कर्मवीर भाऊराव पाटील
आशिया खंडातील सर्वात मोठ्या रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक , भारत सरकारच्या पद्मभूषण किताबाने सन्मानित , शिक्षणाची गंगोत्री बहुजन समाजापर्यंत पोहोचवणारे आधुनिक भगीरथ कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज जयंती. त्यानिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन ... 🙏🙏
कर्मवीर भाऊराव पाटील हे थोर शिक्षणमहर्षी होते . कर्मवीर भाऊराव यांचे पूर्ण नाव भाऊराव पायगोंडा पाटील , आईचे नाव गंगाबाई . त्यांचे मूळ गाव कर्नाटक राज्यात दक्षिण कन्नड जिल्हयातील मूडब्रिदी . कर्मवीर यांचे पुर्वज महाराष्ट्रात आले. ते एतवडे , जि . सांगली येथे स्थिर झाले . पूर्वांचे त्यांचे आडनाव देसाई होते . पुढे त्यांच्या घराण्यात पाटीलकी आली त्यामुळे त्यांचे देसाई हे नाव जाऊन पाटील हे नाव रुन झाले . भाऊराव हे जन्माने जैन होते , मात्र जनतेमध्ये ते इतके मिसळून गेले की संपूर्ण बहूजन समाजाला ते आपलेसे वाटले . त्यांचे व्यक्तिमत्व जातीभेदाच्या पलीकडे होते . समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे त्यांनी जाणले होते . बहुजन समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करताना विद्यार्थ्यांमध्ये बंधुता व समता रुजावी यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणातून समता व बंधुता याचे संस्कार समाजाला दिला . कोल्हापूर जिल्हयात हातकणंगले नावाच्या तालुक्यात बाहुबलीचा डोंगर आहे . या डोंगरावर पार्श्वनाथाचे सुंदर , भव्य स्मारक आहे . या डोंगराच्या कुशीत कुंभोज नावाचे गाव आहे . या गावी २२ सप्टेंबर १८८७ रोजी कर्मवीरांचा जन्म झाला . त्यांचे बालपण कुंभोज या गावी गेले . भाऊराव लहानपणापासूनच बंडखोर होते . अन्यायाची त्यांना प्रचंड चीड होती . त्यांचे बालपण कुंभोजमधील अस्पृश्य मुलांच्यामध्ये खेळण्यात गेले . अस्पृश्य समाजातील लोकांना पाणी दिले जात नाही म्हणून त्यांनी एका विहिरीचा रहाटच मोडून टाकला होता . त्यांचे प्राथमिक शिक्षण विटा येथे झाले . पुढील शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले , त्यांची राहण्याची सोय जैन बोर्डिंगमध्ये करण्यात आली होती . याच काळात त्यांच्यावर राजपी शाहू महाराजांच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव पडला , कर्मवीर लहानपणापासून निडर वृत्तीचे होते . कर्मवीरांचे प्राथमिक शिक्षण विटा या वडिलांच्या बदलीच्या गावी झाले . तेथे पुढील शिक्षणाची सोय नसल्याने त्यांना कोल्हापूरला शिक्षणासाठी जावे लागले . कोल्हापूरला असताना कोल्हापूर संस्थानचे राजे शाहू महाराज होते ते भविष्यकाळाचा विचार करणारे राजा होते . त्यांनी महाराष्ट्रात समतेचा झेंडा रोवला सक्तीचे प्राथमिक शिक्षण सुरु केले . समाज प्रबोधनाच्या चळवळीमध्ये एक सुधारक म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले . १ ९ ३२ मध्ये महात्मा गांधी व बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पुणे करार झाला . या ऐक्याच्या स्मरणार्थ ' युनियन बोडींग ' ची स्थापना भाऊरावांनी पुणे येथे केली . हे ऐक्य व्हावे या विषयीची तळमळ महर्षी शिंदे आणि भाऊराव पाटील यांना होती . १ ९ ३५ मध्ये ' महात्मा फुले अध्यापक विद्यालय ' त्यांनी सुरू केले . एकदा कर्मवीर सुट्टीत इस्लामपूरला आले . पावसाळ्याचे दिवस होते . हवेत गारवा होता . सर्व मुले वर्गात बसलेली होतो . आणि एक मुलगा बाहेर कुडकुडत बसला होता . गुरुजीना विचारल्यानंतर तो इतर जातीचा असल्याने बाहेर बसवल्याचे कर्मवीरांना समजले . ते त्या मुलाला घरी घेऊन आले . घरात स्वतःजवळ बसवूनच जेवू घातले नंतर कोल्हापूरला नेऊन ' मिस क्लार्क ' होस्टेलला दाखल केले . तो मुलगा पुढे विधीमंडळाचा सभासद झाला . भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी चालवलेल्या ' मूकनायक ' वर्तमान पत्राचा तो काही काळ संपादक देखील होता . भाऊराव साताऱ्यात शिकवण्या घेत असतांना त्यांनी मदवानमास्तर , भाऊसाहेब कुदळे , नानासाहेब येडेकर आदि मंडळींबरोबर दुधगावात ' दुधगाव शिक्षण मंडळ ' स्थापन केले . याच संस्थेमार्फत सर्व जातिधर्माच्या मुलांसाठी एक वसतिगृहही त्यांनी सुरू केले . रयत शिक्षण संस्थेचे बीज येथेच रोवले गेले . पुढे त्यांनी ओगल्यांच्या काच कारखान्यात व किर्लोस्करांच्या नांगराच्या कारखान्यात काही काळ काम केले . याच काळात त्यांचा सत्यशोधक समाजाच्या कार्याशी जवळून संबंध आलाा. भाऊराव हे समाजसुधारक व शिक्षण प्रसारक होते . सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षण घेऊन जाण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली . मागास व गरीब मुलांना शिक्षण घेता यावे म्हणून त्यांनी ' कमवा व शिका ' ही योजना सुरु केली . महाराष्ट्रात व कर्नाटक राज्यात मिळून ६७५ शाखा आहेत . त्यामध्ये २० पूर्व प्राथमिक , २७ प्राथमिक , ४३८ माध्यमिक , ८ आश्रमशाळा , ८ अध्यापक विद्यालय , २ आय.टी.आय व ४१ महाविद्यालयांचा समावेश आहे अशा या रयत शिक्षण संस्थेची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ४ ऑक्टो १ ९ १ ९ रोजी केली . साताऱ्यात भाऊराव पाटील यांनी एक मोठे वसतिगृह स्थापन केले . हे वसतिगृह चालवण्यासाठी त्यांच्या पत्नीस स्वतःचे मंगळसूत्र व दागिनेही विकावे लागले . महाराष्ट्राच्या जनतेने भाऊराव पाटलांचा कर्मवीर ही पदवी देऊन गौरव केला . तसेच भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले . पुणे विद्यापीठाने त्यांचा इसवी सन १ ९ ५ ९ मध्ये डी . लिट . ही पदवी दिली . रयत शिक्षण संस्था ही आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था आहे . अशा या शिक्षणाची गंगोत्री बहुजन समाजापर्यंत पोहोचवणाऱ्या आधुनिक भगीरथाची प्राणज्योत ९ मे १ ९ ५ ९ रोजी मालवली .

0 Comments