डॉ. माधव पटवर्धन ( माधव जूलियन ) - मराठी साहित्यिक

 
ओळख मराठी साहित्यिकांची 

साहित्यिक - माधव त्रंबक पटवर्धन 

Madhav Trambak Patvardhan 

📲 मराठी साहित्य माधव त्र्यंबक पटवर्धन यांच्या जीवन कार्यावर आधारित प्रश्नमंजुष चाचणी सोडविण्यासाठी येथे क्लिक करा. 👈

🔻पूर्ण नाव - माधव त्रिंबक पटवर्धन

🔻टोपणनाव - माधव जूलियन

🔻जन्म - २१ जानेवारी, इ.स. १८९४; बडोदा

🔻मृत्यू - २९ नोव्हेंबर, इ.स. १९३९

🔻कार्यक्षेत्र - साहित्य

🔻साहित्य प्रकार -'कविता

🔻वडील - त्रिंबक विनायक पटवर्धन

🔻आई - उमा त्रिंबक पटवर्धन 

✴️ डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन  हे मराठी भाषेतील कवी, रविकिरण मंडळाचे संस्थापक व सर्वांत यशस्वी सदस्य होते. ते फारसी आणि इंग्रजीचे प्राध्यापक होते. माधवराव पटवर्धन हे मुंबई विद्यापीठाच्या मराठी साहित्यातील पहिल्या डी.लिट. पदवीचे मानकरी आहेत. इंग्लिश कवी शेले याने रचलेल्या ज्यूलियन आणि मडालो या कवितेवरून यांनी "जूलियन" असे टोपणनाव धारण केले. याशिवाय ’गॉड्ज गुड मेन’ या कादंबरीतील नायिका ’ज्युलियन’ या व्यक्तिरेखेवरून माधवरावांनी ज्युलियन हे नाव उचलले असेही सांगितले जाते.

✴️ गझल व रुबाई हे काव्यप्रकार फारसीतून मराठीत प्रथम आणण्याचे श्रेय माधवराव पटवर्धनांना देण्यात येते. माधव ज्युलियनांनी दित्जू, मा.जू. आणि एम्‌. जूलियन या नावांनीही लिखाण केले आहे. त्यांनी कविवर्य भा.रा. तांबे यांच्या कवितांचे संकलन आणि संपादन केले आहे. उत्कृष्ट संपादनाचा हा एक नमुना मानला जातो. पटवर्धनांचे काही लिखाण इंग्रजीतही आहे.

पटवर्धनांनी कवितांशिवाय भाषाशास्त्रीय लेखनही केले. सोप्या व शुद्ध मराठी लेखनाचे पुरस्कारणाऱ्या पटवर्धनांनी भाषाशुद्धि-विवेक हा ग्रंथ लिहिला. ह्या ग्रंथात कालबाह्य ठरलेल्या शेकडो मराठी शब्दांची सूची समाविष्ट आहे.

✴️ पटवर्धनांचा जन्म इ.स. १८९४ साली बडोदा, बडोदा संस्थान येथे झाला. त्यांनी इ.स. १९१६ साली फारसी भाषा हा विशेष विषय निवडून बी.ए. पदवी मिळवली, तर इ.स. १९१८ साली इंग्रजी साहित्य हा विषय निवडून एम.ए.चा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला. 

✴️ शिक्षणानंतर इ.स. १९१८ ते इ.स. १९२४ या कालखंडात ते फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे येथे फारसी भाषा शिकवत होते. त्यानंतर ते कोल्हापूर येथील राजाराम महाविद्यालयात फारसीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तेथे त्यांनी इ.स. १९२५ ते इ.स. १९३९ या काळात अध्यापन केले. माधव त्र्यंबक पटवर्धनांना त्यांच्या ’छंदोरचना’ या ग्रंथासाठी मुंबई विद्यापीठाने १ डिसेंबर १९३८ रोजी डी.लिट्. ही सन्माननीय पदवी दिली. मुंबई विद्यापीठाने मराठी साहित्यासाठी दिलेली ही पहिली डी.लिट. होती.

१९३९साली माधव ज्युलियन यांचे निधन झाले.

माधव जूलियन यांच्या पत्नी लीलाताई पटवर्धन यांनी आमची अकरा वर्षे (१९४५) या पुस्तकात माधवरावांच्या आठवणी सांगितल्या आहेत. 

✴️ पुरस्कार आणि गौरव - 

 🔸इ.स. १९३३ मध्ये नाशिक येथे झालेल्या कविसंमेलनाचे अध्यक्ष.

🔸इ.स. १९३४ मध्ये बडोदे येथे झालेल्या साहित्यसंमेलनात ते कविशाखेचे अध्यक्ष होते.

🔸अध्यक्ष, इ.स. १९३६ मध्ये जळगाव येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलन.

🔸"छंदोरचना" साठी मुंबई विद्यापीठाकडून डी. लिट. प्रदान. (मराठी साहित्यातील योगदानाबद्दल भारतातली पहिली डी. लिट.)(१ डिसेंबर १९३८)

🔸पुण्यातल्या टिळकरोडवरील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहाला ’माधवराव पटवर्धन सभागृह’ असे नाव देण्यात आले आहे.


🙏 स्रोत - विकिपीडिया

Post a Comment

0 Comments