शांता शेळके - मराठी साहित्यिक

 

ओळख मराठी साहित्यिकांची 

साहित्यिक - कवयित्री शांताबाई शेळके 

Shantabai Shelake 

📲 मराठी साहित्यिक शांताबाई शेळके यांच्या जीवन कार्यावर आधारित ऑनलाईन प्रश्नमंजुषा चाचणी सोडविण्यासाठी येथे क्लिक करा. 👈 

🔻जन्म - १२ ऑक्टोबर  १९२२, इंदापूर (पुणे जिल्हा), महाराष्ट्र

🔻मृत्यू - ६ जून २००२, पुणे, महाराष्ट्र, भारत

🔻कार्यक्षेत्र - साहित्य, पत्रकारिता, राजकारण, चित्रपट, शिक्षण

🔻साहित्य प्रकार - कथा, कादंबरी, कविता,

चरित्र लेखन, वृत्तपत्रांत सदरलेखन

🔻वडील - जनार्दन शेळके 

✴️ शांता शेळके  या एक प्रतिभासंपन्न मराठी कवयित्री होत्या. याशिवाय त्या एक प्राध्यापिका, संगीतकार, लेखिका, अनुवादक, बाल साहित्य लेखिका, साहित्यिक, आणि पत्रकार होत्या.

✴️ शांता शेळके यांचा जन्म १२ ऑक्टोबर १९२२ साली पुणे जिल्ह्यातील इंदापूर गावी झाला, व शिक्षण पुण्यात (हुजूरपागा शाळा व स.प. महाविद्यालय येथे) झाले. आचार्य अत्र्यांच्या "नवयुग’ मध्ये ५ वर्षे उपसंपादक राहिल्यानंतर त्यांनी नागपुरातील हिस्लॉप महाविद्यालय, तसेच मुंबईतील रुईया व महर्षी दयानंद महाविद्यालयांमध्ये मराठीच्या अध्यापिका म्हणून काम केले. आळंदी येथे १९९६ साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या.

✴️ अनुवादक, समीक्षा-स्तंभ लेखिका, वृत्तपत्र सहसंपादिका म्हणूनही शांता शेळके यांनी साहित्यात मोलाची भर घातली आहे. शांता शेळके या केंद्रीय फिल्म प्रमाण मंडळाच्या, तसेच राज्य नाटक परिनिरीक्षण मंडळाच्या सदस्य होत्या. शांताबाईंनी डॉ. वसंत अवसरे या टोपण नावाने देखील गीते लिहिली. ६ जून २००२ रोजी ७९ व्या वर्षी शांता शेळके यांचे निधन झाले.

✴️ शांता शेळके यांना मिळालेले पुरस्कार

🔸गदिमा गीतलेखन पुरस्कार १९९६

🔸सुरसिंगार पुरस्कार (’मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश’ या गीतासाठी)

🔸केंद्र सरकारचा उत्कृष्ट चित्रगीत पुरस्कार (चित्रपट भुजंग)

🔸यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुरस्कार (२००१) साहित्यातील योगदानाबद्दल 

✴️शांता शेळके यांच्यावर लिहिलेली पुस्तके -

🔸आठवणीतील शांताबाई (संपादक - शिल्पा सरपोतदार)

🔸शांताबाई (अनिल बळेल)

🔸शांताबाईंची स्मृतिचित्रे (संपादक - यशवंत किल्लेदार)

🔸शब्दव्रती शांताबाई - (लेखिका नीला उपाध्ये ) 


🙏 स्रोत - विकिपीडिया 

Post a Comment

0 Comments