Online Inauguration of Bridge Course. ब्रीज कोर्सचे ऑनलाईन उद्घाटन

 

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांचेमार्फत निर्मित सेतू अभ्यासक्रम ( Bridge Course च्या ऑनलाईन उद्धाटन व विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु रहावे याकरिता राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांच्या उद्दबोधन कार्यक्रमास उपस्थित राहणेबाबत ...
 Attendance of various initiatives for online inauguration of Bridge Course created by State Council of Educational Research and Training, Maharashtra , Pune  and to continue the education of students ..

उपरोक्त विषयास अनुसरून , सद्यस्थितीमध्ये कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षामध्ये नियमित शाळा सुरु होऊ शकल्या नाहीत . -शाळा बंद , पण शिक्षण सुरु  या कार्यक्रमांतर्गत ऑनलाईन / ऑफलाईन माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु रहावे याकरिता विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत . तथापि यामध्ये सर्वच विद्यार्थ्यांच्या सर्व इयत्तानिहाय विषयनिहाय क्षमता संपादित होण्यामध्ये अडचणी येऊ शकतात.त्यामुळे मागील वर्षातील क्षमता संपादित न होता विद्यार्थी पुढील शैक्षणिक वर्षामध्ये प्रविष्ट झाले असल्याची शक्यता गृहीत धरून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र , पुणे यांचेमार्फत सर्वच विद्यार्थ्यांसाठी सेतू अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे . सदर सेतू अभ्यासक्रमाचे उद्घाटन सोमवार दिनांक २८ जून २०२१ रोजी सकाळी .११.०० वाजता मा . ना.वर्षाताई गायकवाड , मंत्री , शालेय शिक्षण विभाग यांचे हस्ते ऑनलाईन स्वरूपामध्ये होणार आहे . मा . वंदना कृष्णा , अपर मुख्य सचिव , शालेय शिक्षण व क्रीडा विभाग , मा . विशाल सोळंकी , आयुक्त ( शिक्षण ) , महाराष्ट्र राज्य , पुणे , मा . राहुल द्विवेदी , राज्य प्रकल्प संचालक , महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद , मुंबई यांच्या उपस्थितीमध्ये सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे .
♦️ सदर कार्यक्रमास उपस्थिती राहण्यासाठी ( कार्यक्रम पाहण्यासाठी ) खालील लिंक वर क्लिक करा. 👇








Post a Comment

0 Comments