सरदार वल्लभभाई पटेल

 


सरदार वल्लभभाई पटेल जयंती
Sardar Vallabhabhai Patel

🔻 जन्म - 31 ऑक्टोबर 1875
🔻 जन्म ठिकाण - नाडियाद , जिल्हा - खेडा, गुजरात
🔻आई - लाडबा 
🔻 वडील - झवेरभाई 
🔻 मृत्यू - 15 डिसेंबर 1950 

  वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या राजकीय एकसंघीकरणात मोठे योगदान दिले. त्यांना भारतीय महिलांनी ‘सरदार’ ही उपाधी दिली.

   वल्लभभाई पटेल पेशाने वकील होते. वकिली करीत असताना ते महात्मा गांधीच्या प्रभावाखाली आले. गुजरातच्या खेडा,आणंद जिल्ह्यातील बोरसद आणि सुरत जिल्ह्यातील बारडोली तालुक्यातील खेडुतांना संघटित करून त्यांनी इंग्रजी अत्याचाराविरुद्ध सत्याग्रह केला. या सत्याग्रहानंतर त्यांची गणना गुजरातच्या प्रभावशाली नेत्यांमध्ये होऊ लागली. भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसचे ते एक महत्त्वाचे नेते होते. १९३४ व १९३७ च्या निवडणुकांमध्ये त्यांनी पक्षाचे संघटनही बांधले. भारत छोडो आंदोलनात ते आघाडीवर होते.

  वल्लभभाई पटेल हे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान झाले. या रूपात त्यांनी पाकिस्तानातून आलेल्या आणि पंजाब व दिल्ली येथे राहणार्‍या निर्वासितांच्या मदतीसाठी खूप काम केले. फाळणीनंतर उफाळलेल्या हिंसाचारानंतर शांतीस्थापनेकरीताही त्यांनी कार्य केले. सरदारांनी हिंदुस्थानातील ५६५ अर्धस्वायत्त संस्थानांचे भारतात विलीनीकरण करवून घेणे हे पटेलांचे सर्वात मोठे कार्य होय. मुत्सद्देगिरी व वेळ पडल्यास सैन्यबळ वापरून सरदारांनी संस्थाने भारतात विलीन केली आणि म्हणूनच ते भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जातात. सरदार पटेल हे मुक्त व्यापार व खासगी मालकी हक्कांचे समर्थक होते भारताची एकता आणि अखंडता यांसाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांचा जन्मदिवस भारत सरकारने राष्ट्रीय एकता दिन म्हणून घोषित केला आहे. राष्ट्र उभारणीत त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे.
     सरदार पटेल यांना 1991 मध्ये त्यांच्या देशाच्या सेवेबद्दल भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

💥 सरदार वल्लभभाई पटेल यांची माहिती -

▪️ 1913 मध्ये ते लंडनमधून पदवीधर झाले आणि पदवी संपादनानंतर ते भारतात परतले.
▪️लखनऊमधील राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अधिवेशनात 1916 मध्ये वल्लभभाईंनी गुजरातचे प्रतिनिधित्व केले.
▪️ 1917 मध्ये ते अहमदाबाद नगरपालिकेत निवडून गेले.
▪️ 1917 मध्ये त्यांनी खेडा सत्याग्रहात भाग घेतला, त्यांनी साराबंदी चळवळीचे नेतृत्व केले, शेवटी सरकारला नतमस्तक व्हावे लागले, सर्व कर मागे घेण्यात आले, सरदारांनी त्यांच्या नेतृत्वात ही चळवळ जिंकली, जून 1918 मध्ये शेतकऱ्यांनी विजय साजरा केला आणि गांधीजींना बोलवून त्यांच्या हस्ते वल्लभभाई यांना मानपत्र देण्यात आले.
▪️ 1919 मध्ये, वल्लभभाईंनी रोलेट कायद्याच्या निषेधार्थ अहमदाबादमध्ये मोठा मोर्चा काढला.
▪️ 1920 मध्ये गांधीजींनी असहकार चळवळ सुरू केली, या असहकार चळवळीत वल्लभभाईंनी आपले संपूर्ण आयुष्य देशासाठी वाहून घेतले, त्यांनी महिन्याला हजारो रुपये मिळवून देणारी वकीली सोडून दिली.
▪️ 1921 मध्ये ते गुजरात प्रांतीय कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले.
▪️ 1923 मध्ये, तिरंग्यावर बंदी घालण्यासाठी ब्रिटीश सरकारने कायदा केला, हजारो सत्याग्रह नागपूरला वेगवेगळ्या ठिकाणांहून गोळा केले आणि तीन महिने पूर्ण उत्सुकतेने लढा सुरू केला, सरकारने हे युद्ध दडपण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
▪️ 1931 मध्ये कराची येथे झालेल्या राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष वल्लभभाई होते.
▪️ 1942 मध्ये ‘भारत छोडो’ आंदोलनात भाग घेण्यासाठी त्यांना तुरूंगात जावे लागले.
▪️ 1946 मध्ये स्थापन झालेल्या मध्यंतरी कार्यकारी मंत्रिमंडळात ते गृहमंत्री होते, ते घटना समितीचे सदस्यही होते.
▪️ 1 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला, स्वातंत्र्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळात त्यांना उपपंतप्रधान पदाची पदवी मिळाली, त्यांना गृह मंत्रालय, माहिती व प्रसारण मंत्रालय आणि राज्यांचे प्रभारी देखील केले गेले.
▪️ स्वातंत्र्यानंतर वल्लभभाईंनी भारतातील 600 संस्थान विलीनीकरण केले, हैदराबाद संस्थान देखील 17 सप्टेंबर 1948 रोजी त्यांच्या police action कृतीमुळे भारतात विलीन झाले. 

🔻स्टॅच्यू ऑफ युनिटी (एकतेचा पुतळा) हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आहे. हा पुतळा भारताततील गुजरात राज्याच्या राजपिपळा शहराजवळ नर्मदा धरणाजवळील साधू बेटावर उभारलेला आहे. स्मारक २०,००० मी. क्षेत्रात आहे आणि १२ किमी आकाराच्या कृत्रिम तलावाने घेरलेले आहे. १८२ मीटर (५९७ फूट) उंचीचा हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे.

🙏 भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन !!! 💐🙏


  




Post a Comment

0 Comments