Dekho Apana Desh Web series Part 6. देखो अपना देश.

  

◆ देखो अपना देश DEKHO APANA DESH  WEBINAR ◆

 वेबिनार मालिका  ( भाग 6 )

22 ऑगस्ट 2021

     

          राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांच्या तर्फे दिनांक १८ जुलै २०२१ पासून प्रत्येक रविवारी सुरु केलेल्या देखो अपना देश या वेबिनार मालिकेतील पुढील भाग घेऊन येत आहोत  -

“Making India an Inclusive Travel Destination For All”

पर्यटन मंत्रालय, भारत सरकार द्वारा लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांचे  अध्ययन सतत सुरू राहण्याच्या उद्देशाने “देखो अपना देश” या वेबिनार मालिकेचे प्रसारण झालेले आहे. 

सदर मालिका ही इंग्रजी व हिंदी अशा दोन्ही भाषेत प्रसारित झाली असून त्यात 89 वेबिनार्सचा समावेश आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अप्रत्यक्ष प्रवास घडवून पर्यटनाचा आनंद व माहिती यांचा खजिना आपल्यापर्यंत पोहचविण्यात आलेला आहे. 

या मालिकेअंतर्गत आपल्या देशातील विविध ऐतिहासिक, भौगोलिक, धार्मिक स्थळे/शहरे व तेथील लोकसंस्कृतीची माहिती रंजक स्वरूपात देण्यात आलेली आहे. या माहितीचा उपयोग विद्यार्थी ज्ञानात वाढ होण्यास उपयुक्त ठरणार आहे. तसेच शिक्षकांचे  अध्यापन समृद्ध होण्यास मदत  होणार आहे. 

यातील सहाव्या वेबिनारमध्ये “Making India an Inclusive Travel Destination For All” या अंतर्गत भारताला प्रवासातील सर्वसमावेशक असे गंतव्य बनविणे या उद्देशाने भारतातील समावेशक व्यक्ती व त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्यासोबत सुंदर पर्यटन स्थळ असणाऱ्या शहराचा इतिहास, रचना, स्थापत्य व इतर वैशिष्ट्यांविषयी सविस्तर चर्चा केलेली आहे.

तसेच सर्व व्यक्ती याचे ज्ञान घेऊ शकतील या पद्धतीने सादरीकरण केलेले आहे.

भटकंती करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते.  ते पूर्ण करण्यासाठी सर्वसमावेशक अशा स्वरूपाचा आभासी सफरीच्या माध्यमातून चित्र-विचित्र भूरूपे, बर्फाच्छादित पर्वतशिखरे, स्फटिकासारखे साफ थंडगार पाणी, पहाडी संस्कृती इत्यादीचा अनुभव घेण्यासाठी  -

*“Making India an Inclusive Travel Destination For All”* पुढील लिंक  द्वारे आपणास पाहण्यास उपलब्ध करून देण्यात येत आहे. 

 You tube link- 

*“Making India an Inclusive Travel Destination For All”*  

 https://www.youtube.com/watch?v=bV8f3eFj64E

सदर वेबिनार लिंक सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षक यांना उपलब्ध करून देण्यात यावी.


                                                                                                          एम. डी. सिंह (भा.प्र.से.)                                                                  संचालक                                                  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे

                                                                                                                    

Post a Comment

0 Comments