सोबत इयत्ता निहाय उपक्रमांचे नियोजन देण्यात येत आहे . दिलेल्या नियोजनानुसार उपक्रमाची आठवडानिहाय अंमलबजावणी करणे आवश्यक आहे . वाचन आनंददायी पद्धतीने होण्याकरिता सदर उपक्रमाची साध्या , सहज व आनंददायी पद्धतीने रचना करण्यात आलेली आहे . या रचनाचे संचलन सुकर होण्याकरिता आवश्यक संदर्भ साहित्य / स्त्रोत हे शाळा , घर या स्तरावर सहज उपलब्ध होऊ शकेल अशा पद्धतीने देण्यात आलेले आहे तसेच शाळा बंद असण्याच्या स्थितीत करावयाच्या कृतीही देण्यात आल्या आहेत . आवश्यक बदलांबाबत यात सूचित करण्यात आलेले आहे . तसेच सदर अभियानाच्या अनुषंगाने सहभागी घटकांच्या भूमिका व जबाबदारी या दृष्टीने मार्गदर्शक सूचना ही पत्रासोबत देण्यात येत आहेत.
१.) १०० दिवसांकरिता बाचन अभियान या कार्यक्रमाची दि . १ जानेवारी पासून सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये अंमलबजावणी करण्यात यावी ..
२.) सर्व पर्यवेक्षक यंत्रणांनी अभियानाच्या जनजागृतीकरिता प्रयत्नशील रहावे .
३.) प्रत्येक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेद्वारे सदर कार्यक्रमाच्या गुणवत्तेचे सनियंत्रण करण्याकरिता गोष्टीचा शनिवार या उपक्रमाचे समन्वयक यांना जिल्हास्तरीय नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात यावे..
४.) अभियानातील विविध उपक्रमाबाबत अहवाल तयार करण्यात यावा , तसेच नोडल अधिकारी यांनी अभियानाचं योग्य व्हिडीओ तयार करून तसेच क्षणचित्रे निवडून लिंक मध्ये अपलोड करावेत . या बाबतची लिंक स्वतंत्ररित्या कळवण्यात येईल .
५.) या वाचन अभियान उपक्रमाच्या सोशल मिडिया वरील प्रसारासाठी पुढील Hashtag वापरण्यात यावेत.
# 100days Reading Campaign
#Padhe Bharat
तरी दि . १ जानेवारी २०२२ पासून सोबत जोडलेल्या नियोजनानुसार व सूचनांनुसार आपल्या अधिनस्त सर्व व्यवस्थापनाच्या तसेच सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये अभियानाची योग्य व यशस्वी अंमलबजावणी करण्यात यावी.
💥 वाचन अभियान सहभागी घटकांच्या भूमिका आणि जबाबदारी : - मार्गदर्शक सूचना 👇
0 Comments