महाराष्ट्र कृषी दिन. वसंतराव नाईक जयंती.

 


महाराष्ट्र कृषी दिन व
वसंतराव नाईक यांची जयंती.
1 जुलै 2022

राज्याचे 11 वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्रातील उत्पादन वाढीसाठी उल्लेखनिय काम केले. त्यामुळे महाराष्ट्र राज्य अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाले. १ जुलै हा दिवस त्यांची जयंती कृषिदिन म्हणून साजरा केला जातो.
1 जुलै 1913 रोजी वसंतराव नाईक यांचा  जन्म यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद या गावाजवळील गहुली या छोट्याश्या खेड्यातील एका सधन शेतकरी कुटुंबात झाला.
वसंतराव नाईक हे महाराष्ट्र राज्याचे तिसरे मुख्यमंत्री व एक कृषितज्ञ होते. त्यानी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक काळ राज्यभार सांभाळला. 5 डिसेंबर 1963 ते 20 फेब्रुवारी 1975 या कालखंडा दरम्यान वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. 
त्यांनी सर्वात पहिले पुसद नगरपालिकेचे अध्यक्षपद भूषविले होते. ते महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय नेते होते. हरित क्रांतीचे प्रणेते अशी त्यांची ओळख होती. वसंतरावांचे प्राथमिक शिक्षण हे विविध खेड्यांमध्ये झाले. पुढे त्यांनी विठोली व अमरावती येथे माध्यमिक शिक्षण घेऊन नागपूरच्या मॉरिस कॉलेजमधून बी.ए. ही पदवी घेतली (१९३८) व नंतर एल्एल्.बी ही पदवीही मिळविली (१९४०). विद्यार्थिदशेत त्यांच्यावर महात्मा जोतिबा फुले व डेल कार्नेगी या दोहोंच्या विचारांची छाप पडली होती. वसंतरावांनी कायद्याची पदवी घेऊन पुसद येथे वकिलीस सुरुवात केली. हळूहळू त्यांचा वकिलीत जम बसू लागला व आर्थिक स्थितीही सुधारली तसेच त्यांची हळूहळू प्रतिष्ठाही वाढली. नंतर ते पुसद कृषिमंडळाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. 
१९५६ मध्ये राज्यपुनर्रचनेनंतर विदर्भ व मराठवाडा हे प्रदेश मुंबई द्विभाषिक राज्यात समाविष्ट झाल्यानंतर वसंतराव यशवंतरावांच्या मंत्रिमंडळात कृषिमंत्री झाले (१९५७). त्यानंतर १९६० मध्ये स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर ते प्रथम महसूल मंत्री होते. १९६२ च्या निवडणुकीनंतरही कन्नमवारांच्या मंत्रिमंडळात ते महसूल मंत्री होते; पण कन्नमवारांच्या मृत्यूनंतर ते बहुमताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले (१९६३). या पदावर त्यांनी १२ वर्षे काम केले. या काळात त्यांनी महाराष्ट्रात अनेक सुधारणा केल्या. प्रथमतः त्यांनी कृषिविषयक समस्या हाताळून महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत कसा स्वयंपूर्ण होईल याकडे लक्ष दिले. ‘दोन वर्षात महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही, तर मी स्वतः फाशी जाईन’ असे त्यांनी 1965 मध्ये निक्षून सांगितले; त्यांचा प्रशासकीय दृष्टिकोन अतिशय व्यावहारिक असे. काँग्रेसचे दारूबंदी हे धोरण असतानासुद्धा त्यांनी महाराष्ट्रात दारूबंदी शिथिल करून लोकांना चांगली दारू उपलब्ध केली व हातभट्ट्यांना आळा घालण्याचा प्रयत्न केला. कोणतीही समस्या ते विचारविनिमय करून तडजोडीच्या धोरणाने सोडवीत असत. त्यांनी शिक्षण, शेती वगैरे बाबतींत लक्ष घालून अनेक सुधारणा केल्या. विशेषतः महाराष्ट्रातील पाझर तलाव व वसंत बंधारा यांच्या निर्मितीचे श्रेय वसंतरावांकडेच जाते. वसंतराव नाईक यांचे निधन 18 ऑगस्ट 1979 रोजी सिंगापूर येथे झाले.
हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏💐

♦️ महाराष्ट्र कृषी दिन   -
महाराष्ट्रातील शेतीची वैशिष्ट्ये
1 महाराष्ट्रातील एकुण शेतीपैकी 56% पेक्षा जास्त क्षेत्र निवड लागवडीखाली आहे त्यानुसार महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक लागतो

2 राज्यातील दुबार पीक क्षेत्रात महाराष्ट्राचा देशात 18 वा क्रमांक लागतो महाराष्ट्राचा 8% भागच दुबार पिकाखाली आहे महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रापैकी 83% क्षेत्र कोरडवाहू शेतीखाली आहे

3 राज्यात अन्नधान्याचे उत्पादन गरजेच्या 80% होतात व उर्वरित 20% उत्पादन आयात करून गरज भागवली जाते

4 ऊस उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर आहदेशातील 10% पेक्षा जास्त ऊस उत्पादन महाराष्ट्रात होते

5 भारतातील उससे क्षेत्राच्या 33% क्षेत्र महाराष्ट्रात आहे व त्यातून देशाच्या 37% साखर उत्पादन होते

6 देशातील अन्नधान्य क्षेत्राच्या 11% क्षेत्र महाराष्ट्रात असून येथे देशातील 7% पेक्षा कमी उत्पादन होते

7 महाराष्ट्रातील एकूण लागवडीखालील क्षेत्रापैकी केवळ 17. 80% क्षेत्र ओलिताखाली आहे तर हेच प्रमाण राष्ट्रीय पातळीवर 45% आहे.
महाराष्ट्राच्या जास्त पर्जन्याच्या प्रदेशामध्ये भात हे पीक घेतले जाते 
पूर्व महाराष्ट्रातील अमरावती या जिल्ह्यात संत्र्याच्या बागाखलील क्षेत्र सर्वात जास्त आहे
गहू हे ठंड हवामानातील पीक आहे
काजूचे पीक हे जांभ्या मृदेत चांगले वाढते
कापसाची काळी मृदा रेगुर या नावाने ओळखली जाते
ज्वारी पीकाखालील क्षेत्र व उत्पादन यामध्ये महारष्ट्र राज्य अग्रेसर आहे
ज्वारीच्या पिकासाठी लागणारे हवामान म्हणजे उच्च तापमान व कमी पाऊस
रत्नागिरी जिल्हा हापुस या प्रकारच्या आंब्यांसाठी प्रसिद्द आहे.


Post a Comment

0 Comments