राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणाऱ्या महागाई भत्त्याच्या दरात दिनांक १ जुलै २०२१ पासून सुधारणा करण्याबाबत .
Regarding revision in the rate of dearness allowance sanctioned to State Government and other eligible employees from 1st July, 2021.
शासन निर्णय - राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता शासन असे आदेश देत आहे की , दिनांक १ जुलै , २०२१ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर १७ % वरुन २८ % करण्यात यावा . सदर वाढीमध्ये दिनांक १ जानेवारी , २०२० , दिनांक १ जुलै , २०२० आणि दिनांक १ जानेवारी , २०२१ पासूनच्या महागाई भत्ता वाढीचा समावेश आहे . मात्र दिनांक १ जानेवारी , २०२० ते दिनांक ३० जून , २०२१ या कालावधीत महागाई भत्त्याचा दर १७ % इतकाच राहील . सदर महागाई भत्ता वाढ दिनांक १ ऑक्टोबर , २०२१ पासून रोखीने देण्यात यावी . दिनांक १ जुलै , २०२१ ते दिनांक ३० सप्टेंबर , २०२१ या ३ महिन्यांच्या कालावधीतील महागाई भत्ता वाढीच्या थकबाकीबाबत स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करण्यात येतील.
💢 १ ऑक्टोबर पासून पगारात होणारी पगारवाढ काढण्यासाठी 👈 येथे क्लिक करा.

0 Comments