श्री संत सावता माळी युवक संघातर्फे जि. प. केंद्र शाळा टाकळी बु. येथील विद्यार्थ्यांचा गुणगौरव.

 


श्री संत सावता माळी युवक संघातर्फे जि. प. केंद्र शाळा टाकळी बु. येथील विद्यार्थ्यांचा गुणगौरव.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने जिल्हा परिषद केंद्र शाळा टाकळी बु. येथे विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांचा गुणगौरव करण्यासाठी अखिल भारतीय श्री संत सावता माळी युवक संघ तालुका जामनेर या सामाजिक संघटनेच्या वतीने आज दिनांक 12 सप्टेंबर रोजी या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.



सदर कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात अखिल भारतीय श्री संत सावता माळी युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष सचिन भाऊसाहेब गुलदगड व प्रदेशाध्यक्ष जितेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या सुरू आहे.

      या कार्यक्रमाचे अध्यक्ष टाकळी गावाचे सरपंच डॉ. निवृत्ती सपकाळ हे होते. तर कार्यक्रमासाठी शाळेचे माजी मुख्याध्यापक तथा  शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सुपडू सोनार सर, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक  गणेश पाटील सर तसेच श्री संत सावता माळी युवक संघाचे जामनेर तालुकाध्यक्ष अमोल माळी, जळगाव जिल्हा सह संपर्कप्रमुख पंकजभाऊ सातव,  महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा सौ. उज्वलाताई चवरे हे उपस्थित होते. 



कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन  संदीप सोनार सर यांनी केले तर आभार तालुका अध्यक्ष अमोल माळी यांनी मानले.  सदर कार्यक्रमावेळी शाळेतील गरजू गरीब विद्यार्थ्यांना टाकळी खु. येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक  विजय पाटील सर यांचे कडून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. 

शाळेतील उपक्रमशील शिक्षक संदीप सोनार सर यांनी विद्यार्थ्यांना बचतीचे महत्त्व समजण्यासाठी किलबिल बचत बँक सुरू केली असून या बँकेचे उद्घाटन देखील यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.    विद्यार्थ्यांनी या बँकेत खाते उघडल्यानंतर त्यांना लगेच पासबुक देण्यात आले. 



या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंगणवाडीताई मोरे मॅडम, महाजन मॅडम, मंगलाताई तसेच शाळेचे मुख्याध्यापक मयबू तडवी, शिक्षकवृंद योगेश काळे, कीर्ती राजपूत, सुनिता सोनवणे यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments