भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती 14 एप्रिल

  

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
Dr. Babasaheb Aambedkar Jayanti
 14 एप्रिल 


🔻 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा परिचय - 

🔸टोपणनाव: बाबासाहेब, बोधिसत्त्व
🔸जन्म: एप्रिल १४, इ.स. १८९१
महू, इंदूर जिल्हा, मध्य प्रदेश, ब्रिटिश भारत
🔸मृत्यू: डिसेंबर ६, इ.स. १९५६, दिल्ली, भारत
🔸चळवळ: दलित बौद्ध चळवळ
🔸संघटना: बहिष्कृत हितकारणी सभा
समता सैनिक दल
स्वातंत्र्य मजूर पक्ष
डिप्रेस्ड क्लास एज्युकेशन सोसायटी
शेड्यूल कास्ट फेडरेशन
पीपल्स एज्युकेशन सोसायटी
पत्रकारिता/ लेखन: मुकनायक
बहिष्कृत भारत
समता
जनता
प्रबुद्ध भारत
🔸पुरस्कार: भारतरत्न (१९९०)
🔸प्रमुख स्मारके: चैत्यभूमी, मुंबई
🔸धर्म: बौद्ध धर्म (मानवता)
🔸प्रभाव: गौतम बुद्ध, संत कबीर, महात्मा फुले
🔸वडील: सुभेदार रामजी सकपाळ
🔸आई: भीमाबाई रामजी सकपाळ
🔸पत्नी नाव: रमाबाई आंबेडकर, डॉ. सविता आंबेडकर
🔸अपत्ये: यशवंत भीमराव आंबेडकर

🙏 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !!! 💐🙏

 ✴️डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (१४ एप्रिल १८९१ – डिसेंबर ६, १९५६) हे जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ, कायदेपंडीत, समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, इतिहासकार, शिक्षणतज्ज्ञ, धर्मशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, लेखक, प्राध्यापक, समाज सुधारक, बॅरीस्टर, वक्ते, पत्रकार, जलतज्ज्ञ, संपादक, स्वातंत्र्य सेनानी, संसदपटू, मानवी हक्कांचे कैवारी आणि बौद्ध धर्म पुनरुत्थानक होते. शिवाय ते भारत देशातील कोट्यवधी शोषित पददलितांचे उद्धारक आणि स्वतंत्र्य भारतीय संविधानाचे शिल्पकार होते. ते बाबासाहेब या नावाने प्रसिद्ध आहेत. ‘बाबा’ म्हणजेच ‘पिता’ किंवा 'वडील' आणि ‘साहेब’ हा आदर व्यक्त करण्यासाठीचा शब्द आहे. सर्वप्रथम बाबासाहेबांच्या हयातीतच त्यांचे अनुयायी त्यांना ‘बाबासाहेब’ म्हणत असत, नंतरच्या काळात हेच नाव रूढ झाले आणि त्यांचे विरोधकही त्यांना बाबासाहेब संबोधू लागले. आज संपूर्ण भारत आणि विश्व त्यांना ‘बाबासाहेब’ संबोधीत आहे.

✴️डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भीमा, भीम, भिवा, भीमराव, भीमराज, बाबा, बाबासाहेब इत्यादी नावांनी संबोधिले जाते. विश्वरत्न, विश्वमानव, विश्वभूषण, युगपुरूष, युगप्रवर्तक, महामानव, महापुरूष, उच्च विद्याविभूषीत, परोपकारी, क्रांतीसूर्य, प्रज्ञासूर्य, घटनासम्राट, घटनापती, बुद्धीसम्राट, समाजसूर्य, मसिहा, भारत भाग्यविधाता, महाविद्वान अशा अनेक उपाधींनी बाबासाहेबांना भारतीय जनतेने गौरविले आहे.

✴️भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर  हे न्यायशास्त्रज्ञ, संविधान निर्माता, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी सामाजिक क्रांती चळवळीला प्रेरणा दिली आणि महिला आणि कामगारांच्या हक्कांना पाठिंबा दिला. ते स्वातंत्र्यपूर्व भारताचे कामगार मंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते. ज्ञानाच्या विविध शाखांमध्ये त्यांचे योगदान अतुलनीय आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजात आपुलकीची भावना निर्माण केली, त्यांच्यात लढण्याची भावना निर्माण करून त्यांना त्यांचे हक्क मिळवून दिले. महाडचा सत्याग्रह, मनुस्मृतीचे दहन, गोलमेज परिषद, पुणे करार, स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना, बहिष्कृत लाभार्थी संघटनेची स्थापना, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना, स्त्री-पुरुष समानतेसाठी मूलभूत कार्य या विषयांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यात केले. प्रामुख्याने समाजाच्या तळाशी असलेल्या व्यक्तीचा विचार केला. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा प्रेरणादायी संदेश. विविध भाषा, धर्म, पंथ आणि जातींमध्ये विभागलेला भारत संविधानाच्या माध्यमातून एक देश म्हणून एकसंध झाला. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना वाचनाची आवड होती. धर्मग्रंथांशिवाय आपण जगू शकत नाही, असे त्यांचे मत होते. उच्चशिक्षित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, पत्रकारिता, जलसंधारण आणि बरेच काही शिकवले.

✴️डॉ. बाबासाहेबांनी अनेक विषयांवर संशोधन व लिखाण केले आहे. डॉ . बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखन हे विपूल प्रमाणात आहे.  त्यांच्या लेखनात त्यांनी लिहिलेले ग्रंथ , पुस्तके , प्रबंध , लेख , भाषणे , स्फुटलेख , पत्रे , वर्तमानपत्रे इत्यादींचा समावेश होतो . भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकासाठी ' राजगृह ' " नावाचे घर दादर , मुंबई येथे बांधले . त्यांच्या वैयक्तिक ग्रंथालयात विविध विषयांवरील हजारो दुर्मीळ ग्रंथांचा समावेश आहे . जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाचे पुस्तक घ्या व एक रुपयाची भाकरी घ्या . भाकरी तुम्हाला जगवेल तर पुस्तक तुम्हाला कसे जगायचे हे शिकवेल , हे त्यांचे विचार आजही दिशादर्शक आहेत .


👉 डॉ.बाबासाहेब आंबेडकर  यांच्या विषयी अधिक माहिती साठी  येथे क्लिक करा. 👈👈





Post a Comment

0 Comments