International Ozone Day. आंतरराष्ट्रीय ओझोन दिन. 16 सप्टेंबर

 


जागतिक ओझोन संरक्षण दिवस 

International Ozone Day

16 सप्टेंबर 2021

आज (१६ सप्टेंबर) रोजी जागतिक ओझोन दिन (World Ozone Day) साजरा केला जात आहे. पृथ्वीसाठी (Earth) ओझोनचा थर हा अत्यंत आवश्यक आहे. मात्र, मानवनिर्मित प्रदूषणामुळे हा थर हळूहळू नाहीसा होऊ लागला आहे. ज्याचे गंभीर परिणाम येत्या काळात संपूर्ण जगाला भोगावे लागतील. त्यामुळेच या गोष्टीचं भान ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे आजच्या दिवशी आपण ओझोनचं नेमकं महत्त्व काय आहे हे आपल्या मित्र-मंडळींना पटवून देणे अत्यंत गरजेचं आहे.


💢 जागतिक ओझोन दिवस निमित्त विशेष प्रश्नमंजुषा चाचणी सोडविण्यासाठी 👈 क्लिक करा.

ओझोनचा थर हा एक प्रकारे पृथ्वीची संरक्षक भिंत आहे. कारण सूर्याचे जे अतिनील किरण बाहेर पडतात ती किरण थेट पृथ्वीवर न येऊ देण्याचे काम हे ओझोनचा थर करताता. ओझोन हा प्राणवायुच्या ३ अणूंपासून बनलेला आहे.  शास्त्रीयदृष्ट्या ओझोनचा थर हा पृथ्वीपासून १६ ते २३ किलोमीटरच्या पट्ट्यात आढळून येतो. त्यामुळे सूर्याचे अतिनील किरणं हे याच स्तरावर रोखले जातात.

....

 🔻संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण कार्यक्रमानुसार (UNEP) १९९५ सालापासून हा दिवस पाळला जातो.

🔻फ्रीज, एअरकंडिशनर आणि इतर यंत्रणात वापरल्या जाणा-या क्लोरोफ्लुरोकार्बन प्रकारच्या रसायनांमुळे पृथ्वीभोवतालच्या ओझोन वायूच्या ठरला छिद्रे पडत असल्याचे दिसले आहे.

🔻पृथ्वीभोवती ओझोनचा थर आहे. यामुळे सूर्याच्या अतिनील किरणांपासून आपला बचाव होतो.

🔻ओझोन हा फिक्कट निळ्या रंगाचा वायू असतो. ओझोनला एक तीव्र वास येतो. ओझोनचे रेणूसूत्र O3 आहे.

🔻संयुक्त राष्ट्रसंघाने १६ सप्टेंबर १९८७ मध्ये क्‍लोरोफ्युरो कार्बनची निर्मिती आणि वापर यावर नियंत्रण ठेवण्याचा करार केला. त्यानिमित्ताने १६ सप्टेंबर हा दिवस जागतिक ओझोन संरक्षण दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो.

🔻१९८५ मध्ये अंटार्क्‍टिकावरील ओझोनचा थर विरळ झाल्याचे तज्ज्ञांच्या लक्षात आले आणि या विषयाचे गांभीर्य जगाच्या समोर आले.

🔻शास्त्रीयदृष्ट्या ओझोनचा थर हा पृथ्वीपासून १६ ते २३ किलोमीटरच्या पट्ट्यात आढळून येतो.

🔻क्रिस्टियन फ़्रेड्रिक स्कोएनबेन या जर्मन-स्विस रसायनशास्त्रज्ञाने 1840 साली ओझोनचा शोध लावला.

🔻1913 साली फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ चार्लस फॅब्री आणि हॅन्‍री बुइसन यांनी पृथ्वीवरील ओझोन थराचा शोध लावला.

🔻1930 साली भौतिकशास्त्रज्ञ सिडनी चॅपमॅन यांनी ओझोनचा थर तयार होण्याची प्रक्रिया शोधून काढली.

🔻ओझोनचे प्रमाण विषुववृत्तीय प्रदेशावर कमी तर ध्रुवीय प्रदेशांवर सर्वाधिक असते.

🔻आयुष्यासाठी ओझोन' ही सन. 2020 च्या जागतिक ओझोन दिनाची थीम होती.

🔻ओझोन वायूचा थर पृथ्वीवरील जीवसृष्टीसाठी संरक्षक थर आहे. यामुळेच पृथ्वीचे आयुष्यमान व तापमान स्थिर राहण्यास मदत होते. यासाठी पर्यावरणाचा ऱ्हास टाळूया, ओझोन वायूचा संरक्षण करूया.





Post a Comment

0 Comments