राज्यातील प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे सन २०२२-२३ शैक्षणिक वर्ष सुरु करणेबाबत ...
Regarding starting the academic year 2022-23 of primary, secondary and higher secondary schools in the state.
महाराष्ट्र शासन • शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन परिपत्रक क्रमांकः संकीर्ण -२०२२ / प्र.क्र .१०३ / एस.डी. - ४ मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरु चौक , मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ . दिनांक : - १० जून , २०२२.
💥 शासन परिपत्रकानुसार संपूर्ण राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी आगामी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये शाळा सुरु करण्याबाबत निर्देश निर्गमित केलेले आहेत .
💥 त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये दुसरा सोमवार दि . १३ जून २०२२ रोजी शाळा सुरु करण्यात येतील तसेच जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता तेथील शाळा चौथा सोमवार दि . २७ जून २०२२ रोजी सुरु होतील . याअनुषंगाने पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत .
💥 दि . १३ जून २०२२ ते १४ जून २०२२ रोजी शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून शाळेची स्वच्छता करणे , शाळेचे सौंदर्यीकरण करणे , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोविड १ ९ प्रार्दुभाव तसेच आरोग्यविषयक बाबीचे अनुषंगाने उद्बोधन करणे याचे आयोजन करण्यात यावे.
👉 दि . १५ जून २०२२ पासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत येण्याच्या सूचना निर्गमित करण्यात याव्यात.
💥 तसेच विदर्भातील शाळांबाबत दि . २७ जून २०२२ ते २८ जून २०२२ रोजी शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून शाळेची स्वच्छता करणे , शाळेचे सौंदर्यीकरण करणे , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोविड -१ ९ चा प्रार्दुभाव तसेच आरोग्यविषयक बाबीचे अनुषंगाने उद्बोधन करणे याचे आयोजन करण्यात यावे.
दि . २९ जून २०२२ पासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत येण्याच्या सूचना निर्गमित करण्यात याव्यात .
🔻 शालेय शिक्षक वृंद व इतर कर्मचारी यांनी कोवीड- १ ९ प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन्ही मात्रा व त्यानंतरची बुस्टर मात्रा ( Precaution Dose ) घेण्यासाठी विभागाच्या स्तरावर आवश्यक कार्यवाही करावी.
🔻वयोगट १२ वर्षे व त्यापुढील विद्यार्थ्यांचे कोवीड- १ ९ प्रतिबंधात्मक लसीकरणाची व्याप्ती वाढविण्यावर भर द्यावा.
🔻कोवीड योग्य वर्तन ( Covid appropriate behavior ) चे शाळा व शालेय परिसरात पालन होईल याबाबत शालेय प्रशासनाने दक्षता घ्यावी.
🔻ज्या विद्यार्थ्यांना ताप किंवा इतर कोवीड सदृष्य लक्षणे आढळल्यास अश्या पाल्यांना शाळेत न पाठविण्याबाबत संबंधित पालकांना शाळा प्रशासनाने सूचना द्याव्यात व शाळेत उपस्थित विद्यार्थ्यांपैकी ज्या विद्यार्थ्यामध्ये ताप किंवा इतर कोवीड सदृष्य लक्षणे आढळल्यास अश्या विद्यार्थ्याचे शालेय स्तरावर तात्काळ विलगिकरण करण्यासाठीची व्यवस्था शालेय प्रशासनाने करावी , कोवीड सदृष्य लक्षणे आढळलेल्या विद्यार्थ्यांची तात्काळ रॅपीड अॅन्टीजन टेस्ट किंवा आरटीपीसीआर टेस्ट करण्यात यावी.
🔻ज्या विद्यार्थ्यांची कोवीड -१ ९ चाचणी पॉझीटीव्ह आली असेल त्या विद्यार्थ्यांच्या निकट संपर्कात असलेल्या विद्यार्थ्यांची सुध्दा रॅपीड अॅन्टीजन टेस्ट किंवा आरटीपीसीआर टेस्ट करण्याबाबत शालेय प्रशासनाने कार्यवाही करावी.
🔻कोविड परिस्थितीमध्ये शालेय शिक्षण विभागाकडून , आरोग्य विभागाकडून स्थानिक आपत्ती कक्षाकडून वेळोवेळी निर्देश / सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत तसेच यापुढे करण्यात आल्यास त्यांचे काटेकोरपणे पालन होईल याची दक्षता घ्यावी.
🔻शाळा पूर्व तयारीमध्ये स्थानिक प्रशासनाने विद्यार्थ्यांचे स्वास्थ्य व सुरक्षितता कशी चांगली राखता येईल याकडे जातीने लक्ष द्यावे.
🔻शाळेमध्ये येणाऱ्या मुलांचे / पालकांचे कोविड -१ ९ प्रार्दुभावाच्या अनुषंगाने प्रबोधन / उद्बोधन करण्यात यावे.
0 Comments