Bridge Course For std. 2 to 10. इयत्ता 2 री ते 10 वी साठी सेतू अभ्यासक्रम

Bridge Course For std. 2 to 10
सेतू अभ्यासक्रम  Bridge Course 
राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी 1 जुलैपासून 45 दिवसांचा सेतू अभ्यासक्रम हा उपक्रम राबवला जाणार आहे.


सेतू अभ्यासक्रमाचे स्वरूप

▶️इयत्ता दुसरी ते दहावीच्या मराठी व उर्दू माध्यमाच्या मराठी, गणित, इंग्रजी, विज्ञान हिंदी व सामाजिकः शास्त्र या विषयासाठी ४५ दिवसाचा सेतू अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे.
सदर सेतू अभ्यासक्रम इयत्तानिहाय व विषयनिहाय तयार करण्यात आला असून मागील इयत्ताच्या महत्त्वाच्या क्षमतांवर आधारित आहे. हा अभ्यासक्रम सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी पूर्ण
करावयाचा आहे. सेतू अभ्यासक्रमामध्ये दिवसनिहाय कृतिपत्रिका (worksheets) देण्यात आल्या असून सदर कृतिपत्रिका या विद्यार्थीकद्रित, कृतीकेंद्रित तसेच अध्ययन निष्पत्ती आधारित आहेत विद्यार्थी स्वयंअध्ययन करू शकतील असे त्यांचे स्वरूप आहे.

▶️विद्यार्थ्यांनी त्या त्या दिवसाची कृतिपत्रिका शिक्षक / पालक / शिक्षक मित्र / सहाध्यायी / स्वयंसेवक / विद्यार्थी मित्र यांच्या मदतीने सोडवाव्यात. या विषयनिहाय सर्व कृतिपत्रिका विद्यार्थ्यांनी स्वतंत्र वहीमध्ये किंवा शक्य असल्यास त्याची छपाई (print) करून त्यामध्येही सोडवू शकतात जेणेकरून शिक्षकांना अंतर्गत मूल्यमापनासाठी त्यांचा उपयोग होईल

▶️सदर सेतू अभ्यासक्रमामध्ये ठराविक कालावधीनंतर ३ चाचण्या देण्यात आलेल्या आहेत त्या विद्यार्थ्यांनी सोडविणे आवश्यक आहे. शिक्षकांनी या चाचण्या विद्यार्थ्यांकडन  ऑनलाईन घेऊन तपासा सेतू अभ्यासक्रमाची अंमलबजावणी/ ऑफलाईन पद्धतीने सोडवून चाचण्यांच्या गुणांची नोंद शिक्षकांनी स्वतःकडे ठेवणे आवश्यक आहे.

सेतू अभ्यासक्रमाचे अंमलबजावणी :

▶️ सेतू अभ्यासक्रम राबविण्याविषयक सविस्तर सर्व सूचना शिक्षक व विद्यार्थ्यासाठी अभ्यासक्रमाच्या सुरुवातीला देण्यात आलेल्या आहेत. तसेच संबोध अधिक स्पष्टनेकरिता ई साहित्याच्या लिंक देण्यात आलेल्या आहेत. दि. १ जुलै २०२१ ते १४ ऑगस्ट २०२१ या कालावधीमध्ये सेतू अभ्यासक्रमाची अमलबजावणी एकूण ४५ दिवसांकरिता करावयाची आहे.

▶️सदर सेतू अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतरच त्या त्या इयत्तेच्या अभ्यासक्रमाची अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुरु करण्यात यावी मागील इयत्ताच्या महत्त्वाच्या क्षमता या अभ्यासक्रमातून संपादित होतील याकरिता सेतु अभ्यासक्रम राबविण्याची कार्यवाही आपल्या स्तरावरून काटेकोर पद्धतीने करण्यात यावी सदर अभ्यासक्रमाच्या पीडीफ फाईल संकेतस्थळावरून डाऊनलोड करून प्रिंट करूनही वापरता येतील.

▶️ उपरोक्त सेतू अभ्यासक्रम www.maa.ac.in  या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे.

