Independence Day 2021:
आझादी का अमृत महोत्सव
Let's Sing the National Anthem Record your Video, Upload it and get certificate.
१५ ऑगस्टला भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण होणार आहे. स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करण्यासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. आझादी का अमृत महोत्सव म्हणून यंदा स्वातंत्र्य दिन साजरा होणार आहे.
या निमित्ताने केंद्र सरकारने मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून एक अभिनव उपक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमा अंतर्गत तुम्ही तुमचा राष्ट्रगीत ( जन गण मन ) म्हणताना व्हिडिओ रेकॉर्ड करा. तो व्हिडिओ दिलेल्या वेबसाईट वर अपलोड करा व उपक्रमात सहभागी झाल्याचे प्रमाणपत्र देखील मिळवा.
तसेच भारतातील आघाडीच्या गीतकार आणि संगीतकारांपैकी एकाच्या नवीन गाण्यात वैशिष्ट्यीकृत होण्याची संधी मिळवा.
🔻 टीव्ही, रेडिओ, यूट्यूब आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रक्षेपित होणाऱ्या गाण्यासाठी टॉप 100 व्हिडिओ निवडले जातील.
📲 या उपक्रमात सहभागी होण्यासाठी खालील प्रमाणे कृती करा. 👇
🔻 सर्वप्रथम खालील लिंक वर क्लिक करा. 👇
🔻 त्यानंतर पुढील प्रमाणे पेज ओपन होईल त्यात खाली Proceed वर क्लिक करा.
( येथे तुम्ही भाषा देखील बदलू शकतात. )
🔻 त्यानंतर पुढील पेज वर तुमचे पूर्ण नाव Full Name लिहा. Age group निवडा. राज्य /State निवडा. आणि खालील असलेल्या Let's Sing या टॅब वर क्लिक करा.
🔻 त्यानंतर पुढील पेज वर तुमच्या मोबाईलचा कॅमेरा on होईल. त्यात दिलेल्या फ्रेम मध्ये स्वतः ला adjust करा. त्यानंतर Record वर क्लिक करून राष्ट्रगीत म्हणा. शेवटी Upload वर क्लिक करा.
( टीप - राष्ट्रगीत व्यवस्थित उभे राहूनच म्हणावे. )
🔻या उपक्रमात सर्व वयोगटातील व्यक्ती सहभागी होऊ शकतात.
📲 चला तर मग, तुम्हीही यात सहभागी व्हा व इतरांना देखील याविषयी माहिती द्या.
0 Comments