इयत्ता १ ली ते १२ वी चा २५ % कमी करण्यात आलेल्या पाठ्यक्रमाबाबत ..
मार्च २०२० पासून कोविड -१ ९ या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव संपूर्ण जगामध्ये झालेला आहे . त्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार मार्च २०२० पासून राज्यामध्ये सर्व शाळा , महाविद्यालये बंद ठेवण्यात आलेली आहेत.
दरवर्षी साधारणतः जूनमध्ये सर्व राज्यांमध्ये शैक्षणिक वर्ष सुरू होत असते . परंतु कोविड - १ ९ या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सद्य परिस्थितीतही कमी झालेला दिसून येत नाही . त्यामुळे सन २०२१-२२ मध्ये नेहमीप्रमाणे शाळा सुरू करता आलेल्या नाहीत . वेळेवर शाळा सुरू करता न आल्यामुळे विहित वेळेत पाठ्यक्रम पूर्ण करण्याबाबत समस्या निर्माण होऊ शकतात . या अनुषंगाने सन २०२१ - २२ या शैक्षणिक वर्षाकरिता सुद्धा सन २०२०-२१ प्रमाणे इयत्ता १ ली ते १२ वी चा २५ टक्के पाठ्यक्रम कमी करण्याचा निर्णय उपरोक्त शासन निर्णयानुसार घेण्यात आला आहे . तरी इयत्ता १ ली ते १२ वी च्या सर्व विषयांच्या कमी केलेल्या २५ टक्के पाठ्यक्रमाची इयत्ता निहाय व विषय निहाय यादी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद , महाराष्ट्र , पुणे च्या
या वेबसाईटवर देण्यात आलेली आहे .
♦️ २५% कमी करण्यात आलेला इ. १ ली ते ८ वी चा अभ्यासक्रम पाहण्यासाठी 👈 येथे क्लिक करा.

0 Comments