सदर सेतू अभ्यासक्रमाबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांना तसेच संबंधित सर्व घटकांना अवगत करण्यात यावे. तसेच सेतू अभ्यासक्रमाच्या कार्यवाहीचा पाठपुरावा आपल्या स्तरावरून वेळोवेळी घेण्यात याव्यात.

सेतू अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी कशी करावी याबाबत मार्गदर्शक सूचना डाऊनलोड करण्यासाठी 👈 येथे CLICK करा.


सेतू अभ्यासाबाबत मार्गदर्शक सूचना व अभ्यासक्रम कशाप्रकारे डाऊनलोड  करायचा ,हे जाणून घेण्यासाठी  खालील मार्गदर्शक व्हिडिओ पहा.

मराठी माध्यम :

इयत्ता दुसरी ते इयत्ता दहावी सर्व विषय सेतू अभ्यास खालीलप्रमाणे :

अनु. इयत्ता डाऊनलोड 
1दुसरीDownload 
2तिसरीDownload 
3चौथीDownload 
पाचवीDownload 
5सहावीDownload 
6सातवीDownload 
7 style="font-family: Arya; font-size: medium;">आठवीDownload 
8नववीDownload 
9दहावीDownload 

इयत्ता 5 वी ते इयत्ता दहावी  सेतू अभ्यासक्रम एका क्लिकवर डाऊनलोड करा. 


http://maa.ac.in/index.php?tcf=bridge_course

वरील लिंक वापरून शिक्षकांनी इयत्तानिहाय व विषयनिहाय सेतू अभ्यासक्रम डाउनलोड करावा.

विद्यार्थ्यांसाठी / पालकांसाठी सूचना :

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो !
आपण शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये आपल्याला नेहमीप्रमाणे शाळेत जाता आले नाही, पण आपले शिक्षक तुमच्यापर्यंत विविध माध्यमातून शिक्षण पोहोचविण्याचा प्रयत्न करीत होते. आपली नियमित शाळा भरत नव्हती तरी शिक्षण सुरूच होते. आता आपण नवीन शैक्षणिक वर्षासाठी सज्ज होत आहोत. शैक्षणिक वर्ष 2021-22 ची पूर्वतयारी तसेच मागील वर्षीच्या अभ्यासक्रमाची उजळणी व्हावी, या उद्देशाने हा सेतू अभ्यासक्रम तयार केला आहे.

1. मागील इयत्तेतील महत्त्वाच्या संकल्पनांवर या वर्षीचा पाठ्यक्रम आधारित आहे, अशाच संकल्पनांचा समावेश या सेतू अभ्यासक्रमात करण्यात आला आहे.

2. सेतू अभ्यासक्रमाचा कालावधी 45 दिवस निश्चित करण्यात आला असून त्यात तीन चाचण्यांचा समावेश आहे.
या चाचण्या सेतू अभ्यासक्रमातील कृतिपत्रिकांवर आधारित आहेत. 

3. सेतू अभ्यासक्रमातील प्रत्येक कृतिपत्रिका महत्त्वाच्या संकल्पना स्पष्ट करण्याच्या हेतूने तयार केली आहे.

4. कृतिपत्रिकेची रचना खालीलप्रमाणे करण्यात आली आहे.

• समजून घेऊ या कृतिपत्रिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या संकल्पना येथे दिल्या आहेत. 
संदर्भ: मागील वर्षीच्या पाठाचा संदर्भ देण्यात आला आहे.

