NMMS EXAM 2022-23
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा ( NMMS ) २०२२-२३
दिनांक १०/१०/२०२२ पासून ऑनलाईन आवेदनपत्रे भरणे सुरू .......
✴️सन २००७-०८ पासून इयत्ता ८ वीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्याचा शोध घेऊन बुध्दिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करावे , त्यानुसार विद्यार्थ्याचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत व्हावी. आर्थिक दुर्बलतेमुळे प्रज्ञावान विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखावी हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
✴️इ. ८ वी तील आर्थिक दुर्बल घटकातील ज्या पालकांचे उत्पन्न रु .१,५०,००० / - पेक्षा कमी आहे त्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे सदर शिष्यवृत्तीचे वाटप होईल.
✴️अर्ज करण्याची पध्दत : -
दिनांक १०/१०/२०२२ पासून ऑनलाईन आवेदनपत्रे परिषदेच्या
व
या संकेतस्थळावर शाळांना उपलब्ध होतील.
✴️ पात्रता :
a ) महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय , शासनमान्य अनुदानित , स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता ८ वी मध्ये शिकत असलेल्या आणि खालील अटी पूर्ण करणाऱ्या नियमित विद्यार्थी विद्यार्थीनीस या परीक्षेस बसता येते.
b ) पालकांचे ( आई व वडील दोघांचे मिळून ) वार्षिक उत्पन्न १,५०,००० / - पेक्षा कमी असावे . नोकरीत असलेल्या पालकांनी आपल्या आस्थापना प्रमुखांचा व इतरांनी तहसीलदारांचा / तलाठ्यांचा सन २०२०-२१ च्या आर्थिक वर्षांचा उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकांकडे जमा करावा, सदरचा उत्पन्नाचा दाखला मुख्याध्यापकांनी शाळेत जतन करून ठेवावा.
c ) विद्यार्थी / विद्यार्थ्यांनी इ .७ वी मध्ये किमान ५५ % गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा. ( SC / ST चा विद्यार्थी किमान ५० % गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा. )
d ) खालील विद्यार्थी NMMS परीक्षेसाठी अपात्र आहेत .
• विनाअनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी .
• केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी
• जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी
● शासकीय वसतिगृहाच्या सवलतीचा, भोजनव्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी.
● सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी.
✴️ विद्यार्थ्यांची निवड : -
विद्यार्थ्यांची निवड लेखी परीक्षेमधून करण्यात येईल. संबंधित लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे व राज्याने निश्चित केलेल्या मागासवर्गीयांसाठीच्या आरक्षणानुसार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल.
✴️ परीक्षेचे वेळापत्रक :-
परीक्षा दिनांक १८ डिसेंबर 2022 रोजी घेण्यात येईल.
✴️ सदर परीक्षेसाठी दोन्ही विषयात मिळून विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण ४० % मिळणे आवश्यक आहेत . ( SC , ST , व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण ३२ % मिळणे आवश्यक आहेत . )
✴️परीक्षेसाठी विषय : -
सदर परीक्षेसाठी २ विषय असतील.
a ) बौध्दिक क्षमता चाचणी ( MAT ) ही मानशास्त्रीय चाचणी असून , त्यामध्ये कार्यकारणभाव , विश्लेषण , संकलन इत्यादी संकल्पनांवर आधारित ९ ० बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतात.
b ) शालेय क्षमता चाचणी ( SAT ) : - ही सामान्यत : इयत्ता ७ वी व इयत्ता ८ वीच्या अभ्यासक्रमांवर आधारित असेल.
