हर घर तिरंगा उपक्रम Har Ghar Tiranga

 

विषय : - स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत “ घरोघरी तिरंगा " उपक्रमाबाबत  

Har Ghar Tiranga 

Tiranga At Every House

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर , जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात , स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक / क्रांतिकारक स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे , तसेच स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत रहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावी , या उद्देशाने या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी दिनांक १३ ऑगस्ट २०२२ ते दिनांक १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे “ घरोघरी तिरंगा ' हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

✴️घरोघरी तिरंगा कार्यक्रमाबाबत काही महत्वपूर्ण सुचना देण्यात आल्या असून त्यापुढीलप्रमाणे आहेत. 

🔻१. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार घरोघरी तिरंगा कार्यक्रम दिनांक १३ ऑगस्ट २०२२ ते दिनांक १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या घरावर , तसेच सर्व शासकीय / निमशासकीय / खाजगी अस्थापना / सहकारी संस्था / शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंस्फूर्तीने करणे अपेक्षित आहे. 

🔻२. घरोघरी तिरंगा कार्यक्रमात दिनांक १३ ते १५ ऑगस्ट २०२२ हे तीन दिवस घरोघरी तिरंगा फडकवताना दररोज संध्याकाळी झेंडा खाली उतरावयाची आवश्यकता नाही . कार्यालयांना यासंबंधी ध्वज संहिता पाळावी लागेल.

🔻 ३. राज्याच्या मागणीनुसार केंद्र सरकारकडून केवळ तिरंगा झेंडा उपलब्ध होणार असून , त्यासोबत काठी मिळणार नाही . काठीची व्यवस्था स्थानिक स्तरावर करावयाची आहे.

🔻४. घरोघरी तिरंगा कार्यक्रमाच्या मार्गदर्शक सुचना व नियमावलीबाबत लोकांमध्ये जनजागृतीसाठी स्थानिक स्तरावर माहिती , शिक्षण व संवाद उपक्रमांचे आयोजन करावे.

✴️ स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत “ घरोघरी तिरंगा " उपक्रमाबाबत शासनाचे परिपत्रक तसेच मार्गदर्शक सूचना व उपयुक्त माहिती.👇



Post a Comment

1 Comments

  1. Thanks for sharing this useful information. Thankyou and good luck for the upcoming Blogs.
    HarGharTiranga

    ReplyDelete