सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षी शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करणेबाबत
Regarding the celebration of entrance ceremony in schools in the academic year 2022-23
💥 कोव्हिड १९ या संसर्गजन्य आजारामुळे मार्च २०२० पासून शाळा बंद होत्या. कोव्हिड १९ चा प्रादुर्भाव कमी झाल्याने शासन स्तरावरून शासन निर्णय दि . २०/०१/२०२२ नुसार शाळा सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.
💥 मागील दोन वर्षातील कोव्हिड १९ च्या परिस्थितीमुळे राज्यातील विद्यार्थ्यांचे नियमित शाळेत येणे बंद होते. या दरम्यानच्या काळात मोठ्या प्रमाणात शैक्षणिक अध्ययन कमाल पातळीपर्यंत झाले असल्याबाबत स्पष्टता दिसून येत नाही. तसेच , शाळांमधील शैक्षणिक सोयी - सुविधांमध्ये सुद्धा अस्त - व्यस्त झालेली असणाची शक्यता नाकारता येत नाही.
💥 सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षी विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास प्रत्यक्षात दि . १५.०६.२०२२ व विदर्भातील विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास प्रत्यक्षात दि . २७.०६.२०२२ रोजी प्रारंभ होणार आहे.
💥 विद्यार्थ्यांना शाळेची ओढ व आस्था निर्माण व्हावी यासाठी शाळा सुरु होण्याच्या प्रथम दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत प्रभावी व दर्जेदार तसेच उत्सुकतेने होणे अपेक्षित आहे.
💥 या पार्श्वभुमीवर सत्र २०२२-२३ मध्ये इयत्ता १ ली ते १२ वी मधील सर्व विद्यार्थ्याचे प्रवेशोस्तवाच्या प्रसंगी स्वागत करणे आवश्यक आहे.
👉त्यानुषंगाने पुढील प्रमाणे आपल्या स्तरावरुन कार्यवाही करण्यात यावी.
🔻१. शाळेच्या परिसरातील ( वयोगट ६ ते १४ वर्ष ) वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांचे शाळेत प्रवेश झाले असल्याची खात्री करण्यात यावी.
🔻२. शाळाबाह्य झालेली किंवा असलेल्या बालकांचा शोध शाळापूर्व तयारीच्या कालावधीमध्ये करण्यात यावा . निर्दशनास आल्यास अशा बालकांना शाळेत प्रवेश देण्यात यावेत .
🔻३. नजिकच्या परिसरातील दगडखानी , वीटभट्टी , बांधकामाचे स्थळ , उद्याने बाजार पेठा , पदपथ , सिग्नल , कुटीर उद्योग , कामगार वस्त्या या सारख्या ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यात यावे .
🔻४. शाळा प्रवेशाचा पहिल्या दिवशी आपण व आपल्या अधिनस्त प्रत्येक अधिकाऱ्यांनी व्यक्तीशः किमान एका शाळेत जाऊन विद्यार्थ्याचे / शिक्षकांचे मनोबल उंचावण्यासाठी उद्बोधन / प्रबोधन करावे .
🔻५. विद्यार्थ्यांचे स्वागत फुल किंवा अन्य शालेय उपयोगी साहित्य , स्थानिक स्त्रोत मध्ये उपलब्ध उपयोगी सामुग्री देऊन करण्यात यावे . विद्यार्थ्यांमध्ये शाळेत उपस्थित राहण्याची आवड निर्माण करण्यासाठी शाळेतील वातावरण चैतन्यमय आणि उत्साहवर्धक इ.चे व्यवस्थापन करण्यास मार्गदर्शन करावे.
🔻६. मागील दोन वर्षात विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत उपस्थित नसल्याने सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या किमान पातळीपर्यंत आणण्याबाबत शाळा व्यवस्थापन समिती सदस्य , पालक व शिक्षक यांचेशी विचार विमर्श करुन अध्ययन निष्पत्तीसाठी उपाययोजना , सेतु अभ्यासक्रम , इतर विविध शैक्षणिक सधनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत उद्बोधन व सहकार्य करावे.
🔻७. शाळा प्रवेशोत्सवाच्या कार्यक्रमाची स्थानिक पातळीवरील प्रसार माध्यमाद्वारे व्यापक प्रसिद्धी करण्यात यावी.
🔻८. शाळा प्रवेशाच्या दिवशी माजी विद्यार्थ्यांचे माजी शिक्षक , स्थानिक पदाधिकारी , ग्रामस्त इ . यांचे सहकार्य घेण्यात यावे.
0 Comments