टाकळी बु. गावात शिक्षक पालक मेळावा संपन्न



टाकळी बु. गावात शिक्षक पालक मेळावा संपन्न
   दिनांक 3 फेब्रुवारी 2024 शनिवार रोजी सायंकाळी टाकळी बु. गावात जिल्हा परिषद केंद्रशाळा टाकळी बु. यांचे कडून शिक्षक पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर मेळाव्यात पाल्यांच्या उज्वल भविष्यासाठी एकत्र येऊन चर्चा करण्यात आली. 
  संदिप सोनार सर यांनी पालकांना विद्यार्थी हिताच्या दृष्टीने विविध बाबींचे मार्गदर्शन केले व जनजागृती केली. तसेच शाळेतील विविध उपक्रमांची माहिती दिली. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनिल महाले यांनी गावाच्या विकासासाठी शिक्षणाचे महत्त्व पालकांना पटवून दिले. मुख्याध्यापिका किर्ती राजपूत व रजनी पाटील मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या उपस्थिती व अभ्यासासाठी पालकांना आवाहन केले. यावेळी जून महिन्यापासून एकही दिवस गैरहजर न राहणाऱ्या सार्थक दिलीप माळी, राधिका मनोज खुर्दे, धनश्री योगेश कुंभार या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला.
    एक तास वाचनासाठी व अभ्यासासाठी हा उपक्रम गावात सुरू करण्यात येणार असून सर्व पालक सायंकाळी 7 ते 8 या वेळेत टिव्ही , मोबाईल बंद ठेऊन आपल्या पाल्याचे वाचन व अभ्यास करून घेतील.
सदर शिक्षक पालक मेळाव्यास अनेक माता , पालक, अंगणवाडी सेविका उपस्थित होते. यावेळी महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम देखील घेण्यात आला. तसेच मुली वाचवा मुली शिकवा यासाठी प्रतिज्ञा देखील घेण्यात आली.
     या शिक्षक पालक मेळाव्यासाठी सरपंच वंदना भाऊराव मोरे, उपसरपंच प्रताप खरादे, ग्रामपंचायत सदस्य वंदना ईश्वर परदेशी, सविता सुरेश माळी, किशोर शंकर माळी, कैलास खाटीक तसेच शा. व्य. समिती अध्यक्ष अनिल महाले, उपाध्यक्ष सोपान माळी, सदस्य कविता ज्ञानेश्वर माळी, सविता गजानन माळी, ज्योती अनिल माळी, उषाबाई दिलीप सोनवणे, मीराबाई गदखने, सुभाष शिंदे, जगनभाऊ माळी, शेख गफुर, वंदना धनराज मोरे, अंगणवाडी सेविका उज्वला चवरे, निर्मला महाजन, मंगलाताई मोरे,  सर्व शिक्षकवृंद तसेच ग्रामस्थ व पालक उपस्थित होते.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदिप सोनार यांनी तर आभार प्रदर्शन योगेश काळे यांनी केले. हा शिक्षक पालक मेळावा यशस्वी करण्यासाठी किर्ती राजपूत, सुनीता सोनवणे, रजनी पाटील, संदिप सोनार, योगेश काळे, अनिल महाले, सोपान माळी यांनी परिश्रम घेतले.
















Post a Comment

0 Comments