ही चार पूर्ण नाटके (आणि 'राजसंन्यास' आणि 'वेड्यांचा बाजार' ही दोन अपुरी राहिलेली नाटके) लिहिली.

✴️ गडकरींचा जन्म मे २६, इ.स. १८८५ रोजी नवसारी येथील गणदेवी या गावात झाला. वयाच्या ८ व्या वर्षीच त्यांचे वडील गणेश वासुदेव गडकरी निवर्तले. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचा धाकटा भाऊ गोविंदही अकालीच मरण पावला. या कौटुंबिक धक्क्यांतून सावरताना गडकरींचे कुटुंब पुण्यात स्थायिक झाले. गडकऱ्यांचे शालेय शिक्षण पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये व त्यानंतरचे शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात झाले.

✴️ महाविद्यालयात शिकत असताना मित्राच्या ओळखीने गडकरी 'किर्लोस्कर नाटक मंडळी'त दाखल झाले. या किर्लोस्कर नाटक मंडळीने चालवलेल्या 'रंगभूमी नावाच्या मासिकातून, तसेच शिवराम महादेव परांजपे यांच्या काळ वृत्तपत्रातून व हरिभाऊ आपट्यांच्या 'करमणूक' नियतकालिकातून ते कविता, लेख लिहू लागले. कविता व लेखांसोबतच ते नाट्यलेखनही करू लागले. 

✴️ गडकऱ्यांच्या अनेक नाटकांची नावे ही पाच अक्षरीच आहेत. त्यांची नाटके हा आजही अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे. भावबंधन, एकच प्याला यांसारख्या नाटकांची तर आजही एव्हरग्रीन म्हणून जाहिरात केली जाते. वेड्याचा बाजार आणि राजसंन्यास ही त्यांची नाटके मात्र अपूर्ण राहिली. 

✴️ राम गणेश गडकरी लिखित नाटके

एकच प्याला

गर्वनिर्वाण

पुण्यप्रभाव

प्रेमसंन्यास

भावबंधन

मित्रप्रीती (अप्रकाशित)

राजसंन्यास

वेड्याचा बाजार 

✴️ वाग्वैजयंती हा गडकरींचा एकमेव काव्यसंग्रह आहे. यात मुक्तच्‍छंदापासून ते छंदबद्ध कवितेपर्यंत, आणि चार ओळींच्या कवितेपासून ते दहा पाने भरतील एवढ्या दीर्घकवितांपर्यंत अनेक प्रकार त्यांनी त्यात हाताळले आहेत. कवितालेखनासाठी गडकऱ्यांनी गोविंदाग्रज हे टोपण नाव घेतले होते. 

✴️ राम गणेश गडकऱ्यांनी 'मासिक मनोरंजन'मध्ये 'बाळकराम' ह्या टोपण नावाने विपुल लेखन केले. पुढे त्यांतील काही लेखांचा संग्रह 'रिकामपणची कामगिरी' ह्या नावाच्या पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाला. 

राम गणेश गडकरी यांना महाराष्ट्राचा ’शेक्सपियर’ समजले जाते. 

✴️ राम गणेश गडकरी यांचा अर्धपुतळा पुण्याच्या संभाजी उद्यानात उभा करण्यात आला. २३ जानेवारी १९६२ रोजी आचार्य अत्रे यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण झाले होते. 


🙏 स्रोत - विकिपीडिया

Post a Comment

0 Comments