त्रंबक बापूजी ठोंबरे - मराठी साहित्यिक

 

ओळख मराठी साहित्यिकांची 

साहित्यिक - त्र्यंबक बापूजी ठोंबरे (बालकवी) 

Trambak Bapuji Thombare - Balkavi 

📲 मराठी साहित्यिक त्र्यंबक बापूजी ठोंबरे - बालकवी यांच्या जीवन कार्यावर आधारित ऑनलाईन प्रश्नमंजुषा चाचणी सोडविण्यासाठी येथे क्लिक करा. 👈

🔻पूर्ण नाव - त्रंबक बापूजी ठोंबरे

🔻टोपणनाव - बालकवी

🔻जन्म - १३ ऑगस्ट १८९०, धरणगाव, महाराष्ट्र, 

🔻मृत्यू - ५ मे १९१८, जळगाव, महाराष्ट्र, 

🔻कार्यक्षेत्र - साहित्य

🔻साहित्य प्रकार - कविता

🔻वडील - बापूजी ठोंबरे 


✴️ बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे  हे मराठीतील एक श्रेष्ठ निसर्गकवी होते. इ.स. १९०७मध्ये जळगावात पहिले महाराष्ट्र कविसंमेलन झाले. या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. कान्होबा रणछोडदास कीर्तिकर यांनी त्या संमेलनात ठोंबरेंना बालकवी ही उपाधी दिली.

✴️ बालकवींच्या बहुतेक कवितांत निसर्ग मध्यवर्ती असला तरी रूढ अर्थाने निसर्गवर्णन हा त्यांच्या कवितांचा हेतू नाही. निसर्गाशी तादात्म्य पावलेल्या कविमनाचे ते सहजोद्गार आहेत. निसर्गातील विविध दृश्यांत त्यांना मानवी भावना दिसतात. म्हणजे हे निसर्गाचे मानवीकरण नाही किंवा अचेतन वस्तूवर चेतनारोप नाही. ‘फुलराणी’तील एक कलिका आणि सूर्यकिरण यांची नाजूक प्रीतिकथा ह्या दृष्टीने लक्षणीय आहे. ती जेवढी अतिमानवी तेवढीच मानवी आहे. ‘अरुण’मध्ये पहाट फुलते या घटनेभोवती कल्पनाशक्तीच्या विभ्रमांचे भान हरविणारे जाळे विणले आहे; पण त्या केवळ उत्प्रेक्षा नव्हेत. त्या घटनेत भाग घेणाऱ्या निसर्गातील विविध गोष्टी तिथे सजीव होतात. इतकेच नव्हे तर कवितेच्या किमयेने रसिकही त्यांच्याशी एकरूप होतात. त्यांमागील दिव्य आणि मंगल यांच्या कवितेत अलौकिकाचा स्पर्श होतो. साध्या वर्णनात प्रतिकाची गहिरी सूचना लपलेली असते. मर्ढेकरांच्या कवितेवर बालकवींचा मोठा प्रभाव होता. अगदी अलीकडच्या ग्रेस आणि ना.धों. महानोर यांसारख्या परस्परांहून भिन्न प्रकृतीच्या कवींच्या घडणीतही बालकवींचा प्रभाव जाणवेल.

✴️ बालकवींच्या एकूण कवितेमध्ये उदासीनता व्यक्त करणाऱ्या बारा-तेरा तरी कविता आहेत. कविबाळे, पाखरास, दुबळे तारू, यमाचे दूत, निराशा, पारवा, शून्य मनाचा घुमट, काळाचे लेख, खेड्यातील रात्र, संशय, हृदयाची गुंतागुंत, जिज्ञासू, बालविहग ह्या कविता त्यांपैकीच होत.


✴️ बालकवींच्या प्रसिद्ध कविता - 

आनंदी आनंद गडे

औदुंबर

फुलराणी

श्रावणमास 

✴️ बालकवींच्या कविता असलेली पुस्तके - 

फुलराणी : बालकवींच्या निवडक कविता (कुसुमाग्रज- वि.वा. शिरवाडकर). ह्या संग्रहात ५७ कविता आहेत.

बालकवींच्या निवडक कविता (संपादक - ना.धों. महानोर). या संग्रहात ३१ कविता आहेत. शिवाय बालकवींनी लिहिलेली त्यांच्या हस्ताक्षरातील पत्रेही आहेत.

बालकवींच्या बालकथा (आत्मकथन)

बालकवींच्या बालकविता (कवितासंग्रह, या संग्रहात २६ कविता आहेत)

बालविहग (कवितासंग्रह, संपादक - अनुराधा पोतदार, या संग्रहात एकूण ७५ कविता आहेत.)

समग्र बालकवी (संपादक - नंदा आपटे) 


🙏 स्रोत - विकिपीडिया

.

Post a Comment

0 Comments