शाळापूर्व तयारी अभियान अंतर्गत शाळास्तरावरील दुसरा मेळावा आयोजित करणेबाबत
Regarding organizing second meeting at school level under pre-school preparation campaign
💥 उपरोक्त विषयानुसार इयत्ता पहिलीला दाखलपात्र बालकांसाठी " शाळापूर्व तयारी अभियानाची " अंमलबजावणी करण्यात येत आहे . या उपक्रमांतर्गत शाळास्तरावरील शाळापूर्व तयारी मेळावा क्रमांक १ चे आयोजन माहे एप्रिल २०२२ मध्ये करण्यात आले होते.
💥 या मेळाव्याच्या आयोजनानंतर शाळेतले पहिले पाऊल पुस्तिका , कृतिपत्रिका व आयडिया कार्ड या साहित्याच्या आधारे बालकांची शाळापूर्व तयारी करून घेण्याची कार्यवाही शाळा / गाव / वस्ती स्तरावर सुरु आहे.
💥 याप्रमाणे साधारणपणे ८ ते १० आठवडे बालकांची शाळापूर्व तयारी करून घेतल्यानंतर उपक्रमाच्या पुढील टप्प्यामध्ये शाळास्तरावर शाळापूर्व तयारी मेळावा क्रमांक २ चे आयोजन करावयाचे आहे.
👉 शाळा सुरु झाल्यावर विदर्भामध्ये दि. २९ जून २०२२ रोजी व उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये दि. १५ जून २०२२ रोजी एकाच दिवशी जिल्ह्यातील जि.प. , म.न.पा. , व न.पा. च्या सर्व शाळांमध्ये शाळा स्तरावरील दुसऱ्या मेळाव्याचे आयोजन करण्यात यावे.
💥 शाळा स्तरावर मेळावा आयोजनाच्या अनुषंगाने आवश्यक सूचना पुढील प्रमाणे :
🔻१. जिल्ह्यातील जि.प. , म.न.पा. , व न.पा. च्या सर्व शाळांमध्ये मेळाव्याचे नियोजन व आयोजन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी जिल्हा परिषद शिक्षण विभाग , प्रशासन अधिकारी - म.न.पा . वन.पा. व ICDS विभाग यांच्या समन्वयाने करावे . मेळावे आयोजन करणेबाबतचे नियोजन पर्यवेक्षकीय अधिकारी व शाळांना कळवावे .
🔻२. दैनंदिन शालेय कामकाजाच्या वेळेत मेळाव्याचे आयोजन करण्यात यावे . मेळाव्याचा कालावधी साधारणपणे ४ तासांचा असावा .
🔻३. शाळेचे वातावरण प्रसन्न व आरोग्यदायी असावे याकरिता प्राधान्याने शालेय परिसर स्वच्छता करण्यात यावी .
🔻४. मेळाव्यामध्ये इयत्ता पहिलीला प्रवेशित / दाखल सर्व बालके व त्यांचे पालक सहभागी व्हावे , याकरिता ● मेळावा आयोजनाच्या आधी एक / दोन दिवस मेळाव्याबाबत वस्ती , गाव स्तरावर प्रभातफेरी , दवंडी देवून , समाजमाध्यमांचा उपयोग करून तसेच पोस्टर्स लावून जनजागृती करण्यात यावी , व त्या माध्यमातून इयत्ता पहिलीतील सर्व बालकांना व त्यांच्या पालकांना मेळाव्यात सहभागी करण्यात यावे .
🔻५. उपक्रमाच्या अनुषंगाने झालेल्या प्रशिक्षणातील मार्गदर्शनानुसार मेळाव्यामध्ये ७ स्टॉल्स लावले जावेत . सर्व स्टॉल्सवर बालकांच्या कृतींच्या नोंदी विकास पत्रावर दुसऱ्या मेळाव्याच्या रकान्यात करण्यात याव्यात .
