महागाई भत्ता वाढ व महागाई भत्ता थकबाकी मिळणार मार्च 2022

 


राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ 

महागाई भत्ता 28 टक्के वरून 31%

3 महिन्यांची 11% प्रमाणे महागाई भत्ता वाढ थकबाकी मार्च 2022 च्या वेतनात रोखीने मिळणार

मार्च 2022 च्या वेतनात होणार वाढ ...

✴️राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता.

✴️आज दिनांक 30 मार्च 2022 रोजी शासनाने आदेश काढून  दिनांक १ जुलै, २०२१ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर २८ % वरुन ३१ % करण्यास सूचित केले आहे . सदर महागाई भत्ता वाढ दिनांक १ जुलै , २०२१ पासूनच्या थकबाकीसह माहे मार्च, २०२२ च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे.


✴️राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ बाबत शासन परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. 👈


✴️राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दिनांक १ जुलै , २०२१ ते दिनांक ३० सप्टेंबर , २०२१ या कालावधीत अनुज्ञेय महागाई भत्ता वाढीची थकबाकी मंजूर करण्याबाबत .

✴️राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर दिनांक १ जुलै , २०२१ पासून १७ % वरुन २८ % असा सुधारित करण्यात येऊन दिनांक १ ऑक्टोबर , २०२१ पासून सदर महागाई भत्त्याच्या वाढीची रक्कम रोखीने देण्याचा निर्णय घेण्यात आला होता . तसेच या सुधारणेनुसार दिनांक १ जुलै , २०२१ ते दिनांक ३० सप्टेंबर , २०२१ या ३ महिन्यांच्या कालावधीतील अनुज्ञेय थकबाकीबाबत स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करण्याचा देखील निर्णय घेण्यात आला होता . २ . शासन आता असे आदेश देत आहे की , राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दिनांक १ जुलै , २०२१ ते दिनांक ३० सप्टेंबर , २०२१ या ३ महिन्यांच्या कालावधीतील ११ % महागाई भत्ता वाढीच्या थकबाकीची रक्कम माहे मार्च , २०२२ च्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी.

✴️महागाई भत्ता वाढ थकबाकी मार्च 2022 च्या वेतनात रोखीने अदा करणे बाबतचा शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. 👈 



Post a Comment

0 Comments