World Environment Day जागतिक पर्यावरण दिवस

 

5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन - World Environment Day म्हणून साजरा केला जातो.

पर्यावरण (Environment) हा शब्द मूळ फ्रेंच शब्द ‘Environ’ या शब्दापासून तयार झाला आहे. ‘Environ’ म्हणजे ‘Surrounding or encircle’. सजीव-निर्जीव यांच्यामधील क्रिया-प्रतिक्रिया व आंतरक्रियांमधून साकार झालेली सजीवाच्या सभोवतालची परिस्थिती म्हणजे पर्यावरण होय.

पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे, हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे.

1972 साली युनोच्या  सर्वसाधारण सभेने, मानव व पर्यावरण याविषयी आयोजित केलेल्या परिषदेत, पर्यावरण दिन साजरा करण्याचे ठरविले. 1974 पासून संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस साजरा करायला सुरुवात केली आणि त्यानंतर दरवर्षी एक थीम ठरवून जगभरातली सरकारं, उद्योग, विविध संस्था पर्यावरणाशी संबंधित त्या विषयासाठी प्रयत्न करत असतात. दरवर्षी एका देशाकडे पर्यावरण दिनाचे  यजमानपद दिले जाते व त्या देशात अधिकृतपणे कार्यक्रम पार पडतात. यावर्षी पाकिस्तान या देशाकडे यजमानपद देण्यात आलेले आहे. 2021 वर्षासाठीची थीम आहे - रिइमेजिन, रिक्रियेट, रिस्टोअर ( Reimagine. Recreate. Restore.) इकोसिस्टीम रिस्टोरेशन (Ecosystem Restoration). म्हणजे परिसंस्थेची हानी रोखत तिचं संतुलन भरून काढण्याचे प्रयत्न करणं. 2020 या वर्षाच्या पर्यावरण दिनाची थीम होती "जैवविविधतेचे महत्त्व' ! सन 2020 चे यजमानपद हे संयुक्तपणे कोलंबिया आणि जर्मनी देशाकडे होते.  5 जून 2018 , जागतिक पर्यावरण दिनाची विश्व संकल्पना , प्लास्टिक प्रदूषण टाळा अशी होती.  संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम ( यूएनईपी ) या पर्यावरणविषयक आंतरराष्ट्रीय संस्थेने या वर्षीच्या जागतिक पर्यावरण दिनाचे यजमानपद भारताकडे दिले होते.  प्लास्टिक व थर्मोकोल बंदीबाबत राज्य शासनाने धोरण जाहीर करून प्लास्टिकमुक्तीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

पहिल्या महायुद्धानंतर मानवाच्या निसर्गावरील आघाताचे परिणाम शास्त्रज्ञांच्या लक्षात आले . त्याचप्रमाणे औद्योगिक क्रांतीच्या फळांबरोबर त्याचे दूरगामी गंभीर परिणाम मानवाला भेडसावू लागले . म्हणून इ.स. 1960 मध्ये पर्यावरणशास्त्र किंवा पर्यावरण विज्ञान हे विषय अभ्यासासाठी स्वतंत्रपणे लागू करण्यात आले .जॉर्ज पर्किन व मर्श यांनी त्यांच्या ' मॅन अँड नेचर ' या पुस्तकात ( 1907) मानव व नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर व त्याचे विपरीत परिणाम यावर चर्चा केली आहे . त्यांचे हे पुस्तक पर्यावरण शिक्षण देणारे पहिले पुस्तक ठरते . 1899 मध्ये पॅट्रिक गेडेस यांनी ' द आऊटलूक टॉक ' या नावाची संस्था स्थापन केली . या संस्थेचे कार्य ' पर्यावरण शिक्षण सुधारणा ' असे होते . पर्यावरण शिक्षणातून जाणीव , जागृती करून पर्यावरणाचा हास थांबवणे यासाठी 1965 मध्ये पर्यावरण शिक्षण हा विषय शिक्षणशास्त्रात समाविष्ट करण्यात आला.

  • गेल्या वर्षापासून कोरोनाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे पर्यावरणाला लाभ झाला आहे.
  • अनेक देशातील प्रदूषणाचा टक्का घसरल्याचे, वन्य जीव मुक्त संचार करू लागल्याचे समोर आले आहे.
  • पर्यावरण संरक्षण ही सामाजिक जबाबदारी असून समाजातील प्रत्येकाने पर्यावरण संरक्षणासाठी काम करणे ही आपली सामाजिक बांधीलकी आहे. त्यासाठी प्रत्येकाने झाडे लावली पाहिजेत तसेच ती जागविली पाहिजेत. वृक्षांचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. त्याच प्रमाणे प्लॅस्टिकचा वापर टाळला पाहिजे. आपली वसुंधरेचे रक्षण करण्यासाठी व पर्यावरणाचा होणारा ऱ्हास रोखण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे.
  • सर्वांना जागतिक पर्यावरण दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !!!
  • 🌲🌴🌲🌴🌲🌴🌲
  • झाडे लावा. झाडे जगवा.
  • जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने विशेष प्रश्नमंजुषा चाचणी सोडविण्यासाठी 👈 येथे क्लिक करा.

<

Post a Comment

0 Comments