Bridge Course Std. 6 th. Day Four. सेतू अभ्यासक्रम इयत्ता सहावी. दिवस - चौथा.


Bridge Course Std. 6 th. Day Four. 

सेतू अभ्यासक्रम इयत्ता सहावी. दिवस - चौथा.

दिनांक - 4 जुलै 2021

 ♦️ विद्यार्थ्यांनी आपले शिक्षक, पालक यांच्या मदतीने प्रत्येक दिवशीचा अभ्यास पूर्ण करावा.

प्रत्येक विषयाचा अभ्यास / कृतीपत्रिका वहीत लिहून पूर्ण कराव्यात व वेळोवेळी आपल्या वर्गशिक्षक यांना दाखवाव्यात किंवा त्याचे फोटो whats app वर पाठवावेत.

1️⃣ विषय - मराठी

क्षेत्र - लेखन

कौशल्य/ क्षमता - स्व अभिव्यक्ती

अध्ययन निष्पत्ती -

1) आपल्या परिसरात घडणारे प्रसंग घटना इत्यादींची सूक्ष्म निरीक्षण करतात त्यावर तोंडी प्रतिक्रिया व्यक्त करतात प्रश्न विचारतात.

2) रेडिओ दूरदर्शन वर्तमानपत्र इंटरनेट या द्वारे पाहिलेल्या ऐकलेल्या घटना स्वतःच्या शब्दात मांडतात.

♦️ जाणून घेऊया - 


📲 मुलांनो वरील चित्राचे निरीक्षण करा व खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या वहीत लिहून काढा.
1) चित्रात एकूण किती मुले व किती मुली आहेत ?
2) चित्रातील मुले काय करीत आहेत ?
3) वरील चित्रात मुले करीत असलेल्या कृती पैकी तुम्हाला कोणती कृती करायला जास्त आवडते ?
4) मुले कुठे आहेत ?
१) शाळेच्या मैदानावर २) घरी ३) शेतात ४) शाळेत

♦️ सक्षम बनू या.

📚 क्रीडा महोत्सव या विषयावर आठ ते दहा ओळी लेखन तुमच्या वहीत करा. लेखन करण्यासाठी खालील मुद्द्यांचा आधार घ्या.
१) क्रीडा महोत्सवाचे ठिकाण व दिनांक
२) क्रीडा महोत्सवासाठी घेतले जाणारे खेळ
३) क्रीडा महोत्सवाचे नियोजन
४) क्रीडा महोत्सवासाठी येणारे पाहुणे
५) क्रीडा महोत्सवासाठी आवश्यक बाबी
६) विजेत्या खेळाडूंना दिली जाणारी बक्षिसे.

📲 माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा.


♦️ चला सराव करूया.

तुमच्या शाळेतील स्नेहसंमेलन याचे वर्णन तुमच्या शब्दात करा.
 
♦️ कल्पक होऊया

तुम्हाला आवडलेली एखादी घटना किंवा प्रसंग याचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा किंवा तुमच्या गावातील एखाद्या व्यावसायिकाची निरीक्षण करून त्याच्या कामाचे वर्णन तुमच्या वहीत लिहा. 

📲 माहितीसाठी खालील कुंभार काम या व्यवसाय विषयीचा व्हिडिओ पहा. 👇
 

2️⃣  विषय - गणित
घटक - संख्याज्ञान
उपघटक - सात अंकी संख्यांचा लहान मोठेपणा

♦️ थोडे आठवूया

विद्यार्थी मित्रांनो तुम्ही संख्यांचा लहान मोठेपणा ओळखायला शिकला हात खाली काही उदाहरणे दिली आहेत त्यावरून पुन्हा लक्षात घ्या.
16794 > 6794
5364789 < 6539874
9999999 > 99999
3580726 < 3588276

♦️ संबोध कोपरा 

🔻 खालील संख्यांचा लहान मोठेपणा ठरवा व चौकटीत < , > यापैकी योग्य चिन्ह लिहा.
35970 ⬛ 53790
8000808 ⬛ 88888
400000 ⬛ 1400040
3523302 ⬛ 3532302
480200 ⬛ 488000

🔻 खाली दिलेल्या दोन संख्यांमधील लहान संख्याला गोल करा.
235705 ; 99468
575010 ; 575100
900004 ; 1999919

🔻 खाली दिलेल्या दोन संख्यांमधील मोठ्या संख्येला अधोरेखित करा.
3270001 ; 723100
4562768 ; 57987
800000 ; 8000008

🔻 खालील उदाहरण सोडवा.
औरंगाबाद जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमधील मुलांनी 327800 बिया जमा केल्या, तर पुणे जिल्ह्यातील मुलांनी  582900 बिया जमा केल्या जास्त बिया कोणत्या जिल्ह्यातील मुलांनी जमा केल्या ? 

📝 वरील अभ्यास ( उदाहरणे ) वहीत लिहा व पूर्ण करा.
 
📲 संख्यांचा लहान मोठेपणा या घटकाच्या सरावासाठी खालील व्हिडिओ पहा. 👇


3️⃣ विषय - इंग्रजी

( खालील Template मधील सूचनांप्रमाणे कृती करा. अभ्यास वहीत लिहा.



💢 For More information Watch Below Video. सरावासाठी खालील व्हिडीओ पहा. 👇


4️⃣ विषय - हिंदी

निम्नलिखित चित्र का निरीक्षण करके लिखित रुपसे अपनी प्रतिक्रिया व्यक्त करे |



💢 अधिक जानकारी के लिए 👇 यह व्हिडीओ देखिये |


5️⃣ विषय - सामान्य विज्ञान

( खालील घटक वाचा व समजून घ्या. दिलेल्या प्रश्नांची उत्तरे वहीत लिहा. )
💢 जलचक्र हा घटक समजून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पहा. 👇


6️⃣ विषय - समाजशास्त्र

( खालील घटक वाचा व समजून घ्या. दिलेल्या प्रश्नांची उत्तरे वहीत लिहा. )


💢 घटकाच्या अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पहा. 👇

Post a Comment

0 Comments