रणजित देसाई - मराठी साहित्यिक

 

ओळख मराठी साहित्यिकांची 

साहित्यिक - रणजित देसाई

Ranjit Desai 

📲 साहित्यिक रणजित देसाई यांच्या जीवन कार्यावर आधारित ऑनलाईन प्रश्नमंजुषा चाचणी सोडविण्यासाठी येथे क्लिक करा. 👈

🔻पूर्ण नाव - रणजित रामचंद्र देसाई

🔻जन्म - ८ एप्रिल १९२८, कोल्हापूर, महाराष्ट्र

🔻मृत्यू - ६ मार्च १९९२, मुंबई, महाराष्ट्र

🔻कार्यक्षेत्र -   साहित्य

🔻साहित्य प्रकार - कादंबरी, नाटक, ललित कथा

🔻प्रसिद्ध साहित्यकृती - स्वामी

🔻वडील - रामचंद्र देसाई

🔻पुरस्कार - पद्मश्री 

✴️रणजित रामचंद्र देसाई हे प्रसिद्ध मराठी कादंबरीकार होते. त्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या विशेष प्रसिद्ध आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील श्रीमान योगी आणि थोरले माधवराव पेशवे यांच्या जीवनावरील स्वामी, या कादंबऱ्यांना मराठी साहित्यविश्वात मानाचे स्थान आहे. त्यांना स्वामीकार या नावाने ही ओळखले जाते.

✴️मराठीत ऐतिहासिक कादंबरी लेखनाची मोठी परंपरा आहे. रणजीत देसाई हे या नामावलीतील फार वरचे नाव. छत्रपती शिवाजी महाराजांवरील त्यांची 'श्रीमान योगी' ही मराठीतील एक श्रेष्ठ कादंबरी गणली जाते.

✴️शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व लेखनातून पेलणे ही बाब सोपी नाही. हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी समोरच्या शत्रूशी सुरू असलेली लढाई आणि त्याचवेळी घरच्या आघाडीवर सुरू असलेले समर प्रसंग यातून महाराजांनी कार्य सिद्धीस नेले.

✴️महाराजांच्या या पराक्रमाविषयीची नोंद पुस्तकात आहेच, पण एक पिता म्हणूनही त्यांची वेगळी मांडणी आहे. त्यामुळे हे पुस्तक वाचायला हातात घेतले की खाली ठेववत नाही. ' स्वामी' ही देसाईंची आणखी एक लोकप्रिय कादंबरी. याशिवाय देसाईंची 'पावनखिंड' ही आणखी एक ऐतिहासिक कादंबरी. त्यांची 'राधेय' ही कर्णावरची कादंबरीही लोकप्रिय आहे. राजा रविवर्मा या श्रेष्ठ भारतीय चित्रकारावरील चरित्रात्मक कादंबरी आवर्जून वाचण्यासारखी आहे.

✴️१९७३ मध्ये पद्मश्री देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या स्वामी कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. १९९० मध्ये त्यांना महाराष्ट्र गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.

✴️रणजीत देसाई यांनी केलेले लेखन :

🔻कादंबरी - बारी, माझे गाव, स्वामी, श्रीमान योगी, राधेय, लक्ष्यवेध, समिधा, पावन खिंड, राजा रविवर्मा, अ‍भोगी, प्रतीक्षा, शेकरा

🔻कथा संग्रह - रूप महाल, मधुमती, जल कालवा, गंधाली, अलख, मोरपंखी सावल्या, कातळ, बाबुलमोरा, संकेत, प्रपात, मेघा, वैशाखी, आषाढ

🔻नाटक - कांचनमृग, धन अपुरे, पंख झाले वैरी, स्वरसम्राट तानसेन, गरूडझेप, रामशास्त्री, श्रीमानयोगी, स्वामी, पांगुळवाडा, लोकनायक, हे बंध रेशमाचे, तुझी वाट वेगळी, सावली उन्हाची.

🔻चित्रपट - रंगल्या रात्री, सवाल माझा ऐका, नागिन.

✴️प्राप्त पुरस्कार

🔸१९६३ - स्वामी कादंबरीसाठी महाराष्ट्र राज्य पुरस्कार

🔸१९६३ - स्वामी कादंबरीसाठी हरी नारायण आपटे पुरस्कार

🔸१९६४ - स्वामी कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार

🔸१९७३ - पद्मश्री पुरस्कार

🔸१९९० - महाराष्ट्र गौरव पुरस्कार 


🙏 स्रोत - इंटरनेट, विकिपीडिया

Post a Comment

0 Comments