• अध्ययन निष्पत्ती / क्षमता विधाने दिलेल्या कृतिपत्रिकेतून साध्य होणारी अध्ययन निष्पत्ती व विकसित होणा-या क्षमता. 
• लक्षात घेऊ या संकल्पना अधिक स्पष्ट होण्यासाठी थोडक्यात स्पष्टीकरण देण्यात आले आहे. यामध्ये तक्ते, संकल्पना चित्रे, ओघतका, आकृत्या, इ. चा वापर करण्यात आला आहे.
• सराव करू या : समजून घेतलेल्या संकल्पना व पाठ्यांशाचा अधिक सराव होण्यासाठी ज्ञान, आकलन, उपयोजन आणि कौशल्य यांचा समतोल राखून प्रश्नांची रचना करण्यात आली आहे.
अधिक अभ्यासासाठी दिक्षा लिंक्स: कृतिपत्रिकेतील संकल्पनांचे दृढीकरण पोर्टलवरील संबंधित संकल्पनांच्या व्हिडिओ लिंक्स दिल्या आहेत.

5. शिक्षकांच्या मार्गदर्शनाने कृतिपत्रिका सोडवाव्यात. अभ्यासात सातत्य राहण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या संपर्कात राहावे.

6. प्रत्येक कृतिपत्रिकेसाठी नेमून दिलेल्या कालावधीतच ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा.

7. कृतिपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरे एका स्वतंत्र वहीमध्ये सोडवून ती वही अंतर्गत मूल्यमापनासाठी जपून ठेवावी.

8. छोट्या कृती तसेच प्रयोगांची मांडणी करण्यात आली आहे. त्या विद्यार्थ्यांनी पालक किंवा शिक्षकांच्या उपस्थितीत कराव्यात.

9. कृतिपत्रिकेच्या शेवटी दिलेल्या लिंक्सचा वापर करून विद्यार्थ्यांनी संबंधित व्हिडिओ पाहून संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजावून घ्याव्यात.

10. कृतिपत्रिका सोडविताना काही अडचण आल्यास आपल्या पालक किंवा शिक्षकांची मदत घ्या. 

आम्हाला खात्री आहे की तुम्ही हा सेतू अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करून नवीन शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी आत्मविश्वासाने तयार व्हाल. प्रामाणिकपणे आणि स्वप्रयत्नाने सेतू अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा !

शिक्षकांसाठी सूचना

शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये उद्भवलेल्या कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या जागतिक संकटामुळे प्रत्यक्ष वर्ग अध्यापनामध्ये अनेक अडचणी आल्या आपण सर्वांनी विविध माध्यमांचा वापर करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रश्नचिन्ह आहे. आपल्या विद्याध्यांनी शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये केलेल्या अध्ययनाची उजळणी होणे आवश्यक आहे, तसेच वर्तमान शैक्षणिक वर्षांच्या अभ्यासक्रमाची पूर्वतयारी होण्याच्या उद्देशाने हा सेतू अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.

प्रयत्न केला. त्यात आपल्याला उत्तम यशही मिळाले. परंतु प्रत्यक्ष अध्यापन होत नसल्याने त्या प्रयत्नांनाही अनेक मर्यादा येत होत्या. अद्यापही संकट पूर्णपणे टळलेले नाही. शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये शाळा सुरू होण्याबाबत

1. सेतू अभ्यासक्रम 45 दिवसांच्या कालावधीत पूर्ण करून घ्यायचा आहे.

2. या सेतू अभ्यासक्रमात मागील वर्षाच्या अत्यंत महत्त्वाच्या संकल्पनांचा समावेश करून कृतिपत्रिका स्वरूपात मांडण्यात आल्या आहेत.

3. प्रत्येक कृतिपत्रिका तयार करताना सहज उपलब्ध होणान्या साहित्याचा वापर करून विद्याथ्र्यांना सहज करता येतील अशा कृती, छोटे प्रयोग यांची मांडणी करण्यात आली आहे.

4. कृतिपत्रिकेची रचना व्यवस्थित समजावून घ्या, म्हणजे त्या सोडवून घेणे सुलभ होईल.

• समजून घेऊ या मागील वर्षीच्या पाठाशी संबंधित कृतिपत्रिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या महत्त्वाच्या संकल्पना येथे दिल्या आहेत. या वर्षी ज्या संकल्पना विस्तारित झाल्या आहेत, अशा गेल्या वर्षीच्या संकल्पनांवर जास्त भर देण्यात आलेला आहे. 
संदर्भ: मागील वर्षीच्या पाठाचा संदर्भ देण्यात आला आहे. विद्याथ्र्यांचा संदर्भासाठी मागील वर्षीचे पाठ्यपुस्तक वापरण्यासंबंधी सूचना द्याव्यात.

