जागतिक जल दिवस 💦
World Water Day 💦
22 मार्च 2022
📲 जागतिक जल दिनाच्या निमित्ताने प्रश्नमंजुषा चाचणी सोडविण्यासाठी येथे क्लिक करा. 👈
✴️ जागतिक जल दिन' हा एक आंतरराष्टीय दिवस आहे.प्रतिवर्षी २२ मार्च रोजी हा दिवस साजरा करण्यात येतो. स्वच्छ आणि ताज्या पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांची काळजी घेणे व त्यांच्या शाश्वत संरक्षणासाठी कार्यरत राहणे याचा संदेश देणे यासाठी या दिवसाची योजना केली गेली आहे.
✴️ UN (Water) म्हणजेच युनायटेड नेशन (वाॅटर) ही संस्था या दिवसाचे आयोजन करते.स्वच्छता आणि पाणी या दोन विषयांवर ही संस्था प्रामुख्याने काम करते.१९९३साली प्रथम जागतिक जल दिन साजरा करण्यात आला.
✴️ जगाला पाण्याच्या गरजेविषयी जागरूक करण्याच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक जल दिन साजरा करण्यास सुरूवात केली. १९९२ मध्ये ब्राझीलच्या रिओ दि जानेरो येथे आयोजित केलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण आणि विकास परिषदेत (UNCED) जागतिक जल दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यानंतर १९९३ पासून पाण्याच्या संरक्षणाचे महत्व समजून घेण्यासाठी सामुदायिक जागरूकता वाढविण्यासाठी हा दिवस दरवर्षी साजरा केला जाऊ लागला. पहिल्या जागतिक जल दिवसाचे आयोजन २२ मार्च १९९३ साली करण्यात आले होते.
✴️ यावर्षी जागतिक जल दिनाची थीम ही 'भूजल: अदृश्य दृश्यमान बनवणे' अशी आहे. ही थीम IGRAC म्हणजेच आंतरराष्ट्रीय भूजल संसाधन मूल्यांकन केंद्राद्वारे प्रस्तावित केली आहे.
✴️ पृथ्वीवर पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असले तरी त्यातील केवळ 2.5 टक्के पाणी वापरासाठी योग्य आहे. बाकी सर्व खारे पाणी आहे, जे सेवन करता येत नाही. त्यामुळे भावी पिढ्यांसाठी पाण्याचे संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे.
✴️ पाणी हेच जीवन आहे. पाण्याशिवाय सजीवसृष्टी याची कल्पानाही करता येणार नाही. हे सर्व असतानाही 30 वर्षापासून पाण्याचे महत्व पटवून देण्यासाठी हा जागतिक जल दिन साजरा केला जात आहे. काळाच्या ओघात जलस्त्रोत बदलले असले तरी पाण्याचा अपव्यय हा सुरुच आहे. त्यामुळेच 21 व्या शतकातही पाण्याचे संकट हे सर्वांसमोरच आहे. पाण्यासंबंधीच्या आव्हानावर मात करण्यासाठी निसर्गाचा कसा उपयोग करुन घेता येईल याची संकल्पना या जागतिक जल दिनाच्या निमित्ताने सर्वांसमोर मांडली जाते.
💦💦 पाणी हे जीवन आहे. पाणी अडवा पाणी जिरवा. पाणी वाचवा, जीवन वाचवा. 💦💦
0 Comments