त्यामध्ये
१. सामान्य विज्ञान एकूण ( गुण -३५ )
२. समाजशास्त्र ( एकूण गुण ३५ )
३. गणित ( एकूण गुण - २० )
असे तीन विषय असतील. या तीन विषयांचे एकूण ९० प्रश्न सोडवायचे असतात . उपविषयावर गुणांची विभागणी खालीलप्रमाणे असेल.
a) सामान्य विज्ञान ३५ गुण : - भौतिकशास्त्र ११ गुण , रसानशास्त्र ११ गुण , जीवशास्त्र १३ गुण .
b) समाजशास्त्र ३५ गुण : - इतिहास १५ गुण , नागरिकशास्त्र ०५ गुण , भूगोल १५ गुण
c) गणित २० गुण . माध्यम : - प्रश्नपत्रिका मराठी , इंग्रजी , हिंदी , गुजराथी , उर्दू , सिंधी , कन्नड व तेलुगू या आठ माध्यमातून उपलब्ध असतील. ( सर्व विद्यार्थ्यांना मूळमाध्यमाबरोबर इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका एकत्र देण्यात येणार आहे. ) यापैकी कोणतेही एकच माध्यम घेता येईल.
✴️ दोन्ही प्रश्नपत्रिकांसाठी स्वतंत्र उत्तरपत्रिका दिल्या जातील. प्रत्येक प्रश्नक्रमांकापुढे पर्यायांसाठी ४ वर्तुळे असतील . योग्य पर्यायाचे वर्तुळ निळे / काळे बॉलपेनने पूर्णत : रंगवून उत्तर नोंदवायचे आहे . पेन्सिलचा वापर केलेली / अपुरी / अशंत : रंगवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत . एकापेक्षा अधिक वर्तुळात नोंदविलेली / उत्तरे / चुकीच्या पध्दतीने नोंदवलेली उत्तरे / व्हाईटनर / खाडाखोड करुन नोंदविलेली किंवा गिरवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत.
✴️आरक्षण व शिष्यवृत्ती संख्या : -
अखिल भारतील पातळीवर NMMS शिष्यवृत्तींची संख्या एक लाख इतकी आहे . महाराष्ट्रासाठी ११६८२ इतका कोटा निश्चित करुन दिलेला आहे . कोटयानुसार व राज्याच्या संवर्गनिहाय आरक्षणानुसार , गुणवत्तेच्या आधारे जिल्हानिहाय , संवर्गनिहाय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते . दिव्यांगासाठी ( अपंगासाठी ) प्रत्येक संवर्गात राज्याच्या दिव्यांग आरक्षणानुसार आरक्षण.
✴️ निकाल घोषित करणे : -
सदर परीक्षेचा निकाल साधारण फेब्रुवारी २०२३ च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवडयात जाहीर करण्यात येईल. सदर परीक्षेचा निकाल व निवड यादी फक्त परिषदेच्या संकेतस्थळावरच उपलब्ध केली जाईल. जिल्हयांनी , शाळांनी व विद्यार्थ्यांनी सदरचा निकाल परिषदेच्या संकेतस्थळावरुनच काढावयाचा आहे.
✴️शिष्यवृत्ती दर : -
शिष्यवत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास इ . ९ वी ते १२ वी पर्यंत दरमहा रु . १,००० / ( वार्षिक रु . १२,००० / - ) शिष्यवृत्ती दिली जाते .
● शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी इ . ९ वी व इ . ११ वी मध्ये किमान ५५ % गुण मिळणे आवश्यक आहे ( SC / ST विद्यार्थ्यांना किमान ५० % गुणांची आवश्यकता आहे . ) इ . १० वी मध्ये किमान ६० % गुण मिळणे आवश्यक आहेत . ( SC / ST विद्यार्थ्यांना किमान ५५ % गुणांची आवश्यकता आहे . ) सदर शिष्यवृत्ती वितरणाचे काम शाळेचे मुख्याध्यापक , शिक्षणाधिकारी ( माध्य . ) व मा . शिक्षण संचालक ( माध्य . व उच्च माध्य . ) यांचे मार्फत केले जाते.
✴️ NMMS परीक्षेसंदर्भातील शासन परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. 👈
0 Comments