Dr. Babasaheb Ambedkar Punyatithi

 


डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन ( पुण्यतिथी ) 
Dr. Babasaheb Ambedkar Punyatithi 

6 डिसेंबर 2021  


महापरिनिर्वाण दिन किंवा महापरिनिर्वाण दिवस हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन असून तो ६ डिसेंबर रोजी आयोजित केला जातो. आंबेडकरांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण (निधन) झाले होते, याच्या दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिमसंस्कार करण्यात आले. निधनापूर्वी त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता, त्यांना बौद्ध लोक 'बोधिसत्व' मानतात. आंबेडकर हे बौद्ध गुरु होते, यामुळे त्यांच्या पुण्यतिथीसाठी 'महापरिनिर्वाण' हा बौद्ध संकल्पनेतील शब्द वापरण्यात आला आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त १ डिसेंबर पासून मुंबईतील त्यांचे समाधीस्थळ असलेल्या चैत्यभूमी येथे भारतभरातून लक्षावधी लोक येतात. चैत्यभूमी येथे २५ लाखाहून अधिक भीमानुयायी जमा होतात, व चैत्यभूमी स्तूपात ठेवलेल्या आंबेडकरांच्या अस्थीकलश व प्रतिमेस अभिवादन करतात व बाबासाहेबांचे दर्शन घेतात. या दिवशी भारत तसेच जगभरातील आंबेडकरवादी व्यक्ती आंबेडकरांची प्रतिमा व मुर्ती समोर ठेवून त्याच्या स्मृतीस अभिवादन करतात. स्थानिक बौद्ध विहारे (बौद्ध मंदिरे), स्वतःच्या घरी, सार्वजनिक स्थळी, शाळा-महाविद्यालये, शासकिय कार्यालये इ. या ठिकाणी या दिवशी त्यांना अभिवादन करतात. राजकीय नेते व इतर मंडळी बाबासाहेबांच्या सार्वजनिक ठिकाणच्या आंबेडकर स्मृतीस्थळांना वंदन करतात

🔻 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा परिचय - 
टोपणनाव: बाबासाहेब, बोधिसत्त्व
जन्म: एप्रिल १४, इ.स. १८९१
महू, इंदूर जिल्हा, मध्य प्रदेश, ब्रिटिश भारत
मृत्यू: डिसेंबर ६, इ.स. १९५६
दिल्ली, भारत
चळवळ: दलित बौद्ध चळवळ
संघटना: बहिष्कृत हितकारणी सभा
समता सैनिक दल
स्वातंत्र्य मजूर पक्ष
डिप्रेस्ड क्लास एज्युकेशन सोसायटी
शेड्यूल कास्ट फेडरेशन
पीपल्स एज्युकेशन सोसायटी
पत्रकारिता/ लेखन: मुकनायक
बहिष्कृत भारत
समता
जनता
प्रबुद्ध भारत
पुरस्कार: भारतरत्न (१९९०)
प्रमुख स्मारके: चैत्यभूमी, मुंबई
धर्म: बौद्ध धर्म (मानवता)
प्रभाव: गौतम बुद्ध
संत कबीर
महात्मा फुले
वडील: सुभेदार रामजी सकपाळ
आई: भीमाबाई रामजी सकपाळ
पत्नी नाव: रमाबाई आंबेडकर
डॉ. सविता आंबेडकर
अपत्ये: यशवंत भीमराव आंबेडकर

 डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (१४ एप्रिल १८९१ – डिसेंबर ६, १९५६) हे जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ, कायदेपंडीत, समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, इतिहासकार, शिक्षणतज्ज्ञ, धर्मशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, लेखक, प्राध्यापक, समाज सुधारक, बॅरीस्टर, वक्ते, पत्रकार, जलतज्ज्ञ, संपादक, स्वातंत्र्य सेनानी, संसदपटू, मानवी हक्कांचे कैवारी आणि बौद्ध धर्म पुनरुत्थानक होते. शिवाय ते भारत देशातील कोट्यवधी शोषित पददलितांचे उद्धारक आणि स्वतंत्र्य भारतीय संविधानाचे शिल्पकार होते. ते बाबासाहेब या नावाने प्रसिद्ध आहेत. ‘बाबा’ म्हणजेच ‘पिता’ किंवा 'वडील' आणि ‘साहेब’ हा आदर व्यक्त करण्यासाठीचा शब्द आहे. सर्वप्रथम बाबासाहेबांच्या हयातीतच त्यांचे अनुयायी त्यांना ‘बाबासाहेब’ म्हणत असत, नंतरच्या काळात हेच नाव रूढ झाले आणि त्यांचे विरोधकही त्यांना बाबासाहेब संबोधू लागले. आज संपूर्ण भारत आणि विश्व त्यांना ‘बाबासाहेब’ संबोधीत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भीमा, भीम, भिवा, भीमराव, भीमराज, बाबा, बाबासाहेब इत्यादी नावांनी संबोधिले जाते. विश्वरत्न, विश्वमानव, विश्वभूषण, युगपुरूष, युगप्रवर्तक, महामानव, महापुरूष, उच्च विद्याविभूषीत, परोपकारी, क्रांतीसूर्य, प्रज्ञासूर्य, घटनासम्राट, घटनापती, बुद्धीसम्राट, समाजसूर्य, मसिहा, भारत भाग्यविधाता, महाविद्वान अशा अनेक उपाधींनी बाबासाहेबांना भारतीय जनतेने गौरविले आहे.

👉 डॉ.बाबासाहेब आंबेडकर  यांच्या विषयी अधिक माहिती साठी  येथे क्लिक करा. 






Post a Comment

0 Comments