👉 सदर ७ स्टॉल्स पुढीलप्रमाणे :
१ ) नोंदणी ( रजिस्ट्रेशन ) ,
२ ) शारीरिक विकास ( सूक्ष्म व स्थूल स्नायू विकास ) ,
३ ) बौद्धिक विकास ,
४ ) सामाजिक आणि भावनात्मक विकास ,
५ ) भाषा विकास ,
६ ) गणनपूर्व तयारी
७ ) पालकांना मार्गदर्शन .
🔻६. शाळास्तरावरील मेळावा क्र .२ चे आयोजन करण्याच्या अनुषंगाने शिक्षणाधिकारी प्राथमिक , प्राचार्य - डायट व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी समन्वयाने सर्व गटशिक्षणाधिकारी , बालविकास प्रकल्प अधिकारी , प्रशासन अधिकारी , म.न.पा. व न.पा. यांच्या बैठकांचे आयोजन करावे.
🔻७. गटशिक्षणाधिकारी व बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी सर्व शिक्षण विस्तार अधिकारी , केंद्रप्रमुख तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका यांची सभा घेऊन शाळास्तरावरील मेळावा क्र .२ चे नियोजन करावे .
🔻८. केंद्रप्रमुख यांनी केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक यांची बैठक घेऊन मेळाव्याच्या आयोजनाबाबत नियोजन करावे . त्यानुसार मुख्याध्यापकांनी सर्व शिक्षक , अंगणवाडी सेविका व स्वयंसेवक यांची बैठक घेऊन शाळास्तरावरील मेळाव्याचे नियोजन करावे .
🔻९ . मेळाव्या संदर्भातील फोटो , व्हिडिओ इ . माहिती समाजमाध्यमांवर प्रसारित करीत असतांना
#ShalapurvaTayariAbhiyan2022
# शाळापूर्वतयारीअभियान 2022 व
#Shalapurva Tayari2022
या हॅशटॅगचा ( # ) उपयोग करावा . तसेच मेळाव्यासंदर्भात प्रसारित करण्यात येणाऱ्या पोस्टसाठी SCERT , महाराष्ट्रच्या
http://www.facebook.com/Mahascert
या फेसबुक पेजला टॅग करण्यात यावे .
🔻१०. शाळास्तरावरील दुसऱ्या मेळाव्याची सांख्यिकीय माहिती पुढील मुद्द्यांच्या आधारे आपल्या स्तरावर गुगल लिंकद्वारे संकलित करण्यात यावी .
🔻११. उपरोक्त नमुन्याप्रमाणे शाळापूर्व तयारी मेळावा क्र . २ ची माहिती संकलित करून , मेळावा झाल्यानंतर पुढील आठ दिवसात जिल्ह्यतील जि.प. , म.न.पा. , व न.पा. च्या सर्व शाळांची एकत्रित माहिती ( एकसेल शीट ) बालशिक्षण विभागास सादर करावी . माहिती संकलनाकरिता राज्यस्तरावरून कोणतीही अन्य लिंक देण्यात येणार नाही .
🔻१२. शाळास्तरावरील मेळावा क्र . २ चे आयोजन सुव्यवस्थित रित्या व्हावे या करिता सर्व पर्यवेक्षीय अधिकारी यांनी योग्य सनियंत्रण करावे व मेळाव्यास भेटी द्याव्यात .
🔻१३. शाळांनी अधिकाधिक लोकप्रतिनिधींना मेळाव्यासाठी आमंत्रित करावे .
🔻१४.शाळापूर्व तयारी अभियान उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या बालकांच्या शाळापूर्व तयारीची जोडणी शिक्षकांनी इयत्ता पहिलीच्या पाठ्यक्रमाशी / विद्याप्रवेश मोड्यूलशी करावी .
🔻१५. मेळावे आयोजित करीत असताना शासनाने वेळोवेळी दिलेल्या कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्यात यावे .
0 Comments