शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील शहरी भागात ८ वी ते १२ वी व ग्रामीण भागातील ५ वी ते ७ वी चे वर्ग सुरक्षितपणे सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना .
Guidelines for safe start of 8th to 12th class in urban areas and 5th to 7th class in rural areas in the academic year 2021-22.
सन २०२० या वर्षात राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाला .त्यानंतर शासनाने केलेल्या उपाययोजनांमुळे राज्यातील कोरोनाची परिस्थिती काही कालावधीनंतर सुधारल्याने राज्य शासनाने टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्यास परवानगी दिली .त्यानुसार शालेय शिक्षण विभागाने प्रथमत : दि .१० नोव्हेंबर , २०२० च्या शासन परिपत्रकान्वये इ.९ वी ते १२ वी चे वर्ग काही अटी - शर्ती निश्चित करुन दि .२३ नोव्हेंबर , २०२० पासून सुरु करण्यास मान्यता दिली .त्यानंतर दि .१८ जानेवारी , २०२१ रोजीच्या परिपत्रकान्वये इ .५ वी ते ८ वी चे वर्ग दि .२७ जानेवारी , २०२१ पासून सुरु करण्यास मान्यता दिली .तथापि , त्यानंतर राज्यात कोरोनाची दुसरी लाट टप्प्याटप्प्याने वाढत गेली .त्यामुळे राज्य शासनाने दि .१५ एप्रिल , २०२१ पासून राज्यात पुन्हा लॉकडाऊन जाहीर केले. त्यानंतर राज्य शासनाने केलेल्या उपाययोजनांमुळे राज्यातील लॉकडाऊन उठविण्यात आले .
मागील वर्षी शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झालेले आहे . त्यामुळे आता दिनांक १७ ऑगस्ट , २०२१ पासून राज्यातील ग्रामीण भागात इयत्ता ५ वी ते ७ वी चे वर्ग व शहरी भागातील इयत्ता ८ वी ते १२ वी चे वर्ग सुरु करण्यास परवानगी देण्यात येत आहे.मुंबई , मुंबई उपनगर , ठाणे शहरातील कोविड परिस्थिती विचारात घेवून शाळा सुरू करणेबाबतनिर्णय घेण्यासाठी संबंधित महानगरपालिका आयुक्त यांना प्राधिकृत करण्यात येत आहे .तसेच दिनांक २ ऑगस्ट , २०२१ रोजीच्या ब्रेक द चेन मधील सुधारीत मार्गदर्शक सूचनानूसार कोल्हापूर , सांगली , सातारा , सोलापूर , पुणे , अहमदनगर , बीड , रत्नागिरी , सिंधुदुर्ग , रायगड , पालघर जिल्ह्यातील कोविड परिस्थिती विचारात घेवून व अन्य जिल्ह्यांबाबत देखील शाळा सुरू करणेबाबत निर्णय घेण्यासाठी संबंधितजिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात येत आहे .
🔻 या बाबतचे शासन परिपत्रक दिनांक 10 ऑगस्ट 2021 रोजी निर्गमित करण्यात आले आहे. या परिपत्रकात शाळा सुरू करण्यापूर्वी आरोग्य स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाय योजनांच्या बाबतीत मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. तसेच शाळा सुरू झाल्यानंतर आरोग्य स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजना बाबतीत देखील मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत.

0 Comments