Learn with Fun 10 July 2021. शिकू आनंदे. 10 जुलै 2021.


  " शिकू  आनंदे " (Learn with Fun)  उपक्रम

दिनांक - 10 जुलै 2021                                     उपरोक्त विषयानुसार, मार्च २०२० पासून कोविडच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व  शाळा बंद आहेत. शाळा बंद असल्या तरी मुलांचे शिकणे सुरु रहावे या हेतूने  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषेदे मार्फत online पद्धतीने विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे.  शाळा बंद व लॉकडाऊन मुळे शहरी भागात बहुतांश मुले ही घरातच बंदिस्तआहेत. खेळण्याच्या वयात मुले घरात बंदिस्त झाल्याने अनेक प्रकारच्या  शारीरिक व मानसिक समस्या मुलांमध्ये  निर्माण होऊ शकतात, या बाबीचा विचार करून परिषेदेच्या सामाजिक शास्र व कला क्रीडा विभागामार्फत  इ.१ ली ते ८ वीच्या वर्गात अध्ययन करणाऱ्या राज्यातील सर्व मुलांसाठी कला, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव या विषयाबाबत या विषयांच्या अभ्यासक्रमावर आधारित   दर शनिवारी online पद्धतीने *“शिकू  आनंदे ”* (Learn with Fun) हा उपक्रम दि.३ जुलै २०२१ पासून सुरु झालेला आहे. मुलांचे शिकणे आनंददायी व्हावे, घरबसल्या मुलांचा शारीरिक व्यायाम व्हावा, मुलांनी छोट्या छोट्या कृती  पहाव्यात,  कराव्यात,  कृतीद्वारा आनंददायी पद्धतीने मुले शिकवीत हा या उपक्रमाचा प्रमुख हेतू आहे.

      दि.10 जुलै 2021 रोजी मुलांचे शिकणे आनंददायी व्हावे, घरबसल्या मुलांचा शारीरिक व्यायाम व्हावा, मुलांनी छोट्या छोट्या कृती  पहाव्यात,  कराव्यात,  कृतीद्वारा आनंददायी पद्धतीने मुले शिकावीत या  हेतूने 'उत्तेजक हालचाली, परसबाग/कुंडीतील लागवड' या विषयाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. स.९ ते १० या वेळेत इ.१ ली ते ५ वी साठी  व १० ते ११ या वेळेत इ. ६ वी ते ८ वी च्या मुलांसाठी  कृती घेण्यात येणार आहेत.

  सदर उपक्रमातील आजच्या विषयाबाबत माहिती आपण खालील व्हिडिओ मध्ये पाहू शकतात.


Post a Comment

0 Comments