महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त ३० जानेवारी रोजी राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये विविध कार्यक्रम घेणे व राज्यस्तरीय ऑनलाईन व्याख्यान आयोजित करणेबाबत .
On the occasion of Mahatma Gandhi's Punyatithi, on 30th January, to conduct various programs and to organize state level online lectures in all management schools of the state.
✴️महात्मा गांधी यांनी संपूर्ण जीवनात विविध टप्प्यांवर आपल्या आचारातून आणि विचारांतून दिलेले संदेश एकविसाव्या शतकातही महत्त्वपूर्ण आहेत . १ ९ ३७ सालच्या वर्धा येथील शिक्षण परिषदेत त्यांनी ' नयी तालीम ' शिक्षण पद्धती देऊन आपली शिक्षणविषयक भूमिका मांडली . ७ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळाले पाहिजे , शिक्षणाचे माध्यम हे मातृभाषा असावे , साक्षरतेला शिक्षण म्हणता येणार नाही , शिक्षणामुळे माणसातील मानवीगुणांचा विकास झाला पाहिजे , शिक्षण हे साध्य नसून साधन आहे , अशी त्यांची भूमिका होती , त्यांच्या प्रत्येक कृतीमागे एक ठाम विचार होता , जो मानवाला शाश्वत विकासाकडे घेऊन जाणारा आहे . भारताला स्वतंत्र राष्ट्र म्हणून घडविण्यात मोलाचा सहभाग असणाऱ्या या महात्म्याच्या स्मृतीदिनानिमित्त व हुतात्मा दिनानिमित्त ३० जानेवारीला राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना व नव्या पिढीला महात्मा गांधीजींच्या विचारांची ओळख करून देणे आवश्यक आहे . त्या अनुषंगाने सर्व शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी विविध शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती .
✴️ “ शिक्षण ही मानवी जीवनावर दीर्घकाळ परिणाम करणारी प्रभावी प्रणाली आहे . " असे म्हणत नयी तालीमच्या रूपाने देशाला शिक्षणाची देणगी देणाऱ्या महात्मा गांधीजींचा स्मृतिदिनानिमित्त त्यांनी देशाला दिलेल्या 3H ( Heart , Hand and Head ) मन , मनगट आणि मस्तक यांचा विचार प्रत्येक शिक्षकापर्यंत पोहोचावा , शिक्षकांनी तो विद्यार्थ्यांमध्ये रुजवावा यासाठी हुतात्मा दिन , ३० जानेवारी २०२२ ला विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या आणि सर्व माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी खालील विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत . यामध्ये शाळा , विद्यार्थी , पालक , लोकप्रतिनिधी , विविध क्षेत्रातील मान्यवर यांचा सक्रिय सहभाग घेण्यात यावा .
✴️ शाळा स्तरावर घ्यावयाचे विविध कार्यक्रम -
🔻इयत्ता - सर्व शाळांमध्ये
उपक्रम - प्रतिमापूजन
हुतात्मा दिनानिमित्त महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व प्रार्थना गायन
🔻सर्व सहभागी घटक
उपक्रम - स्वच्छता
आपले घर व परिसर यांची स्वच्छता करणे.
🔻इयत्ता - पहिली ते पाचवी
उपक्रम - प्रार्थना व स्वावलंबन
१ ) महात्मा गांधीच्या आवडीच्या प्रार्थना / भजन यांचे गायन व वेशभूषेसह एकपात्री अभिनय
२ ) ३० तारखेला घरातील स्वत : ची कामे स्वत : करणे दिवसभरातील उत्कृष्ट कृतीचे सादरीकरण
🔻इयत्ता - सहावी ते आठवी
उपक्रम - सत्कृत्य
या उपक्रमांतर्गत केलेल्या चांगल्या कामांचा दोन मिनिटांचा व्हिडीओ अपलोड करणे . उदा . स्वच्छता , स्वावलंबन , प्रामाणिकपणा , खरे बोलणे , नीटनेटकेपणा , आई - बाबा , भाऊ , बहिण , आजी - आजोबा , शेजारी , नातेवाईक यांना कोणत्याही कामात केलेली मदत .
🔻इयत्ता - नववी ते बारावी
उपक्रम - हस्त - उद्योग
स्वत : ची आवड / छंद याचा विचार करून एका हस्त - उद्योगाची माहिती घ्यावी व दोन मिनिटांचे व्हिडीओ चित्रीकरण करुन अपलोड करावे.
🔻शाळास्तर, तालुकास्तर, जिल्हास्तर
उपक्रम - १ ) मातृभाषेतून शिक्षण २ ) अहिंसा
१ ) मातृभाषेतून शिक्षण यातील विविध पैलूंवर परिसंवाद आयोजित करणे .
२) वक्तृत्व स्पर्धा आयोजित करणे .
विषय - १ ) अहिंसात्मक वृत्ती काळाची गरज
२) उचललेस तु मीठ मुठभरी , साम्राज्याचा खचला पाया .
३ ) चलेजाव चळवळ
🔻राज्यस्तर
उपक्रम - SCERT मार्फत मान्यवरांची महात्मा गांधी यांचे जीवन आणि | विचार यावर LIVE व्याख्यान.
दि . ३० जानेवारी २०२२
वेळ : सकाळी ११.००
लिंक : https://youtu.be/eKc8s4rZei4
उपरोक्त प्रमाणे विद्यार्थी व शिक्षकांनी कार्यक्रमाचे आयोजन करून आपल्या सादरीकरणाचा २ ते ३ मिनिटांचा सुस्पष्ट व्हिडीओ , फोटो व इतर साहित्य समाजसंपर्क माध्यमावर ( फेसबुक , ट्वीटर , इंस्टाग्राम ) #naitalim2022 या HASHTAG ( # ) चा वापर करून अपलोड करण्यात यावे व त्या पोस्टची लिंक https://scertmaha.ac.in/competitions/
इथे देण्यात यावी . सदर कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत शिक्षण संचालक ( प्राथमिक ) व शिक्षण संचालक ( माध्यमिक व उच्च माध्यमिक ) यांनी आपल्या स्तरावरून आवश्यक त्यासूचना निर्गमित कराव्यात . सदर कार्यक्रमाचे आयोजन करीत असताना कोविड -१ ९ च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या सामाजिक अंतर राखणे व स्वच्छतेच्या आवश्यक त्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी .
0 Comments