● अध्ययन विष्पत्ती / क्षमता विधाने दिलेल्या कृतिपत्रिकेतून साध्य होणारी अध्ययन विकसित होणा-या क्षमता यांचा समावेश करण्यात आलेला आहे. कृतिपत्रिका सोडवून घेताना अध्ययन निष्पत्ती साध्य होण्याकडे, तसेच संबंधित क्षमता विकसित होण्याकडे लक्ष द्यावे.

● लक्षात घेऊ या संकल्पना अधिक स्पष्ट होण्यासाठी थोडक्यात स्पष्टीकरण देण्यात आले आहे. यामध्ये तक्ते, संकल्पना चित्रे, औधतके, आकृत्या, इ. चा वापर करण्यात आला आहे. येथे आपण इतरही विविध अध्ययन अनुभवांची रचना करू शकता. महत्त्वाचे मुद्दे आणि संक्षिप्त माहिती आपले अध्यापन सुलभ होण्यासाठी देण्यात आली आहे. आपण आपल्या उपलब्ध सा संकल्पनांच्या स्पष्टीकरणात भर घालू शकता.

● सराव करु या समजून घेतलेल्या संकल्पनाचा, पाठ्यांशाचा अधिक सराव होण्यासाठी ज्ञान, आकलन, उपयोजन आणि कौशल्य यांचा समतोल राखून प्रश्नांची रचना करण्यात आली आहे. प्रत्येक कृतिपत्रिकेतील सराव प्रश्न स्वतंत्र वहीत विद्याथ्र्यांकडून लिहून घ्यावेत. यामुळे उजळणीसोबतच लेखनसरावही होईल. सेतू अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर या वह्या जमा करून ठेवाव्यात. अधिक अभ्यासासाठी दिक्षा लिंक्स: कृतिपत्रिकेतील संकल्पनांचे दृढीकरण होण्यासाठी दिक्षा पोर्टलवरील संबंधित संकल्पनाच्या व्हिडिओ लिंक्स दिल्या आहेत. या लिंकवरील व्हिडिओ विद्यार्थ्यांना घरी पाहण्यासंबंधीच्या सूचना याव्यात.

5. वर्तमान इयत्तेतील विविध संकल्पना समजून घेण्यासाठी विद्याथ्र्यांचे पूर्वज्ञान जागृत करण्यासाठी तसेच विद्यार्थ्याच्या अध्ययनाचा आढावा घेण्यासाठी हा सेतू अभ्यासक्रम उपयुक्त ठरणार आहे.

6. अनुक्रमणिकेत दिलेल्या नियोजनानुसार कृतिपत्रिका काटेकोरपणे सोडवून घ्याव्यात. 7. सेतू अभ्यासक्रमातील कृतिपत्रिका विद्यार्थी प्रामाणिकपणे व स्वप्रयत्नाने सोडवतील याकडे असावे, विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेऊन योग्य ती मदत करावी,

8. ठराविक घटकांची उजळणी झाल्यानंतर देण्यात आलेल्या चाचण्या विद्याथ्र्यांकडून सोडवून घ्याव्यात. चाचण्या तपासून त्यांना योग्य निकषांचा अवलंब करून गुणदान करावे व गुणांची नोंद करून ठेवावी. 

9. प्रत्येक चाचणीचे मूल्यमापन झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना उपचारात्मक अध्यापनाची आवश्यकता आहे, त्या विद्यार्थ्यांना योग्य असे मार्गदर्शन करावे. याप्रमाणे तीनही चाचण्यांची अंमलबजावणी करावी. 

10. हा 45 दिवसांचा सेतू अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर आपल्या नियमित अभ्यासक्रमाच्या अध्यापनास सुरुवात करावी.

शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी मनःपूर्वक शुभेच्छा !


Post a Comment

0 Comments